अनुलोम – विलोम प्राणायाम | Anulom-vilom Pranayam In Marathi

बाबा रामदेव योगा मध्ये वेगवेगळ्या योग क्रिया आणि विधींचा समावेश होतो. बाबा रामदेव यांच्या योगक्रियामध्ये वेगेवेगळ्या योग विधीचा समावेश आहे. जे चांगल्या आरोग्य आणि शरीरास तंदुरस्त ठेवण्यास सहाय्यक ठरतात.

अनुलोम – विलोम प्राणायाम / Anulom-vilom Pranayam यास “अल्टरनेट ब्रेथिंग टेक्निक” सुद्धा म्हटले जाते.हे प्राणायम ताणतणाव आणि चिंता कमी करतो.

रोज हा प्राणायाम केल्यास अनेक रोग ठीक होतात, जसे कि, हृदयाशी सबंधित आजार, मानसिक रोग, अस्थमा, उच्चरक्तदाब आणि अर्थी रायटीस, या प्राणायामाच्या सरावाने भयंकर डोकेदुखी, सायनस आणि न्यूरलच्या समस्या कमी करता येतात.

Anulom vilom Pranayam

अनुलोम – विलोम प्राणायाम – Anulom-vilom Pranayam In Marathi

या प्राणायामामुळे मनचित्त शांत आणि उत्साहित राहते. हे शरीरास ध्यानासाठी तयार करत दिवसेंदिवस लोक ह्या प्राणायामास करण्यासाठी स्वतःहून समोर येत आहेत.

अनुलोम – विलोम प्राणायाम कसे करावे?

सर्व प्रथम जमिनीवर आसन बसवून त्यावर दोन मिनिट आरामात बसा नंतर पद्मासनाच्या स्थितीत या व दोन मिनिट त्याच स्थितीत येवून आपले चित्तमन केंद्रित कण्याचा प्रयत्न करा.

आर्थीरायटीस रोग्यांनी लाकडी खुर्चीवर सरळ बसून केल्यास हरकत नाही.

आता आपल्या एका हाताचा अंगठा नाकाच्या एका बाजूच्या नाकपुडी बाजूस ठेवून इतर बोटांनी दुसरया बाजूच्या नाकपुडीस बंद करा. यावेळी एक नाकपुडी बंद व दुसरी खुली राहील.

हात खांद्याच्या खालीच असू द्या. केल्यास यामध्ये वेदना वाढू शकतात. हातांना हलकेच ठेवा.

आता खुल्या नासिकेने श्वास घेवून दुसऱ्या बंद नासिकेस श्वास सोडण्यास खुले करा. हे पहिले चक्र पूर्ण होईल हि क्रिया ५-१० वेळा पुन्हा करीत सराव करा.

आता दुसरा हात ठेवून पूर्वीच्या स्थिती सारखा अंगठा दुसऱ्या बाजूस ठेवून आन्धीची बंद नासिका उघडी ठेवा व दुसरी बंद करा. श्वास भरून घ्या व बंद नासिकेने श्वास सोडून घ्या. हि क्रिया ५-१० वेळा करीत सराव करा.

दोन्ही बाजूनी सराव पूर्ण करून झाल्यावर पुन्हा पद्मासनात बसा घ्या प्राणायामाचा सराव 3 मिनिटांपासून ते १५ मिनिटांपर्यंत वाढवीत जावे.

जे डाव्या बाजूची नासिका असते ती चंद्राची उर्जा दाखवते. जो शांतीचा प्रतिक मानल्या जातो. याचा प्रभाव थंड असतो त्यामुळे शरीर शांत व ताप रहित होते. यामुळे शरीरातील विविध नाड्या मोकळ्या होतात त्यामुळे याचा सराव नक्कीच फायदेशीर ठरतो.

त्यामुळे अनुलोम विलोम प्राणायाम फलदायी आहे. यातील डाव्या बाजूच्या नासिकेस बंद करून उजव्या बाजूच्या नासिकेने श्वास घेणे व बंद असलेली डावी नासिका उघडून श्वास सोडणे हे पहिले चक्र मानल्या जाते. हीच प्रक्रिया दुसऱ्या नासिकेकडून करून प्राणायामाचा अभ्यास नियमित व त्याचा वेळ वाढवीत जावे जे आपल्या आरोग्यास उपयोगी आहे.

सुरवातीस हे चक्र हळू हळू पूर्ण करावेत. श्वास घेणे व सोडण्याची गती नियंत्रित असावी हे नेहमी लक्षात ठेवा कि श्वास सोडण्याची गती हि श्वास घेण्याच्या दुप्पट असावी.

अभ्यास

या प्राणायामात पद्मासनात बसून डोळे बंद करणे जरुरी आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील मूलाधार चक्रांना गती मिळते. त्यामुळे शरीरातील सर्व प्रक्रिया नियमित होतात.

अनुलोम विलोम प्राणायाम करायचे फायदे

वैज्ञानिकांनीही या प्राणायामाचे फायदे मान्य केलेले आहे. त्यांच्या मते मश्तीष्कातील चेता कोशिकांना बळ मिळते. डाव्या बाजूचा मेंदू रचनात्मक क्रियांवर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे स्मरण व विचार शक्ती कार्यान्वित होते.

उजव्या बाजूचा मेंदू साठविलेल्या माहितीच्या आधारे क्रियांना प्रतिसाद देतो. यासाठी प्राणायामाचा यास फार उपयोग होतो.

अध्ययनात सिद्ध झाले आहे कि डाव्या बाजूची नासिका बंद असते तेव्हा उजव्या बाजूचा मेंदू कार्यान्वित होतो व उजव्या बाजूची नासिका बंद केल्यास डाव्या बाजूचा मेंदू कार्यान्वित होतो.

दररोज याचा सराव नियमित केल्यास शरीरातील विविध नाड्या शुद्ध होतात. शरीर अधिक शांत व शक्तिशाली बनते.

या प्राणायामाच्या नियमित सरावामुळे वातासंबंधी रोग ठीक होतात. शरीरातील सांधे दुखी, गाउट, सर्दी आणि प्रजनन अंगांशी सबंधित रोग ठीक होतात.

रोज अनुलोम विलोम केल्यास उच्च रक्त दाबाची समस्या दूर होते. मधुमेहात अत्यंत लाभदायक फायदे होतात.

मासपेशिसबंधित रोगांनाही हे ठीक करत ह प्राणायाम ऑर्थरायटीस साठी फारच उपयोगी मानल्या जातो. एसिडीटी साठी हि फार लाभदायी आहे.

जर तुम्ही सकारात्मक विचार मनात आणून हा प्राणायाम नियमित केल्यास मानसिक ताण दबाव, चीडचीडेपणा, राग, चिंता, उच्च रक्तदाब यापासून नक्कीच मुक्ती मिळते.

निद्रानाशावर हे एक रामबाण उपाय मानल्या जाते.

यामुळे मनाचे धैर्य वाढते कोणतेही काम करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. ऋचि वाढते.

सकारात्मक उर्जा वाढते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

शरीरातील रक्तात ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिसळल्या जाते.

आपल्याला ताप, मानसिक दबाव, कानाशी सबंधित व्याधी, यापासून मुक्ती मिळते.

शरीरात रक्ताचे संचालन सुदृढ होते.

नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळते.

चयापचयात सुगमता येते.

एसिडीटी , ग्यास अपचन, एलर्जी, अस्थमा सारख्या रोगांवर लवकर आराम मिळतो.

तुम्ही अनुलोम विलोम दररोज करायला सुरुवात करा. सकाळची वेळ यास सर्वोत्तम मानली जाते. मोकळ्या जागेत केल्या गेल्यास चांगला लाभ मिळतो. सकाळी खाली पोट असतांनाच करावे.

टिप्स

हे प्राणायाम नेहमी पूर्वमुखी व उत्तर मुखी असतांनाच करावे.

आसनावर बसूनच करावे.

याशिवाय मान डोके आणि छाती सरळ रेषेत आहे कि नाही याची काळजी नक्की घ्यावी.

आंघोळी नंतर व जेवणा नंतर हे प्राणायाम करू नये.

हे पण नक्की वाचा :-

  1. भस्त्रिका प्राणायाम
  2. बाह्य प्राणायाम

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Anulom-vilom Pranayam चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा अनुलोम – विलोम प्राणायाम / Anulom-vilom Pranayam तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Anulom-vilom Pranayam in Marathi – अनुलोम – विलोम प्राणायाम  या लेखात दिलेल्या अनुलोम – विलोम  प्राणायामच्या फायद्यांन  –Anulom-vilom बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here