बदामचे गुणकारी फायदे

Badamache Fayde

पूरातन काळापासुन लोक बदामचे सेवन करत आहेत, व त्यांच्या गुणांचा फायदा घेत आहेत. खास करून बुद्धीची क्षमता वाढावी यासाठी बदामचे सेवन जास्तीत जास्त केल्या जाते .

बदाम – Almonds हा एक सुकामेवा आहे. हे फार गुणकारी व शरीर उर्जावर्धक मानले जाते. प्राचीन काळापासुन इजिप्तमध्ये तसेच आशियाई देश यामध्ये मुख्यतः आपल्या भारत देशात बदाम फार आवडीने सेवन केल्या जातो . भारतीय आयुर्वेदात बदामाचे औषधीगुण फार महत्वाचे मानले जातात.

आयुर्वेदानुसार बदाम हा प्राकृतिक गुणांचा भंडार आहे. यात अनेक खनिजे व पोषकतत्व असतात. बदाम मधुमेह आणि अल्झायमर सारख्या रोग टाळण्यासाठी अगदी लाभदायी मानल्या जाते.

बदामाचा वापर वेगवेगळया प्रकारे केला जातो. याचा वापर गुणकारी खाद्यपदार्थ म्हणून केला जातो. यास आपण सरळ खावुनही पोषकतत्वे मिळवू शकतो.

बदामचे गुणकारी फायदे – Benefits of Almonds in Marathi

Benefits of Almonds

Almonds चा वापर वेगवेगळया प्रकारे केला जातो. याचा वापर गुणकारी खाद्यपदार्थ म्हणून केला जातो. यास आपण सरळ खावुनही पोषकतत्वे मिळवू शकतो.

  • बदाम तेलाचा वापर केसांसाठी पोषक मानला जातो. केसाची काळजी घेण्यासाठी हे उत्तम मानल्या जाते.
  • बदामाची पावडर बाॅडी लोशन आणि कोल्ड क्रिम म्हणूनही वापरता येते. कच्च्या दुधात याची पेस्ट करून त्वचेवर लावल्यास त्वचा कोमल व चमकदार बनते.
  • चेह-यावर बदाम पावडर व मध आणि कच्चे दुध मिसळून लावल्यास थंडीत चेहरा कोमल व ताजातवाना होतो.
  • शरीरात कोलेस्ट्राॅलचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यास नियमित बदाम सेवन केल्यास फायदा होतो.
  • वजन कमी करण्यास बदाम लाभदायी मानले जाते.
  • शरीरातील चरबी कमी करण्यास बदाम लाभदायी मानल्या जाते. यात कमी कॅलरी असतात व हे एक नैसर्गिक पोषक असल्यामुळे डायटिंगमध्ये याचे सेवन लाभकारी ठरते.
  • जास्त भुकेची समस्या दुर होते. दिवसभर 2, 3 बदाम खाल्ल्यास फार भुक लागत नाही त्यामुळे आहार कमी केला असल्यास फायदा होतो.

बदाम खाल्याने बरे होणारे रोग – Almond’s Role in Non-Communicable Diseases

1. रक्तदाब –

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी योग्य प्रमाणात सेवन केल्यास नैसर्गिकरीत्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते .शरीरातील विविध नाडयांच्या क्रियागमनात सकारात्मकता आणतो.

2 . मधुमेह –

डायबिटीज असलेल्या रुग्णांनी रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्याने शरीरातील शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढत नाही. आणि थकवा कमी होण्यासाठी मदत होते .
बदाम प्राकृतिक दृष्टया साखर युक्त नसते त्यामुळे याचा वापर मधुमेहीरोगी चांगल्या प्रकारे करू शकतात.

बदाममधील प्रतिरोधके हुद्याच्या कार्यावर परिणाम करून त्यात उपयुक्त सुधार करतात. त्यामुळे रक्तातील साखर शरीराबाहेर टाकल्या जाते त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. शरीरात ईन्सुलिन प्रतिरोधक शक्तीस नियंत्रीत करतो त्यामुळे रक्तात शर्करेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

3 .पचनक्रिया मंदावणे –

जर व्यक्तीची पचनक्रिया मंदावली असेलतर बदाम ख्ल्ल्याने त्यात बरीच सुधारणा होते.

बदामात जीवनसत्वे A हे फारच उपयोगी ठरतात. या जिवनसत्वांमुळे अन्नपचनात मदत मिळते रोज 1-2 बदाम सेवन केल्यास पचनक्रिया सुकर आणि नियंत्रित होते. शरीरातील पचनतंत्रात बिघाड निर्माण करणा-या हानिकारक जिवाणुंना नष्ट करण्यास साहाय्यक ठरतो. बदामाची साल आतडयांच्या संप्रेरकांना नियीमत व नियंत्रीत स्वरूपात स्त्रवण्यास मदत करते. 2014 साली इंस्टीट्यूट ऑफ फुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी चायना ने अध्ययनातुन हे सिध्द केले की बदाम शरीरात पचनास लाभदायक जीवाणुंना वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे अन्नपचनात चांगली मदत मिळते.

