अंजीरपासून / Anjeer अनेक फायदे आहेत. याचा वापर पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन आणि अस्थमा यांच्या उपचारासाठी केला जातो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचे नियमित सेवन केले जाते. आजारपणात याचे नियमित सेवन अनेक रोग बरे करतो.
अंजीर / Anjeer हे एक मोसमी फळ आहे. आशिया खंडाच्या पश्चिमी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
अंजीर आपल्याला मुख्यतः कोरडे आणि मोसमात ओलेही पाहायला मिळतात.
अंजिर चे फायदे / Benefits of Anjeer in Marathi

अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते.
चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, कॅल्शियम, लोह, फास्फोरस, माग्नेशियम, सोडियम, पोट्याशियम, आणि क्लोरीन सारखे, तत्व असतात.
भारतात सुका मेवा म्हणून अंजीर फारच पसंद केले जातात. लोक यांना आवडीने खातात. यापासून आरोग्यदायी लाभही मिळतो.
अंजीरला बदाम, मनुके, काजू आणि खजूर यां मेव्यांसोबत मिसळूनही खाल्ले जाते.
अंजीर हा सैतुसाच्या जातीचे वृक्ष आहे. बाजारात सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. याचा वापर सुका मेवा म्हणून गोडपदार्थावर सजावटीसाठीही करता येतो.
अंजीर पिकून कच्ची हि खाल्ली जातात. तसेच टी सुखवून हि खायला चालतात.
हा सुका मेवा सर्वच किराणा दुकानांवर आरामाने मिळतात. याचा वापर सलाद म्हणूनही करता येतो.
ताजी अंजीर चवीने सुक्या अन्जीरांपेक्षा वेगळी असतात. हे एक आहाराचे चांगले घटक मानले जाते. यात अनेक जीवनसत्वे खनिजे आणि प्रतीरोधके असतात. यापासून अनेक रोगावर औषधीही तयार केली जातात.
१. रक्तदाब कमी करणे
अंजिराचे नियमित सेवन रक्तदाब कमी करण्यास सहाय्यक असतात.यातील पोटयाशियामामुळे रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत मिळते. सोबतच उच्च रक्तदाबावर अंजीर लाभदायक मानले जाते.
यातील सोडियम मुळे आपल्याला उच्चरक्त दाबाला नियंत्रित करण्यास मदत होते. यामुळे हृदयात रक्त पुरवठा नियमित व नियंत्रित होतो. शरीराची पाचन तंत्र प्रणाली हि सुदृढ होते.
२. वजन संतुलित ठेवणे
अंजिरात तंतू जास्त प्रमाणात असतात. शोधणे असे माहीत झाले आहे कि, अंजिरात जास्त तंतू असल्यामुळे याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे आपल्या वजनालाही संतुलित ठेवण्यात मदत मिळते. आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते.
पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहावर गुणकारक ठरते.
डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात, त्यामुळे वजन संतुलित राहते.
अमेरिकन जर्नल मधील क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित लेखानुसार उच्च तंतुमय पदार्थ सेवन केल्याने चांगले आरोग्य व वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळते. सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असतो. ज्यामुळे ते शरीरास लाभदायक सिद्ध होतात.
प्राचीन सूत्रांच्या माहितीतून कळते कि यामुळे वजन कमी करणे व संतुलित करण्यास मदत मिळते. याच्या नियमित सेवनाने अनेक लाभ मिळतात.
3. प्रजनन आरोग्यास सुदृढ बनविते.
प्राचीन ग्रीक लोकांच्यामते अंजीर हे सर्वात पवित्र आणि प्राकृतिक फळ आहे. तेथे अंजीर प्रेम आणि शुद्धतेचे प्रतिक मानल्या जाते.
प्राचीन भारतातील लोक यास दुधासोबत सेवन करीत होते. अंजिरात झिंक, म्याग्नीज, म्याग्नेशियाम आणि लोहाचे प्रमाण असते. हे सर्व तत्व आपल्या प्रजनन तंत्रासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे प्रजनन तंत्र चांगल्या प्रकारे विकसित होते.
