“थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने होतात हे आश्यर्यकारक फायदे”

Cold Bath Benefits in Marathi

असं म्हटल्या जात “थंडे थंडे पाणी से नहाना चाहिये”

काय होत असेल बर थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने? अंघोळ म्हटलं कि तर बऱ्याच लोकांच्या अंगावर काटे सुद्धा उभे राहतात. आणि तेही थंड्या पाण्याने मग तर सांगूच नका!

थंड्या पाण्याने अंघोळ करण्याचे बरेच फायदे आहेत पण काही लोकांना ते माहिती नाहीत.

आपल्या त्वचेपासून तर आपल्या मेंदूला आणखी सुधार होण्यास मदत होईल, असे अनेक फायदे थंड्या पाण्याणे अंघोळ केल्याने होतात.

चला तर पाहूया थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने काय फायदे होतात तर,

“थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने होतात हे आश्यर्यकारक फायदे” – Benefits of Cold Water Bath in Marathi

Benefits of Cold Water Bath in Marathi

१) चरबी कमी करण्यासाठी मदत होत – Helps to reduce fat.

थंड्या पाण्याने केलेली अंघोळ आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. ज्या पद्धतीने चरबी कमी होत असते, त्यापेक्षा १५ पटीच्या वेगाने चरबी कमी करण्याचे काम हे थंड पाणी करते.

थंड्या पाण्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, आणि आपल्या शरीरातील चरबी त्यामुळे कमी होण्यास मदत मिळते. म्हणून थंड्या पाण्याने अंघोळ करणे कधीही योग्यच.

२) रोगप्रतिकार शक्ती वाढते – The immune system increases.

थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील बऱ्याच मेटाबॉलिक क्रियांचा वेग वाढतो, तसेच शरीरातील पांढर्या रक्त पेशी वाढण्यास मदत मिळते. आणि आपल्या शरीरात त्या पांढऱ्या रक्त पेशी रोगांविरुध्द लढण्यास मदत करतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

३) रक्त भिसरणाच्या क्रियेला वेग मिळतो – Blood clotting is accelerated.

जेव्हा आपण थंड्या पाण्याने अंघोळ करतो, तेव्हा आपल्या शरीरातील बऱ्याच रक्तवाहिन्या ह्या आणखी चांगल्या प्रकारे कार्य करतात. आणि आपल्या शरीरातील रक्ताभिसरण संस्थेचे आरोग्य चांगले राहण्यासा मदत मिळते.

तसेच आपल्या हृदयाची काळजी हि चांगली ठेवल्या जाऊ शकते थंड पाण्याने अंघोळ केल्याने.

४) तणाव कमी होतो – Stress is reduced.

थंड्या पाण्याने केलेली अंघोळ आपल्या शरीरातील युरीक अॅसिड ची पातळी कमी करण्यास मदत करते, आणि रक्तातील ग्लुटाथिओन ची पातळी वाढविते. ग्लुटाथिओन आपल्याला आलेल्या तणावाला कमी करण्यास मदत करते.

तणावात असताना आपण थंड्या पाण्याने अंघोळ करू शकता, आपला तणाव कमी करण्यास थंड पाणी उपयोगी ठरेल.

५) रात्री चांगली झोप येण्यास मदत होते – well sleep at night.

दिवसभराचा आलेला थकवा थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने निघून जातो अस म्हटल्या जात.

तेही खरच आहे, म्हणून बरेच लोक उन्हाळ्यात रात्री अंघोळ करण्याला जास्त महत्व देतात.

कारण रात्री थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

६) त्वचा आणि केसांची वाढ होण्यास मदत – Good for Skin and heir.

थंड्या पाण्याने अंघोळ करण्याचा आणखी एक फायदा असा कि आपली त्वचा चांगली तर होतेच,सोबतच आपल्या केसांची वाढ होण्यास सुद्धा मदत होते.

त्वचा तज्ञांच अस मत आहे कि थंड्या पाण्यामुळे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेल प्रमाणात राहण्यास मदत मिळते.

ज्यांचे केस गळतात त्यांच्या साठी हि एक चांगली कल्पना आहे. आपले केस गळण्यापासून वाचविण्यासाठी.

७) टेस्टोस्टेरॉन वाढवण्यास मदत करते – Helps to increase testosterone.

थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील सेक्स हार्मोन वाढण्यास मदत होते. टेस्टोस्टेरोन हा पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन चे काम करते. त्यामुळे पुरुषांना त्यांचे शुक्राणू वाढण्यास मदत होते.

पुरुषांनी थंड्या पाण्याने अंघोळ करावी जेणेकरून त्यांच्यातील सेक्स हार्मोन वाढण्यास मदत होईल.

८) इच्छाशक्ती वाढण्यात मदत होते – Increase desire.

थंड्या पाण्याने केलेली अंघोळ माणसाची इच्छा शक्ती वाढण्यास मदत करते, शाओलिन मोन्क च्या प्रशिक्षणात थंड्या पाण्याचा वापर केल्या जातो जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांची इच्छाशक्ती वाढेल. आणि त्या प्रशिक्षणात इच्छाशक्तीचीच खूप जास्त आवशकता असते.

तसेच मनुष्याच्या त्याच्या जीवनात सुद्धा  त्याला इच्छाशक्तीची च  आवश्यकता असते.  थंड्या पाण्याने अंघोळ करण्याचा हा आणखी एक फायदा आहे.

९) उत्साहपूर्ण श्वास घेण्यास मदत – Help to breathe excitedly.

जेव्हा आपण थंड्या पाण्याने अंघोळ करतो, तेव्हा आपल्याला खोलवर श्वास घेण्यास मदत होते. आपल्या शरीरावर थंड पाणी पडल्यानंतर एक प्रकारे गारवा वाटतो. आणि आपल्याला एक खोलवर श्वास घेण्यास मदत होते.

लांब श्वास घेतल्याने आपल्या शरीरामध्ये उर्जा उत्पन्न होण्यास मदत होते. हा एक फायदाच आहे थंड्या पाण्याने अंघोळ करण्याचा.

१०) शरीराची सतर्कता वाढते – Increases body alertness.

जर आपल्या दैनंदिन जीवनात आपण थंड्या पाण्याने अंघोळ करत असाल तर आपल्या शरीराची सतर्कता हि वाढलेलीच असेल, थंड्या पाण्यामुळे आपल्याला दीर्घ श्वास घेण्यास मदत मिळते.  त्या दीर्घ श्वासामुळे आपल्याला सतर्क राहण्यास मदत मिळते.

हा आपल्यासाठी आणखी एक फायदाच आहे थंड पाण्याने अंघोळ करण्याचा.

तर कधीपासून सुरवात करता मग थंड्या पाण्याने अंघोळ करण्याची?

तर आजच्या लेखात आपण पाहिले थंड पाण्याने अंघोळ करण्याचे काही फायदे, आपल्या शरीराला थंड पाण्याने अंघोळ केल्याने बरेच फायदे होतात.

म्हणून दररोज थंड्या पाण्याने अंघोळ करायला हवी.

आशा करतो आपल्याला या लेखातून बरेच काही शिकायला मिळाले असेल, आपल्याला या लेखातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका.

सोबतच आपला अभिप्राय द्यायला सुद्धा विसरू नका, कारण आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.

आणि  आमच्या माझी मराठी ला अवश्य भेट दया.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here