4 . कोलेस्ट्रोल –

बदामातील अँटिऑक्सिडंट घटका मुळे शरीरातील कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते.

Almonds मधील खनिजतत्व शरीरातील विविध पोषकतत्वांना शोषणास मदत करतो त्यामुळे शरीरास आवश्यक पोषकतत्व शोषुन त्याचे योग्य पोषण प्राप्त केले जाते यामुळे शरीराचा स्तर नियंत्रीत केला जातो.

शरीरातील कोलेस्ट्राॅलचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यास मदत मिळते. शरीरात पाचनतंत्रात सुधारणेतही बदात मदत करतो. शरीरातील हानिकारक आम्लांची निर्मीती होउ देत नाही.

5. लट्ठपणा –

नियमित बदामाचे सेवन केल्याने लट्ठ पणा कमी होण्यास मदत होते, त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाही.

बदामात नियंत्रित स्वरूपात उष्मांक असतो त्यामुळे याच्या सेवनाने शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त उर्जा निर्माण होत नाही तसे आवश्यक त्या पोषकांचा वापर शरीरात करता येतो यातील फॅटस् आणि डायेटरी फायबर मुळे वनज नियंत्रित करण्यास मदत मिळते. हे एक शर्करामुक्त पोषक असल्यामुळे आहार नियंत्रणासाठी याचे सेवन फार उपयोगी ठरते.

त्यामुळे भुकही नियंत्रीत केली जाते. कमी उष्मांक बराच वेळ शरीरास उर्जा देते त्यामुळे भुक कमी लागते.

2003 च्या इंटरनॅशनल जर्नल आॅफ ओबेसिटी च्या अध्ययनातून हे समजले की ज्या महिला रोज बदाम सेवन करतात त्यांचे वनज नियंत्रित व कमी असल्याचे आढळून आले.

6. बुध्दीची कार्यक्षमता वाढवण्यास सहाय्यक –

रात्रभर दुधात भिजवुन ठेवलेले बदाम सकाळी मुलांना दिल्यास त्यांच्या बुध्दीचा विकास चांगला होतो. लहान मुलांची बौध्दिक कार्यक्षमता वाढते. स्मरणशक्ती मजबुत होते, निर्णयक्षमता वाढते. युवा वर्गास मानसिक ताणतणावात बुध्दीच्या योग्य कार्यक्षमतेसाठी रोज बदामाचे सेवन लाभदायी मानल्या जाते. ज्या लोकांची दिनचर्या मानसिक काम जास्त असते त्यांनी नक्कीच बदामाचे सेवन करणे जरूरी आहे.

मेंदूच्या कोशीकांना पोषण देण्यासाठी आणि त्याचे कार्य योग्य गतीने चालण्यासाठी बदाम लाभकारी मानले जाते.

7. त्वचा स्वस्थ ठेवणे –

बदामाचे तेल उत्तम जीवनसत्व ई युक्त स्त्रोत मानले जाते त्यामुळे केसांच्या विविध व्याधींवर बदामतेल फार प्रभावी मानले जाते. याचे लोशन व क्रिम तिनही ऋतुंमध्ये त्वचेचे पोषण करते आणि त्वचेस स्वस्थ व आकर्षक बनवते.

त्वचारोगांवरही याचा वापर सध्या अध्ययनाखाली आहे तरीही त्वचा संक्रमणात बदाम पावडर व तेल विविध आयुर्वेदीक औषधीमध्ये आजही केला जातो.
उन्हाळयात सुर्याच्या किरणांच्या प्रभावाने त्वचा करपते त्यावर बदाम क्रिम व बदाम तेलाचा वापर होतो.

8. दातांना आणि हाडांना मजबुत बनविणे –

बदाममध्ये अनेक खनिजतत्व जसे मॅग्नेशियम आणि फॉंस्फरस चांगल्याप्रमाणात असतात यामुळे शरीरात पोषकतत्वांची निर्मिती होते जे दातांना व हाडांना मजबुत करतात.

दातांसाठी व हाडांसाठी बदामाचे सेवन फार फायदयाचे ठरते. त्यामुळे दात व हाडे मजबुत व निरोगी बनतात त्यामुळेच लहान मुलांना हे खायला देणे आरोग्यदायी मानल्या जाते.

9. कर्करोगात सहाय्यक –

बदामात गाम टोकोफेरॉल चे प्रमाण जास्त असते जे जीवनसत्व म् चा एक प्रकार आहे. यात भरपुर मात्रेत प्रतिरोधक तत्व असतात ज्यामुळे शरीरात कर्करोग निर्माण करणा-या कोशिकांना नष्ट करण्यास साहाय्यक ठरतो.

महिलांमध्ये स्तन कर्करोग, प्रोस्टेट ग्रंथिंचा कर्करोग, मलाशयाचा कर्करोग बरा करण्यास मदत होते.

या शिवाय कर्करोग पिडीत शरीरात बदाममधील प्रतिरोधके हानिकारक जीवाणुशी लढतात व त्यांचा प्रभाव कमी करतात.

इतर औषधी उपयोग :

  • गोड बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
  • बदाम शक्तिवर्धक, पित्तनाशक, वातनाशक आहे.
  • तोंडाला आतून फोड झाले असता बदाम बी दुधात उगाळून लेप लावतात.
  • उष्णतेच्या विकारांवर बदाम बी वापरतात.
  • डोकेदुखी, कोरडा खोकला, मस्तक दुर्बलता यांवर बदामाची खीर गुणकारी आहे.
  • बदामाचे लाडू शक्तिवर्धक असतात.

तुम्हाला हे माहित आहे का ?

  1. बदामाचे सर्वाधिक उत्पादन अमेरिकेत होते.
  2. प्राचिन काळापासुन इजिप्त मध्ये बदामाचा वापर केला जात आहे.
  3. बदाम मुख्यतः चेरी, बोर, सारखे एक फळ आहे.

बदामाच्या झाडाची माहिती – Badam Tree Information in Marathi

Almonds चे वैज्ञानिक नाव प्रूनस डुलसिस असून याचे खरे मूळ मध्य आशियात आहे.

बदामचे झाड हे मध्यम उंचीचे असून खोड जाड असते व छोट्या बागेसाठी ते फार उपयुक्त आहे. कारण याचा पसराव फक्त पाच मीटर होतो.

या झाडाला चारही बाजूला चार फांद्या फुटतात, थोडे वर वाढल्यावर पुन्हा टोकाला चारच फांद्या फुटतात; हे झाड सरळ वाढते.

पाने मोठी, पसरट, आकाराने गोल व हिरवीगार असतात.

याला हिवाळी ऋतूत फुलांचा बहार येतो, फुलांमध्ये पाच पाकळ्या, ज्या गुलाबी किंवा पांढर्‍या असू शकतात.त्या फुलांचेच नंतर फळात रुपांतर होते.

त्याला मध्ये तांबूस रंगाच्या शिरा असतात.

बदामाचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यानंतर लालसर पिवळ्या रंगाचे दिसते.

सालीचे आवरण खाण्यासाठी वापरतात, तर टणक आवरण फोडल्यानंतर जे लालसर रंगाचे बी मिळते, तेच बदाम म्हणजेच सुकामेवा म्हणून खाण्यास प्रसिद्ध आहे.

Almonds च्या दोन जाती म्हणजे गोड बदाम व कडू बदाम,

इतर माहिती : Other Information

बदामाचे तेल काढतात. या तेलाचे मलम बनवितात. क्षयरोगासाठी, डोक्याला लावण्यासाठी, सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो.

बदामाची पाने मोठी पसरट असल्याने पत्रावळीसाठी उपयोग होतो. या झाडाची सावली थंडगार असते. याची गळलेली पाने तांबूस पिवळ्या रंगाची दिसतात.

कश्मीरसारख्या थंड प्रदेशात बदामाचे उत्पन्न भरपूर प्रमाणात होते.

Almondsची फळे जमिनीत लावली असता रोपे तयार होतात. ही झाडे घराच्या आसपास मोकळ्या जागेत लावली जातात.

बदाम विषयी काही महत्वाची प्रश्न – Quiz Question about Almonds 

प्रश्न. बदाम नेमके कसे खावे व किती प्रमाणत खावे?

उत्तर: बदाम नेहमी चार ते पाच तास पाण्यात भिजवून खावे. साली सगट खाऊ नये.याचे एकाच दिवशी अति सेवन टाळावे.

प्रश्न. बदामाच्या अति सेवनामुळे होणारे तोटे काय?

उत्तर: बदामात मॅगनीज चे प्रमाण जास्त असल्याने जर व्यक्ती औषधे घेत असतील तर त्याची reaction होऊ शकते .त्याच प्रमाणे सेवनात जास्त प्रमाणात बदाम खाल्याने अतिसार, अपचन होणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, पित्ताचा त्रास, तोंड येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असे बरेच तोटे होऊ शकतात. या कडे लक्ष द्यावे .

प्रश्न. दिवसाला किती बदाम खाव्यात?

उत्तर: भारतीय लोक व इथले उष्ण वातावरण बघता दिवसाला फक्त चार ते दहा बदाम खाव्यात.

प्रश्न. हाडे व दात यांच्या मजबुती साठी बदाम योग्य आहे का ?

उत्तर: होय, कारण बदामामध्ये मुबलक प्रमणात कॅल्शिअम आणि फॉंस्फरस आहे. त्यामुळे हाडे व दात यांच्या मजबुती साठी बदाम योग्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top