आलु टिक्की रेसिपी

Aaloo Tikki Recipe

आपण बटाटयापासुन अनेक छान छान डिशेस् बनवु शकतो. आज आम्ही आपल्याकरता घेवुन आलोय आलु टिक्की ! जी खायला फारच रूचकर व चवदार असते. आलु टिक्की हि बाहेरून कडक असते आणि आतून नरम असते, आलु टिक्की हा एक असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच खायला आवडते.

आलु टिक्की म्हटलं कि सगळ्याच्या तोंडाला पाणी येते, आणि हि बनवणं खूप सोपं आहे आणि या रेसिपीमुळे लहान मुलांच्या नाश्त्याची  चिंता कमी होऊन जाईल, आणि हि रेसिपी मुलांना नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया आलु टिक्की बनवण्याची रेसिपी.

आलु टिक्की रेसिपी – Aaloo Tikki Recipe in Marathi

Aaloo Tikki Recipe

चला तर बनवुया आलु टिक्की

Ingredients of Aaloo Tikki

आलु टिक्कीसाठी लागणारी सामग्री:

  1.  500 ग्रॅम मध्यम आकाराचे बटाटे.
  2.  500 ग्रॅम पालकाची पेस्ट बनवा.
  3.  धणे पुदीन्याची चटणी.
  4.   1 चमचा अद्रक लसुण पेस्ट.
  5.   अर्धा चमचा हिरव्या मिर्चीची पेस्ट.
  6.   मिठ व तेल गरजेनुसार.
  7.   सजावटीसाठी पांढरे तीळ आणि कोथींबीर.

Aaloo Tikki Recipe
आलु टिक्की बनविण्याचा विधी:

चला तर मग लक्ष्य देऊन वाचा आलु टिक्की बनवण्याची कृती….

  1. पहिले बटाटे उकडून घ्यावे नंतर बटाट्याचा गर एकजीव करून घ्यावा.
  2. मग त्यामध्ये पालकाची पेस्ट धने पाउडर, पुदिन्याची चटणी , अद्रक लसुण पेस्ट , हिरव्या मिरचीची पेस्ट , मीठ, तिखट चवीनुसार घेऊन सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे.
  3. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवुन घ्यावे.
  4. मग गरम तेलामध्ये तळुन घ्यावे.
  5. आणि गरमागरम आलु टिक्की कच्चे तीळ व हिरवी कोथींबीर सोबत सर्व करा.

नक्की बनवून बघा आलु टिक्की आणि आंम्हाला तुंमचा अभिप्राय जरूर कळवा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आंमच्या माझी मराठी ला आवर्जून भेट दया.

लक्ष्य दया: Aaloo Tikki – आलु टिक्की रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top