Home / Health / अद्रकाचे गुणकारी उपयोग | Benefits of Ginger in Marathi

अद्रकाचे गुणकारी उपयोग | Benefits of Ginger in Marathi

Ginger – अद्रक हे कंदवर्गीय वनस्पती आहे. याचा कंद आपण अद्रक म्हणून जाणतो. याचा वापर एक औषधी म्हणून व विविध औषधीमध्ये केला जाते. अद्रकामध्ये अनेक औषधीय तत्व आहेत.जे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

अद्रकाचे रोपटे २-3 फुटांपर्यंत वाढते यास पाने व पिवळी फुले येतात.या सर्वांचा औषधी म्हणून वापर होतो.

अद्रकचे गुणकारी उपयोग – Benefits of Ginger in Marathi
Ginger

सर्व घरांमध्ये अद्रकाचा वापर केला जातो. हिवाळ्यात गळ्यातील सक्रमनासाबंधी अद्रकाचा रस व चहा मध्ये सुध्दा अद्रकाचे काप टाकले जाते.

अद्रकास हळद इलाईची व काळे मिरे यासमान पवित्र व गुणकारी मानले जाते. भारतीय उपखंडात या वनौषधीचा वापर भारतीय आयुर्वेदिक उपायांमध्ये केला गेला. नंतर इंग्रजांनी युरोपात याची आयात केल्या नंतर भारतभर याची शेती व व्यापार सुरु झाला. अशाप्रकारे हे संपूर्ण भारतातील परिवारांच्या स्वयंपाक घरात पोहोचले.

अद्रकाचे अनेक प्रकार आहेत. त्यात पिवळा व पांढरा गर असे दोन प्रमुख प्रकार आहेत.पांढरा जास्त स्वादासाठी तर पिवळा कमी तीव्र स्वादासाठी ओळखला जातो.

भारतात याचा वापर हिवाळ्यात चहामध्ये तीव्र स्वादासाठी केला जातो. तर मसाल्यात भाज्यांना चांगली चव यावी यासाठी अद्रकचा वापर मसाल्याचा एक घटक म्हणून होतो.

अद्रकाचा कंद जमिनीत असतो. त्यांना बाहेर काढून उन्हात सुकवून मूळ रूपातील अद्रकास तयार केले जाते.

अद्रक पूर्णपणे सुकवूनहि वापरले जाते. हे फार कमी प्रमाणत खराब होते. सुकल्यावर हे “सुंठ” म्हणून संबोधले जाते. ह्याचा वापर अनेक ठिकाणी होतो.
अद्रकाचा वापर आयुर्वेदिक औषधीमध्ये केला जातो. भारतात घरगुती औषधामध्ये अद्रक बऱ्याच प्रमाणत वापरले जाते. विविध खाद्यपदार्थात जसे ज्यूस,मुरांबे,मसाला भाज्या मध्ये अद्रकाचा वापर होतो.

चला तर मग अद्रकातील औषधीय गुणांबद्दल जानु या.

१)मळमळी वर उत्तम औषध

उलटी व मळमळीची समस्या उदभवल्यास अद्रकाचा काप शहदासोबत तोंडात ठेवून चावल्यास मळमळ नाहीशी होते. गळ्यातील कफ खोकला ज्यात फार कफ येतो. त्यावर अद्रकाच्या रसात शहद मिळवून घेतल्यास लवकरच आराम मिळतो.

२)भूक वाढविणे

अद्रकातील उग्रगन्धामुळे व तीव्र स्वादामुळे तोंडातील ग्रंथींना बेचव वाटणारे अन्न चवीचे वाटू लागते. अद्रकाचे काप जेवण्याआधी तोंडात ठेवून चावल्या नंतर काहीवेळानी तोंडात ठेवून चावल्या नंतर काहीवेळाने जेवल्यास अन्न चविष्ट लागते. त्यामुळे भूक वाढते.

3)पोटातील समस्या

अपचन, पोट दुखणे, पोटात वायू जमा होणे यावर रोज सकाळी शहदासोबत अद्रकाचा रस कोमट पाण्यासोबत घेतल्यास. वरील समस्या दूर होतात.

४)सर्दीपासून बचाव

सर्दीत गळ्यात कफ होतो. नाकाच्या नासिका बंद पडतात. अशा वेळी २ चम्मच अद्रक रस व शहद कोमट पाण्यासोबत सर्दी बसेपर्यंत घेतल्यास सर्दी बरी होते.

५)शरीरात कामोत्तेजना वाढविणे

आयुर्वेदात बऱ्याच ठिकाणी अद्रकाचा वापर शरीरात यौन इच्छा अधिक प्रबळ करण्यासाठी व अधिक परिणामकारक करण्यासाठी होतो. याचे उल्लेख सापडतात.

६)शरीराच्या संध्याच्या दुखण्यावर परिणामकारक

रोज सकाळी उन्हात बसून अद्रकाच्या तेलाची सांध्यावर चांगली मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केल्यास सांध्यांच्या दुखण्यात कमतरता येते. ह्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

७)रक्तप्रवाह सुरळीत करणे

अद्रकत झिंक मॅग्नेशियम आणि क्रोमियम सारखे खनिज असतात. त्यामुळे अद्र्काचे शहदासोबत सेवन पहाटे निर्जळी केल्यास रक्त प्रवाह बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतो.

८)श्वासासंबंधी समस्यावर प्रभावशाली

अद्रकाचा उग्र गंध व तीव्र स्वाद यामुळे हे एक बहुगुणी एक्स्पेटोरांट मानल्या जाते. हे श्वास नलिकेतील घाण बाहेर काढणे, श्वास घेण्यास त्रास व दम भरणे यावर प्रभावशाली औषध मानले जाते. अद्रक कुटून एका कपड्यात टाकून त्याचा ताजा गंध नियमित घेतल्यास श्वासा संबंधी अनेक समस्या दूर होतात.

९)शरीर प्रतिरक्षकांना मदत

अद्रक शरीरातील रोग प्रतीकारक क्षमता वाढविणाऱ्या पेशींना नष्ट करतो व नवीन चांगल्या पेशी तयार होण्यास मदत करतो.
पोषण मूल्यासंबंधी माहिती

– १०० ग्राम सुक्या अद्रकात अनेक खनिज तत्वे व पोषके असतात.

– १ चम्मच अद्रक रोज वापरल्यास यातील पोषक तत्वे आपणास मिळतात.

– अद्रक नवी असो व जुनी किंवा सुकलेली असो याच्यातील पोषकांची कधीच कमी होत नाही. अद्रकाचा वापर सरळ व सोपा आहे.

तर मग आपल्या घरी अद्रकाचा वापर करायला विसरू नका हे आपल्या शरीर स्वास्थासाठी लाभदायक आहे.

  1. Benefits Of Coconut Oil
  2. Benefits of Milk
  3. Benefits of Anjeer

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी अद्रकचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा अद्रकाचे गुणकारी उपयोग  – Benefits of Ginger in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Benefits Of Ginger – अद्रकचे फ़ायदे या लेखात दिलेल्या अद्रकच्या फायद्यांन  – Benefits Of Ginger बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

About majhimarathi-wp

Check Also

Benefits of Banana

चविष्ट केळीपासून होणारे फायदे | Benefits of Banana In Marathi

पिकलेली आणि चविष्ट केळी – Banana फळामध्ये सर्वात लोकप्रिय मानली जातात, हि आपल्याला कोठेही उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *