Baba Ramdev Yoga
पद्मश्री बाबा रामदेव हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात योग पोहोचवणारे एक योग महर्षी आहेत. त्यांच्या विविध योग प्रकारांचा अभ्यास करून चांगले आरोग्य आणि आनंदमयी जीवन जगू शकतो. रामदेव बाबांनी योगाचे प्रमुख प्राणायाम सांगितले आहेत ज्यांचा वापर आपण केल्यास आपल्या शरीर व मनाची शुध्दी होते.
बाबा रामदेव यांचा योगा – Baba Ramdev Yoga In Marathi
रामदेव बाबांचे प्राणायाम प्रकार – Pramayam type of Ramdev Baba
बाबा रामदेवांनी प्राणायामास योगातील एक विशेष स्थान मिळवून दिले आहे. ही श्वासनियंत्रण व शरीर शुध्दीची एक जटील प्रक्रिया आहे, योगाभ्यासाने प्राणायामात प्राविण्यता मिळवता येते.
1) कपालभाती प्राणायाम / kapalbhati Pranayama –
श्वासास नियमीत व नियंत्रीत पध्दतीने घेउन सोडायचे असते. त्यामुळे पोटातील श्वसनाचे व आंतरीक विकार नष्ट करण्याची क्षमता या प्राणायामात आहे.
2) अनुलोम विलोम प्राणायाम / Anulom vilom Pranayama –
अनुक्रमाने एक एक नासिकेने श्वास घेणे व दुसरी नासिका बंद ठेवून नंतर बंद नासिका मोकळी करून श्वास त्याने सोडावा याच्या नियीमत अभ्यासाने आपण शरिराच्या आंतरीक संस्थांच्या कार्यात वृध्दी आणि निरोगता आणल्या जाते. शरीर आंतरीक दृष्टया शुध्द व निर्वीकार बनतो. मानसिक सक्षमता वाढते, निर्णय क्षमता वाढते. याचा नियमित सराव आवश्यक आहे.
3) उध्दित प्राणायाम / Udgeeth Pranayam –
यात श्वासास नियंत्रीत स्वरूपात आत घेवून सोडतांना ओमकार जपाचा उच्चार करायचा आहे. जप करतांना कंठातून ध्वनी काढण्याचा प्रयत्न करावा. ओमकाराचा सूर लांबवावा त्यामूळे मनातील सर्व विचार शुध्द आणि शरीराच्या सर्व नलीका व वाहीन्यांनमधे शुध्दता येउन रक्ताभिसरण योग्यरित्या होण्यास मदत मिळेल. श्वास सोडण्याचा काळ 1 मिनीट पर्यंत वाढवता येतो. 15 – 20 मिनीटे याचा सराव फार फायदे देणारा ठरतो.
4) बाहय प्राणायाम / Bahya Pranayama –
याच्या नामावरूनच स्पष्ट होते की हा प्राणायाम करतांना श्वास बाहेर सोडावा लागतो. जलद गतीत श्वास घेउन नासिकांनी श्वास सोडल्या जातो. यामुळे श्वासासंबंधी रोगांमध्ये बळ मिळते. विविध संस्थांचे कार्यसंचालन निट होण्यास मदत मिळते. स्वभावात शांतता व सुनियंत्रण येते. त्यामूळे प्रत्येक काम करण्याची ईच्छा वाढते.
5) भ्रामरी प्राणायाम / Bhramari Pranayama –
या प्राणायामात श्वास घेणे व सोडत्यावेळी माशांच्या गुणगुणल्यासारखा आवाज होतो म्हणून यास भ्रामरी प्राणायाम असे म्हणतात. याचा परिणाम मानसिक अवस्थेवर होतो. मन मानसिक दृष्टया शुध्द आणि शांत होते. त्यामूळे निर्णयक्षमता वाढते. मन प्रफुल्लीत होते.
6) भस्त्रिका प्राणायाम / Bhastrika pranayama –
यात जलद गतीने श्वास घेतला जातो तर त्याच्या दुप्पट गतीने श्वास सोडला जातो. हा प्राणायाम युवावर्गासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. आधी हळूहळू नंतर जलदगतीने याचा सराव फार लाभदायक ठरतो. आपली ईच्छाशक्ती प्रबळ होते, काम करण्याची मानसिक व शारिरीक क्षमता वाढून व्यक्ती मजबूत बनते.
या सर्व प्राणायामांचा रोज अभ्यास केल्यास आपले शरीर नेहमी मजबूत आणि तंदूरूस्त राहाते. साधारण मानव कोणताही प्राणायाम मोकळया हवेत बसून करू शकतो. दररोज 5 ते 10 मिनिटे या प्रत्येक प्राणायामांचा सराव तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतो. दररोज अर्धा तास प्राणायाम आपणांस स्वस्थ व आनंददायी बनवितात.
रामदेव बाबांच्या प्राणायामांपासून होणारे फायदे – Baba Ramdev Yoga Benefits
- रोज योगाभ्यासात प्राणायामांचा अभ्यास केल्यास फुफ्फुसाची क्षमता वाढून ते निरोगी होतात त्यामुळे श्वासाच्या विविध रोगांपासुन मुक्ती मिळते.
- उच्च रक्तदाबात आणि रक्तदाबाची समस्या दुर होते.
- शरीर आंतरीक दृष्टया शुध्द आणि स्वस्थ होते.
- शरीराचे बाहयांग शुध्द व क्रियाशिल होतात.
- हृदयासंबंधी आजारांपासुन मुक्ती मिळते.
- रक्तशुध्दीकरण होते व रक्तात आॅक्सीजनचा पुरवठा वाढून शरीर शुध्द होते.
- प्राणायाम रोज केल्याने चांगली झोप येईल.
- रक्ताभिसरण शुध्दरूपात होते.
- सर्व चिंतापासुन लढण्याची मानसिक क्षमता वाढते.
- ध्यान केंद्रीत होते.
- पचनक्रिया मजबूत होते.
- राग, व्देष आणि अपायकारक भावनांची निर्मिती होत नाही.
हे पण नक्की वाचा :-
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी रामदेवबाबांच्या प्राणायामा चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा बाबा रामदेव यांचा योगा – Baba Ramdev Yoga च्या बद्दल लेख तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.
Very Nice Information.