बी स्टींग केक… रेसिपी

Bee Sting Cake

चवीचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याला माहितीये.वेगवेगळया रेसिपी तयार करून खाउ घालणे हा ब-याच गुहीणींचा आवडता छंद असतो, लहान मुलांनाही रोजच्या खाण्यात वेगळेपणा असला तर मजा येते.लागणारे जिन्नस तेच पण पदार्थ वेगळा तयार झाला तर खुप आनंद! खाणा-यालाही आणि करणा-यालाही….

आज आपण चव घेणार आहोत बी स्टींग केक ची. केक ! हा असा पदार्थ आहे जो लहानांपासुन मोठयांपर्यंत सगळयांनाच आवडतो.जन्मदिनाला तर केक हवाच.चला तर पाहुया कसा बनवायचा हा केक.

बी स्टींग केक… रेसिपी – Bee Sting Cake… Recipe

Bee Sting Cake

बी स्टींग केक रेसिपी मराठीमध्ये – Bee Sting Cake Recipe In Marathi

Ingredients of Bee Sting Cake
बी स्टींग केकसाठी लागणारी सामग्री:

यीस्ट डोह करता

 • 2 कप मैदा
 • 1 कप गरम पाणी
 • 1 चमचा ड्राय यीस्ट
 • 2 चमचे साखर
 • 1 चमचा व्हेनीला इसेन्स.

टाॅपींग करता

 • 2 टेबलस्पुन बटर
 • 2 टेबलस्पुन मध
 • अर्धा कप बदामाचे काप
 • 2 टेबलस्पुन क्रीम
 • फिलींग करता
 • 2 कप दुध
 • पाव कप व्हेनीला कस्टर्ड पावडर
 • अर्धा कप साखर,अर्धा कप बटर

Bee Sting Cake Recipe
बी स्टींग केक बनविण्याचा विधी:

यीस्ट डोह

एका मोठया भांडयात मैदा घेउन मध्यभागी बोटाने खड्डा बनवावा आणि साखर व यीस्ट टाकावे.कोमट दुध टाकुन नरम होईपर्यंत मळुन घ्यावे.झाकुन एकीकडे ठेवावे थोडयावेळात हे फुगुन दुप्पट होईल.

टाॅपिंग ची विधी

बटर, साखर,आणि क्रीम एकत्र करून एका पॅन मधे उकळी येईपर्यंत गरम करा बदामाचे काप टाका आणि थंड होण्याकरता ठेवुन दया.

फिलींग करता

थंड दुधात टाकुन उकळा, साखर आणि बटर टाका घट्ठ हाईपर्यंत मिश्रण हलवत राहा, थंड होण्याकरता ठेवा.

फिनीशिंग

सर्वात आधी आपण मैदयाच्या कणकेला भिजवुन ठेवले होते ती कणीक घेउन आता स्विस रोल टिन किंवा बेकिंग ट्रे मधे पातळ आणि त्रिकोणी आकारात लाटुन ठेवा यावर तयार केलेली टाॅपींग पसरवा, 20 मिनीटांपर्यंत असेच राहु दया.

प्रीहीटेड ओव्हन मधे 200 डिग्री सें. वर 12 ते 15 मि. पर्यंत ठेवा.केक चे तुकडे करा, प्रत्येक तुकडयाला मधुन कापुन त्यात तयार करून ठेवलेले कस्टर्ड फिलींग घट्ठसर लावा आणि आता यावर केकचा दुसरा तुकडा ठेवा.

नक्की,करून पाहा हि रेसिपी आणि आपला अभिप्राय आंम्हाला कळवायला विसरू नका, आणि अशेच काही लेख पाहण्यासाठी  आमच्या माझी मराठी ला आवर्जून भेट दया.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here