Banana Beauty Tips
फळांमध्ये मोठया प्रमाणात व्हिटामिन्स असतात हे तर आपण जाणतो पण फळं प्रत्येकाच्या खिशाला परवडतातच असं नाही. त्यातल्या त्यात केळ हे असं फळ आहे ज्यात मोठया प्रमाणात विटामीन्स तर असतातच आणि ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असं फळ आहे.
सौंदर्याकरता केळाचा उपयोग – Banana Beauty Tips in Marathi
पिकलेलं केळ हे सुप्रसीध्द फळ तर आहेच शिवाय प्रत्येक मौसमात हे सहज उपलब्ध असतं. केळ हे स्वास्थ्यवर्धक फळ असुन व्हिटामीन A, B, C ने परीपुर्ण आहे शिवाय पोटॅशियम, झिंक, आणि आयर्न सुध्दा यात विपुल प्रमाणात आढळतं. रोजच्या दैनंदिनीत केळाचा वापर आपण करायलाच हवा, केळाचा उपयोग सौंदर्यवाढीकरता देखील आपण करू शकतो, आश्चर्य वाटलं नं ? हो केळाचा उपयोग सौंदर्याकरता कसा करता येतो हे आता आपण माहिती करून घेउया.
1. अर्धे कच्चे केळ घ्या त्याला पेस्ट सारखे बनवुन चेहे-याला आणि मानेला लावा, 20 ते 30 मिनीटांपर्यंत राहुदया, नंतर कोमट पाण्याने चेहेरा धुवुन घ्या. कोरडया त्वचेकरता हा एक उत्तम उपाय आहे याचा वापर केल्यास त्वचा मउ होण्यास मदत मिळते. जर तुमची त्वचा जास्त प्रमाणात कोरडी असेल तर या केळासोबत तुम्ही मध सुध्दा मिसळुन चेहे-याला लावु शकता. चेहे-यावर जर काळे डाग असतील ते सुध्दा हे मिश्रण लावल्याने निघुन जातात.
2. जर डोळे सुजले असतील तर अर्धे केळ कुस्करून सुजलेल्या डोळयांवर लावावे. 10 ते 15 मिनीटांपर्यंत एका जागी बसुन राहा त्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवुन घ्या, सुज गायब झालेली असेल.
3. पिकलेल्या केळाला चांगले कुस्करा त्यात 4 चमचे लिंबाचा रस घाला चांगल्या त-हेने एकत्र करून हे मिश्रण चेहे-याला आणि गळयाला लावा. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवुन घ्या. याने चेहेरा चमकदार होईल शिवाय त्वचेला झळाळी प्राप्त होईल हा फेस पॅक चेहे-यावरील डाग कमी करण्यास देखील असरकारक आहे.
4.पिकलेल्या केळाला चांगले कुस्करून त्यात साखर घाला या मिश्रणाला चेहे-यावर लावुन चांगली मसाज करा, त्यानंतर चेहेरा धुवुन घ्या हा उपाय आपल्या करता नैसर्गिक स्क्रब चे काम करेल. केळ त्वचा नरम मउ होण्यास सहाय्यक आहे तर साखर चेहे-यावरच्या मृत पेशी दुर करण्यास मदत करते.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Banana Beauty Tips असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा सौंदर्याकरता केळाचा उपयोग – Banana Beauty Tips तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.
नोट: सौंदर्याकरता केळाचा उपयोग – Banana Beauty Tips या लेखात दिलेल्या घरगुती उपायाबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.