Benefits of Banana
पिकलेली आणि चविष्ट केळी – Banana फळामध्ये सर्वात लोकप्रिय मानली जातात, हि आपल्याला कोठेही उपलब्ध असतात.विशेष म्हणजे वर्षातील बारा हि महिने बाजारात मिळतात.
काही लोक असेही आहेत कि, जे यास खाण्यास थोडा विचार करतात. त्यांना आपले वजन वाढण्याची सारखी चिंता लागलेली असते. काही लोकांना केली खायला सांगितल्यास ते आपल्याकडे शंकेने पाहतात.
या लेखास वाचल्यानंतर आपणास कळेल कि केळींना का खायचे आणि लोक का यांना जास्त पसंत करतात.
चविष्ट केळीपासून होणारे फायदे – Benefits of Banana in Marathi
केळी खाण्यासाठी सर्वात लाभदायक असतात. यांपासून अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. हे एक बहुगुणी फळ आहे ज्यामध्ये अनेक पोषके आणि जीवनसत्वे आहेत. जसे ए.बी.सी आणि इ तसेच खनिजे जसे कि, पोटयाशियम, झिंक, लोह आणि मेग्नीज पण असतात. केली खाल्ल्याने आपले आरोग्य स्वस्थ व त्वचा नरम राहते.
1.रक्तदाब
आपण सर्व जाणतो कि रक्तदाबाच्या रोग्यांना मिठ किती घातक आहे. केळीमध्ये मीठ फारच कमी असते. यात भरपूर मात्रेत पोट्याशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते.
2.उच्च तंतूचे स्रोत
केळी मध्ये जास्त प्रमाणात तंतूचे तत्व असतात यात विरघळणारे व न विरघळणारे दोन्ही प्रकारचे तंतुमय पदार्थ असतात. हे आपली पचनसंस्था मंद करून टाकतात. त्यामुळे भूक कमी लागते. त्यामुळे केळी लोक रोज नाश्त्यामध्ये खातात. त्यामुळे पाचन संस्थेस आराम मिळतो.
3.हृदयाचे स्वास्थ
यातील भरपूर प्रमाणातील तंतू आपल्या हृदयासाठी अत्यंत लाभदायक मानले जातात. लीड्स विद्यापीठ यु.के.यांच्या अध्ययनानुसार केळीमधील तंतुमय पदार्थ आपल्याला कार्डीयोवेस्कुलर (CVD) आणि कोरोनरी हार्ट डिसीज (C.H.D.) सारख्या रोगांपासून आपले रक्षण करतात.
4.पचन क्रियेत मदत
आयुर्वेदानुसार केळीचा स्वाद गोड असतो. त्याच्यातील गोड स्वाद जाडपणा व नरम दोन्ही प्रकारे आपल्याला पाचनक्रियेस मंद करण्यास मदत करतात.
5.मुळव्याध ठीक करण्यास सहाय्यक
जेव्हापासून केळी आपले पाचन तंत्र मंद व सुकर करण्यास मदत करतो. तेव्हापासून ते मुळव्याध होण्यापासून वाचवतो.
6.पोटयाशियमचे उच्चतम स्रोत
केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. त्यातील पोट्याशीयम हे खनिज आपल्या शरीरात सर्व प्रक्रिया नियंत्रित करतो. त्यामध्ये श्वसन संस्थेचा समावेश होतो. हृदयासंबंधी आणि मेंदूच्या विविध भागातील चेतापेशींचे कार्य सुरळीत ठेवतो.
7.पोषक तत्वाचे भांडार
पोषणाबाबत केळी अत्यंत लाभदायी आहे. यात खनिजे आणि विविध जीवनसत्वे यांचा मोठा साठा असतो. पोट्याशियम, म्यागनीज, म्याग्नेशियम, लोह, फोलेट, निकेम आणि रायबोफ्लोवीन, आणि जीवनसत्व ब६ ने परिपूर्ण असते. हे सारे तत्व शरीर क्रिया नियंत्रित ठेवते.
8.अनेमिया शी लढण्यास साहाय्यक
केळीमध्ये अस्तित्व असलेले लोह विषयक गुणांमुळे ते आपणास अनेमिया सारख्या रोगापासून वाचवतो.याचे सेवन अनेमिया रोग्यांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.
अनेमियामध्ये शरीरातील लालरक्त पेशा कमी होऊन शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते. रक्तातील हेमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अनेमिया होते. त्यामुळे शरीर कमजोर होऊन सर्व संस्था नियमित काम करीत नाहीत.
त्यामुळे थकवा येणे, दम लागणे, चक्कर येणे, चेहरा पिवळा पडणे, इत्यादी समस्या दिसू लागतात. यासाठी केळी रामबाण उपाय आहे.
केळीमुळे त्वचेस होणारे फायदे :-
केळीमध्ये ते सर्व पोषके दिसून येतात जे शरीरास लाभदायक ठरतात. केळीमध्ये जीवनसत्व क आणि ब६ यांचे अस्तित्व जास्त असते त्यामुळे त्वचेत लवचिकता येण्यासाठी याचे सेवन लाभकारी असते.
यातील प्रतिरोधक आणि म्याग्नीज आपल्या शरीरास ऑक्सिजन मुक्त रेडीकल्स मुळे होणारे नुकसान टाळतो आणि त्वचा स्वस्थ बनते.
यामुळे केळीमध्ये ७५ % पाणी असते त्यामुळे त्वचेस केळी फार फायदेशीर ठरतात त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही त्यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता कमी होते.
केळीमुळे त्वचेस होणारे फायदे :-
1.प्राकृतिक मोश्चरायजर –
केळी हे एक चांगले आणि उत्तम प्राकृतिक मोश्चरायजर आहे. केळीमधील जीवनसत्व अ आपल्या कोरड्या त्वचेस स्वस्थ आणि मुलायम बनवतो. हे एक उत्तम मोश्चरायजर असल्यामुळे पिकलेल्या केळास चेहऱ्यावर लावल्यास २०-२५ मिनिटे तसेच राहू दे नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे त्वचा मुलायम व नरम होईल.
जर त्वचा अधिकच शुष्क झाली असेल तर केळासोबत शहद मिळवून त्याचा फेसप्याक तयार करून त्वचेवर लावून मालिश करावी. यामुळे त्वचा कोमल बनेल.
यासोबत आपण केळीसोबत एक चम्मच दही आणि १ चम्मच जीवनसत्व इ तेल घेवून मिश्रण बनवावे नंतर हे रोज नियमित चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा चमकदार व कोमल होईल.
2.चमकदार त्वचा
केळीत भरपूर मात्रेत जीवनसत्व क असते त्यामुळे त्वचा कोमल आणि चमकदार ठेवण्यास मदत होते.
पुढील काही फेस मास्क बनवण्याच्या विधी सांगितल्या आहेत ज्यांचा वापर त्वचेस चमकदार बनविण्यासाठी होतो.
1. अर्ध्या केळास चांगल्याप्रकारे पातळ करून त्यात 1 चम्मच शहदासोबत मिळवा. या मिश्रणास २०-२५ मिनिटे चेहऱ्यावर लेपून ठेवा नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. या फेसप्याकमुळे तेलकट त्वचा कोमल व मुलायम बनवतो.
2. एक केळ पातळ करून त्यात एका निम्बुचा रस मिळवून हे मिश्रण चेहऱ्यावर २५ मिनिटे लावून ठेवा. हे फेसप्याक जीवनसत्व क ने भरलेले असल्यामुळे हे चेहऱ्याचा निखार वाढवतात व चेहरा चमकदार बनवतो.
3.केळी पासून त्वचेसाठी स्क्रब
केळीत अनेक प्रतीरोधके असतात. त्यामुळे त्वचेवरील मृत कोशिका आणि तेलकटपणा येणे, या समस्यांपासून बचाव करता येतो.
खालील काही लाभदायक विधींचा वापर करून केळीपासून उत्तम स्क्रब बनविता येते.
*केळीस पातळ करून १ चम्मच साखर टाकून चांगल्याप्रकारे मिळवून घ्या यास चेहऱ्यावर लावून चेहऱ्याची चांगली मालिश करा. यामुळे चेहऱ्यावरील मृत कोशिकाना काढता येते व चेहऱ्याची त्वचा मुलायम होते.
*एक केळ चांगल्याप्रकारे पातळ करून त्यात 3-४ चम्मच ओट्स, १ चम्मच शहद आणि १ चम्मच कच्चे दूध मिळवा याचे मिश्रण चेहऱ्यावर ३०-४० मिनिटे लावून हळू हळू मसाज करा नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
जर चेहरा जास्त कोरडा असेल तर दुधा ऐवजी दूध क्रीम वापरू शकता. याने चेहरा मुलायम मृतपेशिरहित बनतो.
*अर्धे कापलेले केळ घेवून त्यात १ चम्मच नारळ तेल २ चम्मच तांदळाची पूड मिसळून मिश्रण चेहऱ्यावर लावून चांगली मालिश करा. ३० मिनिटे ठेवल्यावर पाण्याने धुवून घ्या.
*संपूर्ण शरीरासाठी स्क्रब बनविण्यासाठी २ केळी, ४-५ स्ट्रोबेरीसोबत चांगल्याप्रकारे मिळवून बारीक मिश्रण तयार करा.
त्यात एक चम्मच साखर मिळवा हे मिश्रण आंघोळी आधी १/२ तास आधी लावा व चांगली मसाज करा. याने त्वचा चांगली मुलायम व सतेज होईल.
४. सुरकुत्या वाढवण्यावर उपाय
केळीत सापडणारे पोषके चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. यातील पोषके चेहऱ्यास तरुण व कोमल ठेवतात. जीवनसत्व अ आणि इ युक्त एन्टी एजिंग फेस मास्क साठी नाशपाती, केळ यांना मिळवून चांगले मिश्रण बनवून चेहऱ्यावर लावून २५-३० मिनिटे ठेवा.
नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम व तरुण दिसायला लागेल. नेहमी वापर केल्यास चेहरा तरुण व कोमल सोबतच चमकदार बनवतो.
याशिवाय मिक्सर मध्ये २-3 केळी, २ चम्मच गुलाबजल, सहद घेवून बारीक करा. या मिश्रणास चेहऱ्यावर लावून २०-२५ ठेवा नंतर पाण्याने धुवून घ्या.
५. पायांची काळजी
केळीमध्ये प्राकृतिक मोश्चारायजर गुणांमुळे याचा वापर पायांच्या भेगांवर व पायांच्या त्वचेवर हि करू शकतो. यासाठी दोन पिकलेल्या केळाचा गर बारीक करून पायावर लावल्यास व भेगांवर लावल्यास पाय सुंदर व भेगा नाहीशा होन्यास मदत मिळते.
नियमित वापरामुळे पाय सुंदर बनतील पायांच्या भेगा नाहीशा होतील. पाय कोमल व आकर्षक बनतील.
६. डोळ्यांचे सुजणे यावर उपाय
अर्ध्या केळास पातळ करून, सुजलेल्या डोळ्यांच्या भोवती लावून १५-२० मिनिटे ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे, डोळ्याची सुजन एकाच प्रयत्नात दूर झालेली असेल. केळामधील पोट्याशियम डोळ्यांमधील तरल साफ करण्यास लाभदायक ठरतो.
याचे लक्ष नक्कीच ठेवाकी केळीत कोणतेही इतर पदार्थ मिळविल्यावर त्यास डोळ्यांमध्ये जावू देवू नका. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी डोळ्यावर काकडीचा काप ठेवावा. डोळे थंड होतील.
केळींचा केसावर होणारे फायदे
केळीमध्ये पोट्याशियम कार्बोहायड्रेड आणि नैसर्गिक तेल आणि जीवनसत्वांची मात्रा चांगली असते. हे सर्व तत्व आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायक आहेत. त्यामुळे यांचा वापर केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीहि होतो.
जीवनसत्व इ तेलात शहद व केळीचा पातळ गर मिळवून केसांच्या मुळांशी लावावे नंतर कोमट पाण्याने डोक धुवावे.
यामुळे केसामधील कोंडा व केस गळणे या समस्या दूर होतील. केस चमकदार होतील. केळीपासून हेयरमास्क बनवून नियमित लावल्यास फार फायदा होतो.
केळामुळे केसाना काही महत्वाचे फायदे पुढील प्रमाणे सांगता येईल.
१.कोरडे व कमजोर केसांसाठी हेयर प्याक
कोरडे व कमजोर केसांसाठी केळाचा गर, बदाम तेल १ चम्मच मिळवून रात्री झोपण्याआधी केसांच्या मुळांशी लावावा सकाळी केस चांगल्या कंडीशनरने धुवून घेणे. यामुळे केस चमकदार व मुलायम होतील. केळीमध्ये जीवनसत्व अ आणि बदाम तेलात जीवनसत्व ई मुळे केस चमकदार व मुलायम होतील.
२.चमकदार आणि सुदृढ केसांसाठी हेयर पैक
केळीच्या गरात १/४ कप ओलीव तेल, एक अंड्यातील पांढरा बल्क यांचे मिश्रण क्रिमी होईपर्यंत फेटावे. नंतर हे केसांच्या मुळाशी व केसांमध्ये लावावे. ३० मिनिटे ठेवून कंडीशनर ने धुवून घ्या. केस चमकदार होतील.
3.मुलायम केसांसाठी हेयर पैक-
जास्त पिकलेल्या केळाच्या गरात अवकार्डो फळाचा गर, नारळाचे तेल हे सर्व मिळवून चांगले घट्ट मिश्रण बनवा. केसांमध्ये मुळाशी व इतर भागात लावा.
३० मिनिटांनी कंडीशनरच्या मदतीने धुवून घ्या यामुळे केस गळण्याची समस्या तसेच कोंड्याची समस्या दूर होईल.
केस नरम व चमकदार होतील. यात कोको अवाकार्डोच्या जागी वापरता येतो. त्यामुळे केसांना काळा नैसर्गिक रंग वाढविण्यास मदत होते.
केस गळण्याच्या समस्येकरिता हेयर पैक
केस गळणे हि एक मोठी समस्या बनली आहे. याकरिता जास्त पिकलेल्या केळाचा गर व दही यांचे मिश्रण केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते.
वरील कोणतेही हेयर प्याक आपण वापरू शकता. त्यासाठी दोन गोष्टींचे विशेष लक्ष ठेवा. एक म्हणजे केस धुतांना केळीचा कोणताच अंश केसांमध्ये राहायला नको.
दुसरी गोष्ट म्हणजे कधी हि हेयर प्याकला जास्त सुकू देऊ नका. असे केल्यास तो हटविन्यास पुढे समस्या येवू शकतात.
केळीच्या सालींचा चेहऱ्यासाठी उपयोग
केळींचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी होते म्हणूनच हे एक फळच नाही तर एक उत्तम औषधी गुनानी भरलेले फळही आहे.
१.पुरळावर उपाय
केळीची साल चेहऱ्यावरील पुरळ नष्ट करण्यासाठी वापरतात. सालीच्या आतील भागाने चेहऱ्यावर पुरळांच्या जागी ५-१० मिनिटे रगडा. असे केल्यास व नंतर चेहरा कोमट पाण्याने धुतल्यास चांगला आराम होतो. हि क्रिया 3-४ दिवस दिवसातून २ वेळा केल्यास आराम होते. पुरळे नाहीसे होतात.
२.केळींचा वापर सुंदरता वाढविण्यासाठी व पुरेशी झोप येण्यासाठी
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि पुरेशी झोप नसणे हे आपल्या सुंदरतेवर परिणाम करू शकते. आपल्या त्वचेस व केसांना स्वस्थ ठेवण्यासाठी पुरेशी झोप असणे फार गरजेचे आहे.
मेलोटोनीन हे झोपीस प्रेरित करणारे हार्मोन आहे आणि ट्रीपटोफान हे एक एमिनो असिड आहे जे झोपेचे हार्मोन्स नियंत्रित करतो.
केळीमधील ट्रीपटोफानचे प्रमाण चांगले आहे या सोबतच कर्बोहायड्रेड मुळे शरीर थकवा आल्यावर झोपण्यास तयार होते. ह्या तत्वामुळे आपल्याला पुरेशी झोप लागते. त्यामुळे केळीचे सेवन आपल्याला चांगली झोप येण्यास मदत करतो. सोबतच आपली त्वचा अधिक सुंदर आणि कोमल बनवतो.
3.चेहऱ्यावरील सुरकुत्यासाठी पैक
सुरकुत्याच्या समस्येवर उपाय म्हणून आपल्याला रोज केळी खावीत. सोबतच केळीच्या सालीचा वापर हि चेहऱ्यावर करता येतो. सालीच्या आतील बाजूने चेहऱ्यावरील सुरकुत्यावर रगडून मालिश करावी.
५-१० मिनिटे मालिश नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. नियमित वापराने चाह्र्यावरील सुरकुत्या कमी होतील.
आपण या लेखात केळीपासून होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणले. आपल्या चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी व केसांसाठी केळी फारच उपयोगी आहेत केळी आपल्याला बाजारात वर्षभर मिळतात. यासाठी आपण केळीचा नक्कीच वापर कराल. याची आशा करतो.
केळी आपली सुंदरता वाढविण्यासाठी तसेच आपले बरेच पैसेहि वाचवतो त्यामुळे अवश्य केळी खा मग वाट कोणाची बघता?
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Banana चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की हा केळीपासून होणारे आरोग्यदायक लाभ – Benefits Of Banana In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट : Benefits of Banana – केळी चे फायदे या लेखात दिलेल्या केळीच्या फायद्यांन -Benefits of Banana बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया
nice benefits of banana