किशोर युवतींना पी.एम.एस.च्या समस्यांपासून दूर करण्यासाठी नियमित अंजीर खायचा सल्ला दिला जातो.
अभ्यासातून हेही सिद्ध झाले आहे कि अंजीरातील प्रतीरोधके महिलांमधील स्तनांच्या कर्करोग आणि हार्मोनल संतुलनात अत्यंत लाभकारी मानले जाते.
४. रक्तातील शर्करेची मात्र नियंत्रित करतो.
अंजीरातील बहुगुणी पोटयाशियम तत्व रक्त शुद्ध करणे तसेच रक्तातील शर्केरेची मात्रा नियंत्रित करतो.
आपण आपल्या शरीरातील शर्करेची मात्रा तपासून पाहायला पाहिजे. पोट्याशियम तत्वयुक्त खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात, खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित होते.
अंजीरातील प्रतिरोधक तत्व रक्तातील ग्लुकोज आणि शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
५. हृदयाचे आरोग्य विकसित करतो.
अभ्यासातून हे माहित झाले आहे कि, अंजीरातील तत्व शरीरातील हानिकारक तत्वांना शरीराबाहेर टाकतात.
जे हृदयविकार आणि हृदयासंबंधी समस्यांना वाढवतात. सुकी अंजीर आपले रक्तदाब नियंत्रित करून हृदयाला होणारया त्रासाला कमी करतो.
हृदयातील नलीकांमधील अडथळे दूर करण्यात अंजीर लाभदायक आहेत.
६. पित्ताची समस्या दूर करतो.
अंजीरातील तंतुमय पदार्थ आपल्या पाचनतंत्रास मजबूत बनवतात. त्यामुळे पित्ताच्या त्रासापासून वाचवण्यासाठी रोज नियमित अंजिराचे सेवन करायला पाहिजे. उच्च तंतुमय पदार्थ युक्त अंजीर आपल्या आहारात असायला हवा.
७. हाडांच्या आरोग्यासाठी लाभदायी.
सुकी अंजीर क्याल्शीयमचा चांगला स्रोत मानल्या जाते. दैनंदिन जीवनात शरीरामध्ये खनिजांची मात्रांची कमी पूर्ण करण्यासाठी रोज १०० mg क्याल्शीयमची गरज असते त्यामुळे अंजिराचे सेवन लाभदायी आहे.
शरीरातील क्याल्शीयमची कमतरता अंजीर पूर्ण करतो त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात अंजिराचे सेवन करणे जरुरी आहे.
काही महत्वाच्या टिप्स / सल्ले
- नेहमी अंजीर आधी स्वच्छं धुवून मग कपड्याने साफ करायला पाहिजे.
- चांगल्या परिणामासाठी रोज अंजिराचे सेवन करायला पाहिजे.
- अंजीर कापण्यासाठीचे चाकू आदी कोमट पाण्याने धुवून घ्यावे.
- चांगल्या परिणामासाठी उपलब्ध असल्यास ताजी अंजीर खावीत.
- जास्त नरमलेल्या अंजीरांचा वापर करू नये.
- सुकी अंजीर फार जास्त सुकलेली असेल तर ती गरम पाण्यात भिजण्यास ठेवा नंतर त्यांना फ्रीज मध्ये फ्रीजर मध्ये काही वेळ ठेवून नंतर खा.
- अंजिराचे सेवन योग्य मात्रेतच घ्यावे जास्त घेतल्यास पित्ताची समस्या होऊ शकते.
घ्यायची काळजी
- अन्जीरापासून अनेक फायदे आहेत हे आपणास समजले असून याचे जास्त सेवनही करू नये.
- सुखी अंजीर जास्त खाल्ल्यास दातांच्या सडण्याचे कारण बनू शकते.
- ज्यांना अंजीर ची एलर्जी असेल त्यांनी अंजीर खावू नये. यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच कोणताही पदार्थ आपल्या आहारात समावेश करावा.
- अंजिराचे सेवन संयमित करणे फार जरुरी आहे. नाही तर पचनसंस्थेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.
लहान मुलांचे वजन वाढविण्यासाठी उपाय सुचवावेत
Good information