Sunday, September 24, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जगातील काही मजेदार तथ्य ज्याविषयी जाणून आपण होणार आश्चर्य चकित

Cool Fun Facts in Marathi 

जगात अश्या बरेचश्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचे संपूर्ण जगात एक वेगळे अस्तित्व आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला त्या गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी नेहमी एक उत्सुकता निर्माण झालेली असते. आजच्या लेखात सुध्दा आपण अश्या आश्चर्य चकित करणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत, ज्यांना वाचून आपल्याला विश्वास बसणार नाही की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार तर चला पाहूया.

हे आहेत ७ मजेदार तथ्य –  Most Amazing Facts in Marathi

Amazing Facts in Marathi
Amazing Facts in Marathi

१) शहामृगाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात – Ostrich’s Eye is Bigger than its Brain

जगातील सर्वात मोठा पक्षी ऐकले की आपल्याला शहामृग आठवतो, आणि जगातून सर्वात मोठे अंडे सुध्दा शहामृगाचे असते, त्याच्या अंड्याची लांबी जवळजवळ १८ सेमी. इतकी असते. पण आपल्या माहिती साठी शहामृग हा पृथ्वीवरील एकमेव असा प्राणी आहे ज्याचे डोळे हे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात. शहामृगाचे डोळे दोन इंच लांब आणि मोठे असतात. आणि ही गोष्ट शहामृगाला बाकी पक्षांपासून वेगळं बनविते.

२) बुद्धिबळ खेळाची सुरुवात भारतात झालेली आहे – Game of Chess Originated in India

बुद्धिबळ ह्या खेळाला चेस सुध्दा म्हटल्या जात, आणि आणखी याला हिंदीमध्ये शतरंज सुध्दा म्हटल्या जात. आणि या खेळाची सुरुवात आपल्या भारतात झालेली आहे आणि मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे या खेळाला खेळल्याने आपण मानसिक रित्या सुदृढ बनतो. आणि बुद्धिबळाचा खेळ खेळल्याने कठीण प्रश्न ही खूप सोप्या पद्धतीने सोडवायला आपल्या मेंदूला मदत होते.

३) कासव जगतो सर्वात जास्त – Turtles Live the Longest

माणसाची वयोमर्यादा आपण १०० वर्षही मानली तरीही कासव हा पृथ्वीवर असा प्राणी आहे जो सर्वात जास्त दिवस जगतो. कासव हा २५०-३०० वर्ष जगू शकतो. आणि आपल्या पृथ्वीवर कासवांच्या ३०० प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या माहिती साठी कासवांना दात नसतातच. आणि २३ मे ला जागतिक कासव दिवस साजरा केल्या जातो.

४) डॉल्फिन आठ मिनिटे आपला स्वास रोखून ठेवू शकते – Dolphins can hold their Breath for Eight Minutes

डॉल्फिन ला आपण सर्वच चांगल्या प्रकारे ओळखतो. आज जर पृथ्वीवरून माणसाचे अस्तित्व नष्ट झाले तर संपूर्ण पृथ्वीवर डॉल्फिन राज्य करतील.

डॉल्फिन असा मासा आहे जो त्याचा स्वास काही वेळ म्हणजेच सात ते आठ मिनिटे रोखून ठेवू शकतो.

त्यांनंतर डॉल्फिन एक डोळा उघडा ठेऊन झोप सुध्दा घेऊ शकतो.

५) स्वस्थ माणूस झोपतो वर्षातून चार महिने – Healthy person sleeps four Months of the Year

एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे की एक स्वस्थ माणूस एका वर्षाला चार महिने झोपतो.

दिवसाला आठ तासांची झोप मानवी शरीराला आवश्यक आहे. माणूस जर पूर्ण एक वर्ष दररोज आठ तास झोपला तर तो एका वर्षात चार महिने झोपेत असतो.

आणि एका संशोधनात हेही समोर आले आहे की माणूस डोळे बंद केल्याशिवाय शिंकू शकत नाही.

६) पालीचे हृदय एका मिनिटाला १००० वेळा धडधडत – Lizard Heart Beats 1000 times a Minute

एका स्वस्थ माणसाचे हृदय एका मिनिटाला ७२ वेळा धडधडत. त्याचप्रमाणे एका पालीचे हृदय एका मिनिटाला १००० वेळा धडधडत. ही आपल्याला खूपच आश्चर्य चकित करणारी गोष्ट आहे.

कारण मानवापेक्षा किती तरी पटीने पालीचे हृदय धडधडत असते.

७) सरडा एकाच वेळी दोन ठिकाणी पाहू शकतो – The lizard can see in two places at the same time

माणसाची नजर तर आपल्याला माहिती असेल की एकाच वेळी तो एकीकडे पाहू शकतो.

पण पृथ्वीवर आणखी असा एकच जीव आहे जो एकाच वेळी दोन ठिकाणी पाहू शकतो.

तो म्हणजे सरडा आणि सरडा ह्या विशेषतेमुळे बाकी प्राण्यांपेक्षा वेगळा बनतो. तसेच तो परिस्थिती नुसार त्याचा रंग सुध्दा बदलू शकतो.

वरील लेखात पाहिल्या आपण काही मजेदार गोष्टी ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Previous Post

जाणून घ्या २१ जून रोजी येणारे दिनविशेष

Next Post

२१ जूनला होणाऱ्या सुर्यग्रहणा विषयी थोडक्यात माहिती

Editorial team

Editorial team

Related Posts

Shocking Facts about Korea
Information

“नरकात जाने परवडले पण उत्तर कोरिया मध्ये नाही.”

    Shocking Facts about Korea शीर्षक वाचल्यावर आपण चकित झाले असणार कि, असे कसे नियम आहेत उत्तर कोरिया चे,...

by Editorial team
March 2, 2022
Most Interesting Fact in the World
Interesting Facts

फक्त तुमच्यासाठी कधीही न ऐकलेल्या न पाहिलेल्या जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टी

Strange Things in the World जगात बऱ्याच गोष्टी अश्या असतात ज्यांच्या विषयी आपल्याला माहिती नसतं,आपण त्या प्रकारच्या गोष्टी जीवनात ऐकलेल्या...

by Vaibhav Bharambe
March 2, 2022
Next Post
Surya Grahan Information in Marathi

२१ जूनला होणाऱ्या सुर्यग्रहणा विषयी थोडक्यात माहिती

22 June History Information in Marathi

जाणून घ्या २२ जून रोजी येणारे दिनविशेष

Ganoji Shirke

स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे गणोजी शिर्के मराठा साम्राज्यातील पराक्रमी आणि धडाडीचे राजे

Aadvik Foods Success Story

उंटाच्या दुधाचा वापर करून दोघांनी उभा केला नवीन स्टार्टअप. आज कंपनी चा टर्नओव्हर करोडो रुपये आहे

23 June History Information in Marathi

जाणून घ्या २३ जून रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved