Baby Corn Pakoda
सकाळच्या वेळी नाश्त्याला काय बनवायचे हा प्रत्येक घरातल्या गृहीणीला पडणारा रोजचा प्रश्न! नाश्ता दमदार केला असेल तर संपुर्ण दिवस फ्रेशनेस तर राहातोच शिवाय एनर्जी टिकुन राहायला मदत मिळते.
बेबी काॅर्न पकोडा एक उत्तम अल्पोपहार ठरू शकतो. भारतीय पध्दतीने बनलेल्या या बेबी काॅर्न पकोडयाला मीरची आणि लसणाच्या घट्ट घोळात पुर्णपणे भिजवुन गरमागरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळल्यास कुरकुरीत पकोडे तयार . . .
बेबी काॅर्न पकोडे बनविण्याची विधी – Baby Corn Pakoda Recipe

Ingredients of Baby Corn Pakoda
बेबी काॅर्न पकोडा साठी लागणारी सामग्री:
- 1 चमचा काॅर्नफ्लाॅवर
- 12 ते 15 बेबी काॅर्न
- 1 कप कणीक
- पकोडे तळण्यासाठी तेल
- 1 चमचा बेसन
- 3, 4 लसणाच्या पाकळया
- 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या
- आल्याचे तुकडे
- आवडीनुसार कोथींबीर
- चिमुटभर बेकिंग सोडा
- चवीनुसार मिठ
- 1 चमचा गरम तेल
- अर्धा चमचा चाट मसाला ( ऐच्छिक )
- 2 लहान कांदे ( वरून सजावटीकरता )
Baby Corn Pakoda Recipe
बेबी काॅर्न पकोडा बनविण्याचा विधी:
बेबी काॅर्न ला धुवून मउ कापडावर वाळण्याकरता ठेवावे आणि त्यानंतर लहान लहान तुकडयांत कापुन घ्यावे. आता मोठया भांडयात वरील सर्व पीठ लसुण अद्रक आणि मिरची एकत्र करून घ्या, त्यात थोडे पाणी घालुन घट्ट पेस्ट बनवावी, ही पेस्ट बनवतांना त्यात गोळे राहायला नको ही खबरदारी घ्या. कमीत कमी 5 मिनीट चांगले फेटून घ्यावे ज्यामुळे घोळ चांगला तयार होईल. आता या मिश्रणात थोडे गरम तेल, कोथींबीर, मीठ, आणि सोडा टाकावा व मिक्स करून घ्यावे.
आता कढईत तेल गरम करून घ्या, थोडेसे मिश्रण तेलात घालुन तेल गरम झाले आहे की नाही ते पाहुन घ्या. मिश्रण तेलात वर आल्यास तेल गरम झाले आहे, आता गॅस कमी करा. बेबी काॅर्न घेउन तयार घोळात बुडवा पुर्णपणे बेबी काॅर्न घोळात बुडल्यावर गरम तेलात सोडा.
सर्व बेबी काॅर्न याच पध्दतीने तेलात तळुन घ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळल्यावर पेपर नॅपकीन वर काढुन घ्या जेणेकरून तेल शोषले जाईल. पकोडयांना हिरव्या कापलेल्या पातीच्या कांदयाने सजवा आणि गरमागरम बेबी काॅर्न पकोडयांना टोमॅटो कॅचप बरोबर सव्र्ह करा.
लक्ष्य दया: Baby Corn Pakoda Recipe – बेबी काॅर्न पकोडे बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्