Home / Recipes / बटाटा वडा बनविण्याची विधी | Batata Vada Recipe

बटाटा वडा बनविण्याची विधी | Batata Vada Recipe

Aloo Bonda – आलु बोंडा किंवा बटाटा वडा Batata Vada खास करून मुंबईत बटाटा वडा म्हणुन फार प्रसिध्द आहे. बटाटा आणि बेसनाच्या या तळलेल्या गोळयांना लोक फार चवीने खातात. आम्ही घेउन आलोय तुमच्या साठी बटाटा वडयाची खास रेसीपी.

बटाटा वडा बनविण्याची विधी – Batata Vada Recipe

Batata Vada Recipe
Batata Vada Recipe

Ingredients of Batata Vada
बटाटा वडासाठी लागणारी सामग्री:

  • बटाटे – 2 मोठे उकडलेले
  • 1 , 2 हिरव्या मिरच्या बारीक कापुन
  • कोथींबीर कापुन
  • 100 ग्रॅम बेसन
  • स्वादानुसार मिठ
  • पाव चमचा गरम मसाला पावडर
  • हळद
  • जिरे 1 चमचा
  • बेकींग सोडा

Batata Vada Recipe
बटाटा वडाबनविण्याचा विधी:

सर्वप्रथम बटाटयाचा गर एकजीव करून घ्यावा. गॅसवर पॅन ठेवुन थोडं तेल घेउन त्यात जिरे हळद, कापलेली हिरवी मिरची, गरम मसाला, मिठ टाकुन नंतर बटाटयाचा गर टाकून 2 ते 3 मिनीटे होउ द्या. गॅस बंद करून हे मिश्रण थंड होवु दया. बटाटयाच्या या चटणीचे गोळे बनवुन घ्यावेत एका भांडयात बेसन पाणी टाकुन घट्ट भिजवुन घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा व हळद घालावी.

कढईत तेल गरम करून बटाटयाचे गोळे बेसनात बूडवुन तेलात टाकावे. लक्षात ठेवा की गोळे पुर्णपणे भिजले पाहीजे. सोनेरी होईपर्यंत तळुन घ्यावेत. यास पुदीन्याच्या चटणी किंवा चिंचेच्या चटणी सोबत गरमा गरम खायला द्या.

Read More:

लक्ष्य दया: Batata Vada – बटाटा वडा रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Check Also

Matar Paneer

मटर पनीर बनवण्याची विधी – Matar Paneer Recipe in Marathi

Matar Paneer Recipe in Marathi मटर पनीर एक उत्तर भारतीय डीश असुन ज्याला हिरवे मटर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *