Benefits of Aloe Vera
आयुर्वेदात अश्या अनेक औषधी दडलेल्या आहेत ज्या आपल्या अवतीभवती अगदी सहज सापडु शकतात. आपण त्याबाबतीत अनभिज्ञ असल्याने त्याचं महत्व आपल्याला माहित नसतं. अश्याच एका बहुगुणी औषधी वनस्पती बद्दल आज माहीती करून घेउया.
कोरफड चे फायदे – Benefits of Aloe vera in Marathi
कोरफड हे नाव आपल्या सगळयांना परीचीत आहे ही एक औषधी वनस्पती म्हणुन सुपरीचीत आहे. चमत्कारीक रोपटं म्हणुनही याला ओळख आहे, बाजारात कोरफड पासुन बनलेल्या त्वचेसंबधी बरेच उत्पादनं अगदी सहज उपलब्ध आहेत. तसच केसांना देखील कोरफडीने बरेच लाभ होतात. तसं बघीतल्या गेलं तर प्राचीन काळापासुन कोरफडीचा उपयोग होत असल्याचं आपल्याला दिसतं, इतकचं काय तर ईजीप्त मधील लोक कोरफडीला अमरत्वाचं झाड देखील संबोधायचे.
कोरफडीबद्दल आपल्याला बरीच माहीती आहे पण आपल्याला हे माहीत आहे का की सौंदर्याकरता कोरफडीचा उपयोग कश्याप्रकारे केला जातो? इथे कोरफडी पासुन निर्मीत बरीचशी सौंदर्यवृध्दीकरता फेस पॅक दिले आहेत, कमीत कमी खर्चात घरबसल्या याचा उपयोग करून आपण आपल्या सौंदर्यात वाढ करू शकतो.
कोरफडीचे फायदे
1) मुलायम त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक
काकडीचा रस, कोरफड जेल, दही, गुलाब जल, आणि उपयुक्त तेल याचे मउ मिश्रण बनवावे, या मिश्रणाला आपल्या चेह-यासोबत मानेवर लावावे, 10 मिनीटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुउन टाकावा या मिश्रणाने त्वचा मुलायम तर होतेच सोबत चेहे-यावर तजेला येतो.
2) कोरडया त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक
2 चमचे कोरफड जेल, 5 ते 6 बिनबियांचे खजुर, काकडीचे तुकडे, आणि लिंबाचा रस घेउन एकत्र मिसळावा. या मिश्रणाला एका बाॅटल मध्ये देखील तयार करून ठेवल्या जाउ शकतं. रोज या मिश्रणाने चेहरा आणि मानेला मसाज करावा, 30 मिनीटे तसेच ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवावा.
3) तेलकट त्वचेकरता कोरफडचा फेस पॅक
कोरफडीचे पानं उकळुन 2 चमचे मधासोबत मिश्रण तयार करावं. हे मिश्रण चेह-याला तसच गळयाला लावुन 20 मिनीटांपर्यंत ठेवावं. त्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुवावा, काही आठवडे हा प्रयोग नियमीत केल्यास त्वचेचा तेलकटपणा संपुर्णपणे नाहीसा होवून त्वचा चमकू लागेल.
या घरगुती फेसपॅकचा उपयोग जरूर करा. कोरफड या वनस्पतीत मोठया प्रमाणात रस भरलेला असतो, थंड गुणधर्मामुळे हीचा उपयोग ब-याच प्रमाणात केला जातो, ब-याच वर्षांपासुन कोरफड औषध म्हणुन आणि सौंदर्य वाढीकरता उपयोगात आणल्या जाते आहे.
नक्की वाचा :-
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Benefits of Aloe Vera in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा कोरफड चे फायदे – Benefits of Aloe Vera in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.
नोट: कोरफड चे फायदे – Benefits of Aloe Vera या लेखात दिलेल्या मुरुमांवर घरगुती उपायाबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Khup chaan post ahe
roj korfad khalli tar changale aste ka??? kahi tras tar nahi na hot???