मित्रहो जुन्या काळात जेव्हां कधी आपली तब्येत बिघडायची तेव्हां डाॅक्टरांच्या आधी आपल्याला आपली आजी काही ना काही युक्ती सुचवुन आपले दुखणे बरे करायची. आजच्या काळात आजीच्या त्या उपायांचा बटवा – Ajibaicha Batawa कुठेतरी हरवला आहे.
आज आम्ही आजीच्या बटव्यातील काही आवश्यक उपाय घेवुन आलो आहोत.
आजीबाईंच्या बटव्यातील युक्त्या – Ajibaicha Batava in Marathi
अॅसिडीटी
- अर्धा चमचा जिरेपुड ताकात मिसळुन घेतल्यास अॅसिडीटी नाहीशी होते.
- दिवसातुन 2 ते 3 वेळा गुळाचा खडा तोंडात ठेउन चोखत राहावे.
- आपल्या आहारात नारळपाणी, काकडी, टरबुज, भोपळा, लिंबाचा रस, यांचा समावेश असावा.
- कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ व हळद अर्धा चमचा मिसळुन दिवसातुन 2 ते 3 वेळा या पाण्याने गुळण्या कराव्यात.
चांगल्या झोपसाठी
- झोपण्याआधी गरम दुधात 1 चमचा मध मिसळुन प्यावे.
- झोपण्याआधी चेहरा थंड पाण्याने धुवुन घ्यावा.
कमी प्रमाणात त्वचा जळल्यास
- मधाचे काही थेंब हळद पावडर मध्ये मिसळुन त्यास जळालेल्या भागावर लावणे.
- मध जखमेवर लावल्यास फायदा होतो.
- कॅलामाईन लोशन जखमेवर लावल्यास फायदा होतो.
कफ (खोकला)
- मध एक प्राकृतिक कफनाशक मानल्या जाते.
- मधासोबत 1 – 2 लिंबाचा रस मिसळुन 1 चमचा रात्री झोपण्याआधी घ्यावे.
- 1 चमचा मधासोबत अद्रकाचा रस 2, 3 थेंब मिसळुन सकाळी व रात्री झोपतांना घ्यावा.
- कलमीपुड, काळेमिरे, जिरेपुड, गरम पाण्यात मिसळुन प्यावे.
- जीरेपुड अर्धा चमच्यात गुलकंद मिसळुन खावे.
- दुधात कलमीची पुड अर्धा चमचा मिसळुन रात्री झोपण्याआधी पिल्यास कफ कमी होतो.
- कफ कोरडा असेल तर 1 चमचा कांदयाचा रस व मध 1 चमचा एकत्र करून घेतल्यास कोरडा कफ नाहीसा होतो.
लक्ष्य दया: Ajibaicha Batava in Marathi आजीबाईंच्या बटव्यातील युक्त्या तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्