उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल | Beauty Tips For Summer

Beauty Tips For Summer

उन्हाळा सुरू होताच तीव्र उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करतात. सर्वदुर उन्हामुळे जीव नुसता पाणी पाणी करत असतो या दरम्यान प्रत्येक सजीवाने स्वतःची काळजी घ्यायला हवी. उन्हापासुन सुरक्षेचे उपाय अमलात आणायला हवेत जेणेकरून उन्हाळा जास्तीत जास्त सुसहय कसा होईल याबद्दल विचार व्हायला हवा.

Beauty tips Summar

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल – Beauty Tips In Marathi For Summer

उन्हाळा सुरू झाला की आपल्या त्वचेची आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं उन्हाच्या उष्ण्तेमुळे आपल्या त्वचेला बरच नुकसान होण्याची शक्यता असते. साधारणतः उन्हाळयात प्रखर काटेदार उष्णता, फंगल इन्फेक्शन, शरीराची दुर्गंधी, सुर्याची प्रखर उष्णता, या समस्या उद्भवु शकतात, यातही ज्यांची त्वचा तैलीय आहे त्यांना जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं कारण उष्णतेमुळे त्यांच्या त्वचेवरचे तेल संपुर्ण शरीरावर पसरू लागते. या समस्यांकरता खाली काही उपाय दिले आहेत जे अमलांत आणुन आपण ब-याच अंशी या समस्यांपासुन सुटका करून घेउ शकता.

उष्णतेपासुन त्वचेला वाचवण्याचे उपाय

उष्णतेपासुन स्वतःचे संरक्षण करण्याचा सगळयात महत्वाचा उपाय म्हणजे भरपुर प्रमाणात पाणी पिणे. कारण सुर्याची उष्णता आपल्या शरीरातील पाणी जास्त प्रमाणात शोषुन घेते म्हणुन उन्हाळयात पाणी, फळांचे ज्युस, नारळ पाणी, ताक, लिंबाचे सरबत, असे पेय प्यायला हवेत. मौसमी फळ जसे टरबुज, खरबुज, काकडी आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. अॅसीडयुक्त पेयांपासुन दुर राहावे कारण हे आपल्या शरीराकरता हानीकारक तर असताततच शिवाय आपल्या त्वचेला सुध्दा याने हानी पोहोचते.

उन्हाळयात कमीत कमी 2 वेळा अंघोळ करून आपण उन्हापासुन आपले संरक्षण करू शकता.

शक्यतोवर 11 ते 3 या कालावधीत उन्हात बाहेर पडुच नये. पडावेच लागले तर छत्री, गाॅगल, स्कार्फ, याचा उपयोग करावा. प्रखर उन्हात बाहेर पडतांना सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नये. हे कधीही विसरता कामा नये की सुर्याची प्रखर किरणं थेट आपल्यावर पडल्यास अनेक शारीरीक समस्यांना आपल्याला तोंड दयावे लागू शकते.

कधीही आपण बाहेर असु तर सोबत नेहमी सनस्क्रिन लोशन ठेवावे. प्रखर उन्हात बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास अगोदर सनस्क्रिन लोशनचा उपयोग करावा, नेहमी चांगल्या कंपनीच्या सनस्क्रिन लोशनचाच वापर करावा आणि वापरण्यापूर्वी त्याला लावण्याचे नियम वाचुनच उपयोगात आणावे.

उन्हाळयात शक्यतोवर गडद मेकअप टाळावा. नेहमी हलका आणि साधारण मेकअप करून बाहेर पडा, आणि जेव्हांही मेकअप चे सामान खरेदी कराल तर पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या मेकअप सामानांना प्राथमिकता दया, डोळयांचे संरक्षण करण्याकरता नेहमी वाॅटर प्रुफ आयलायनरचाच उपयोग करा आणि उन्हापासुन वाचण्याकरता आईल फ्रि अर्थात बिना तेलाच्या क्रिमचाच उपयोग करा.

उन्हापासुन वाचण्याकरता काही घरगुती उपाय:

 • मुल्तानी मातीत गुलाबजल मिसळुन आठवडयातुन किमान 3 ते 4 वेळा चेहे-याला लावावी.
 • पाणी जास्त असलेले फळ घेउन आपल्या घामोळयांना लावावे जास्त गरमी असल्यास आपण आठवडयातुन 4 ते 5 वेळा हा उपाय करू शकता.
  तोंडात फोड होणे.
 • कोबी ला पाण्यात उकळावे आणि दिवसातुन किमान 1 वेळा त्या पाण्याला प्यावे याने तोंडातील फोडांपासुन सुटका मिळेल. परंतु समस्या गंभीर असेल तर ताबडतोब दातांच्या डाॅक्टरला दाखवायला हवे.

फंगल इन्फेक्शन

 • उन्हाळयात आपल्या त्वचेची काळजी घेण्याकरता दिवसातुन किमान 2 वेळा अंघोळ करावी.
 • उन्हाळयात शक्यतोवर बुटाचा वापर टाळावा. अशी चप्पल किंवा सॅंडल वापरावी ज्यामुळे आपल्या पायांना हवा लागु शकेल.
 • उन्हाळयात काॅटनचे कपडे वापरावे. टाईट जिन्स् किंवा ब्लाउज वापरू नये.
 • फंगल इन्फेक्शन संबधीत गंभीर समस्यांकरता त्वचाविशेषज्ञाला भेटावे.

प्राकृतिक उपाय:

 • गुलाबजल मधे नैसर्गिक गुणधर्म असतात आणि गुलाब जल आपल्या त्वचेकरता लाभकारक देखील आहे. काॅटन कपडयाला गुलाबजलात बुडवुन त्वचेला लावा याने आपली त्वचा फ्रेश राहील.
 • काकडीचा रस आणि टरबुजाचा रस यांना समान प्रमाणात घेउन चेहे-याला लावा. लावण्यापूर्वी रसाला फ्रिजमध्ये ठेवा.
 • शक्यतोवर उन्हाळयाकरता समरपॅक घरीच बनवावा.
 • टरबुजाचे आणि खरबुजाचे छोटे छोटे तुकडे करून चेहे-याला लावावे 20 मिनीटांनंतर चेहरा धुवावा.
 • काकडीला कापुन दहयात मिसळुन चेह-याला लावल्यास चेहरा आणि आपल्या त्वचेला ताजेपणाचा अनुभव मिळतो.
 • बेसन आणि दहयाचे मिश्रण चेहे-याला लावावे. 20 मिनीटांपर्यंत ठेवुन थंड पाण्याने चेहरा धुवावा.
 • शक्यतोवर घरी बनवलेल्या वस्तुंचाच उपयोग चेहे-याकरता करावा.
 • आपल्या चेहे-याला सुर्याच्या थेट संपर्कात येण्यापासुन वाचवावे.
 • या सर्व उपायांनी आपण ब-याच प्रमाणात उन्हापासुन संरक्षण मिळवु शकता.

नक्की वाचा:

 1. Marathi Ukhane For Bride
 2. Marathi Ukhane For Groom

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Beauty Tips For Summerअसतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल – Beauty Tips For Summer तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल – Beauty Tips For Summer या लेखात दिलेल्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल याबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here