सफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ | Benefits Of Apple In Marathi

Apple – सफरचंद आपल्या पृथ्वीवरील सर्वात स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळामधील एक आहे. हे फळ खाल्ल्यावर आपल्याला आपल्या स्वास्थावर होणारे परिणाम दिसून येतील.
चला तर मग जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडते फळ सफरचंदाविषयी महत्वाची माहिती घेऊ या.

Benefits Of Apple

सफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ – Benefits Of Apple In Marathi

पाचनशक्ती

सफरचंदात तंतूचे प्रमाण जास्त असते जे पाचनक्रियेस महत्वाचे ठरते. सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकारांना दूर करण्यास सहाय्यक ठरते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तंतुमय पदार्थ खाल्लेले अन्न अधिक पचनीय आणि मुलायम बनवतो. त्यामुळे ते अधिक गतीने पचतात. हे हाडांनाही मजबूत बनवण्याचे काम करतो. चरबीला वाढवण्यास प्रतिबंध करतो. सफरचंद पाचनतंत्रातील बिघाड दूर करतो. सोबतच शरीरात तयार होणारे अतिरिक्त कोलेस्ट्रोल शरीराबाहेर टाकून हृदयास अधिक खरच ठेवतो त्यासोबत अठरोस्क्लेरोसिस होण्याचे प्रमाण कमी करतो.

कर्करोग रोकु शकतो

एक सफरचंद कर्करोग कशाप्रकारे प्रभावीपणे कर्करोग रोकु शकतो यावर संशोधन सुरु आहे. कर्करोग झालेल्यांनी रोज सफरचंद खाल्ल्यास त्यांना चांगला फायदा मिळतो. अनेक कर्करोगात सफरचंद खाणे लाभदायक मानले जाते. सफरचंद महिलांमध्ये स्तन आणि मलाशयाच्या कर्करोगास थांबवू शकतो. त्यासोबत फुफ्फुसाच्या कर्करोगात सफरचंद खाल्ल्याने खूप लाभ मिळतो. फळामध्ये कर्करोग थांबवण्याचे घटक सफरचंदात सर्वात जास्त आढळतात. कुफ्फुसाच्या कर्करोगात सफरचंद फारच प्रभावीपणे फलदायी ठरतो. सफरचन्दामधील प्रतिरोधक शरीरात कर्करोग वाढल्यावर आळा घालतात.

एनिमिया
सफरचंदात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरात लोहाच्या कमतरतेने होणाऱ्या रोगावर सफरचंद उत्तम उपाय ठरतो. रोज एक सफरचंद खाल्ल्यास रक्तातील लाल रक्त पेशांचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व शरीर नैसर्गिक घटकांचा वापर शरीर विकासास करू लागतो.

शारीरिक कमजोरी

सफरचंद शारीरिक कमजोरीला दूर करण्यासाठीही ओळखले जाते. शारीरिक कमकुवत रोग्यांना दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे. डॉक्टर्स सुद्धा याचा सल्ला देतात. आपले वजन जर कमी असेल तर तर दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे.शरीराच्या डीटोक्सिफाय क्रिया विकसित करणे आणि संपूर्ण शरीराचे स्वास्थ् चांगले बनविण्यासाठी सफरचंद लाभदायक ठरते. यात सापडणारया प्रतीरोधके आणि प्रथिने आपल्या शरीराला विशेषतः हाडांना अधिक मजबूत बनवतो.

मधुमेह नियंत्रित करतो.

जे लोक मधुमेहाने ग्रासित आहेत, त्यांच्या रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवणे अत्यंत जरुरी असते. सफरचंदामधील प्रतिरोध पोलीफिनॉल सरळपणे शरीरातील कार्बोद्कांच्या संपर्कात राहून रक्तातील शर्करा नियंत्रित करतात. हे शरीरातील शर्करा रक्तातून कमी करून मधुमेहात लाभकारक ठरतो. सफरचंदातील पोलीफिनॉल पाचकतंत्रास सुधारून ग्लुकोज पचवण्याची क्षमता वाढवतो. त्यासोबत शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही मदत करतो. रक्ताचे प्रमाण शरीरात नियंत्रित ठेवतो. रक्ताचा प्रवाह योग्य प्रमाणात ठेवतो. रक्तातील लाल रक्त कोशिकांचे प्रमाण वाढवण्यात सफरचंद लाभकारी ठरतो, सर्व फळांमध्ये सफरचंद सर्वात लाभदायक असतो. खऱ्या अर्थाने सफरचंद मधुमेहाच्या रोग्यांसाठी अमृता इतकेच महत्वाचे ठरते.

दातांची काळजी

रोज सफरचंदाचे सेवन केल्यास दातांमधील क्याल्शियम वाढते. आणि हिरड्या सुदृढ राहतात. दाताला कीड लागणे, सफरचंद नियमित खाल्ल्यास थांबवता येते. म्हणून सफरचंद आपल्यासाठी सर्वात लाभदायक मानल्या जाते. यामधील तंतू दातांची आतून सफाई करतात. यामधील प्रतिजैविक तत्व शरीरातील हानिकारक जीवाणू आणि विशानुना दूर ठेवतो. यासोबतच शरीरातील लाळेचे प्रमाण संतुलित ठेवतो. मुखातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू पसरण्यापासून थांबवतो.

श्वासासंबंधी समस्या

आपले श्वसन तंत्र अत्यंत संवेदनशील असते. अनेक समस्या कोशिकांच्या बिघाडामुळे निर्माण होतात. श्वास समस्यांमध्ये प्रमुख अस्तमा ह सर्वात अपायकारक असतो. अस्तामाचा परिणाम कमी करण्यासाठी सफरचंद फारच प्रभावशाली ठरतो. सफरचंदामध्ये बऱ्याच फळ आणि भाज्यांचे गुण सापडतात. वैज्ञानिक आज हि सफरचंदात सापडणाऱ्या गुणांचा अभ्यास करून अचंभित होतात, कारण त्यांच्या मते सफरचंद हे एक स्वयंपूर्ण पोषकाचा भांडार आहे.

ह्रुदयासंबंधी आजारांवर सहाय्यक

सफरचंद हा शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी करतो. सफरचंदामुळे शरीरात एक रोग प्रतिकारक यंत्र कार्यान्वित होते. एका म्हणीप्रमाणे “एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरांपासून दूर ठेवतो” खऱ्या अर्थानेच सत्य मानल्या जाईल. सफरचंदात सापडणाऱ्या लिपीड पेरोक्सिडेशन आणि इतर तंतू ह्रुदयाला ताण देण्यापासून वाचवतात. यासोबत ह्रुदयाचे नियोजन योग्यपणे कार्यान्वित बनवते. शरीरात तयार होणारे प्रोटीन कार्डीयोव्यास्कुलर तंत्राशी जुळलेले असते. जे ह्रुदयाला मजबूत आणि आरोग्यदायी बनवितो.

वात

असे लोक ज्यांना वाताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी सफरचंद फारच बहुपयोगी ठरतो. सफरचंद शरीरातील उपचारात्मक प्रक्रिया संतुलित करतो. फ्लावोनाइड हे घटक कम्पर्फेरोल, क्युर्सेनटीन आणि मेरी सेटीन यांनी संपन्न असतात, जे वाताच्या समस्येस कमी करण्यात प्रभावशाली ठरतात.

डोळ्यांसंबंधी समस्यांसाठी

असे म्हटले जाते कि, सफरचंद सेवन केल्याने डोळे मजबूत, स्वच्छं आणि स्वस्थ होतात. सफरचंदमध्ये सापडणारे फ्लावोनाइड तत्वांनी आणि प्रतिरोधक पोषके यांनी डोळे अधिक आरोग्यदायी आणि अंधकाराविना राहतात. डोळ्यात अंधारी आणि न दिसण्याची समस्या सफरचंद खाल्ल्याने दूर होतात. डोळ्यासंबंधी मैकुलर डीजरेशन, कटरेक्ट आणि ग्लुकोमात होणारे रोग यामुळे दूर करता येतात.

वजन कमी करणे

सफरचंद सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करण्यात सहाय्यता मिळते. नियमित सेवनाने आणि योग्य व्यायामामुळे आपण आपले वजन कमी करण्यास सहाय्यक ठरतात. सफरचंदात वजन कमी करण्याचे अनेक प्रभावशाली गुण असतात. अभ्यासातून माहित झाले आहे कि सफरचंद शरीरातील क्यालरी खर्च करण्यास सहाय्यक रसाला अधिक प्रभावशाली बनवतो. क्यालरी अधिक खर्च केल्याने आपले शरीर अधिक उर्जा खर्च करतो त्यामुळे आपल्या शरीराचे वजन कमी केल्या जाते. जे लोक आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांच्यासाठी सफरचंद फारच बहुपयोगी ठरते.

त्वचेची काळजी घेणे

सफरचंद आणि शहद यांचे मिश्रण दुधात मिळवून त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार बनते. सफरचंदमध्ये सापडणाऱ्या प्रतीरोधकामुळे त्वचा अधिक चमकदार बनते. त्वचेवरील गड्ड्यावर हे मिश्रण अधिक परिणामकारक ठरते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे धब्बे कमी करण्यास सफरचंदाचे सेवन आणि व लेपण अत्यंत प्रभावी ठरते चेहरा नरम आणि तरुण दिसण्यासाठी सफरचंदाचे सेवन अधिक प्रभावी ठरते. शरीरातील रक्त प्रवाह संतुलित करणे आणि त्याची शुद्धता टिकवणे यामुळे त्वचा निरोगी व तेजस राहते. सफरचंदातील पोषके जुना झालेल्या चेहऱ्यावरील कोशिका नष्ट करून नवीन कोशिकांना पोषित करतो. त्यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी दिसते.व चमकदार बनते.

कोणते सफरचंद खरेदी करावे आणि कोणते नाही?

जेव्हाही तुम्ही सफरचंद खरेदी कराल तो अगदी कडक असावा, त्यावर धारा नसाव्यात कारण असे सफरचंद प्रतीरोधकानि भरलेले नसते. नरम झालेले सफरचंद खरेदी करू नये. घरामध्ये जास्त सफरचंद साठवून ठेवू नये.जेवढ्याची गरज असते तेवढ्याच सफरचंदाला खरेदी करावे. चुकीने नरम सफरचंद खरेदी केले असाल तर चांगल्या सफरचंदापासून ते दूर ठेवा. त्यांना आधी संपवूनच पुढील सफरचंद खावेत.

Benefits Of Coconut Oil

Benefits of Milk

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Apple चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा सफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ – Benefits Of Apple In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Benefits of Apple – सफरचंद चे फायदे  या लेखात दिलेल्या सफरचंदच्या फायद्यांन  -Benefits of Apple बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया

2 thoughts on “सफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ | Benefits Of Apple In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top