कलमीचे लाभदायक फायदे | Benefits Of Dalchini In Marathi

कलमी – Dalchini हि एक अत्यंत सुगंधित आणि गोड सुगंध पण असणारी एक वनौषधी आहे, त्यामुळे याचा बऱ्याच औषधामध्ये वापर केला जातो.

कलमी एक मसाल्याचे पदार्थ जो त्याच्या झाडावरील सालीतून तयार केल्या जाते. प्राचीन रोमन लोक कलमी पासून सुगंधी द्रव्ये तयार करीत.

कलमी हृदय आणि मूत्र पिंडासाठी फारच लाभदायक आहे. या वनौषधीमुळे रक्ताचे भिसरण वाढून आपले आपले आंतरिक तंत्र सुदृढ राहते. कलमीसोबत सहद मिसळून खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

Benefits Of Dalchini

कलमीचे फायदे – Benefits Of Dalchini In Marathi

वैज्ञानिक नाव : सिन्नोमोमुम जेटलानिचुम, सिन्नोमोमुम वेरूम

इतर नावे : कुरुवापता कायुमाणीस, कैसिया वेरा, करुंद दरूशीला कवाई , चायनीज कान्नेल्ल्ले, कानेला.

मूळक्षेत्र

हि वनौषधी मुख्यतः भारताच्या दक्षिणपूर्व भागात आणि पूर्वी आशियात जास्त सापडते. हि उष्णदमट वातावरणात जावा, सुमात्रा, मोरीशस, गयाना बोर्नेओ आणि दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडीज देशातील बेटावर उगवल्या जाते. कलमी लौरसाए व्रुक्ष कुटुंबाशी सबंधित आहे.

कलमीचे फायदे :

कलमी मध्ये एन्टीमायक्रोबियल, एन्टी क्लोटिंग आणि ड्यूरेटिक्स इत्यादी गुण आहेत. यामध्ये बऱ्याच मात्रेत एन्टीऑक्सिडेटस असतात. यात अनेक खनिज पदार्थ पण असतात. जसे कि, म्याग्निज, लोह, क्याल्शियम

कलमीचे तेलामध्ये एस्ट्रीजेन्ट एन्टीसेप्टिक आणि कार्मिनेटीव्ह गुण असतात. कलमीमध्ये गोड सुगंध त्याच्यातील चीन्नमोनल्देहाईद या पदार्थामुळे येतो. याचा वापर शरीरावर जास्त करणे हानिकारक ठरतो.

कलमी शरीरातील पोलीफिनोल आणि इन्सुलिन हे संप्रेरकांची वाढ करतो. कलमी कोलेस्ट्रोल कमी करतो, त्यामुळे हृदयासंबंधी आजार होत नाहीत. त्यासोबत शरीरातील मेद कमी करून रक्ताला शुद्ध करण्यास मदत करतो.

कलमी नैसर्गिकरीत्या गळ्याच्या आजारांना, सर्दी आणि श्वसनाच्या संबंधी आजारांना कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच पचनक्रिया मंद असणे उलट्या, पोटात वायू तयार होणे अशा समस्यांना ठीक करतो.

त्याच्यातील एन्टीफंगल आणि एन्टी ब्याक्टेरीयल गुणांमुळे शरीरात संक्रमण होत नाही. कलमी शरीरात यीस्टमुळे होणारे संक्रमण होऊ देत नाही.

कलमी सेवनामुळे मुखदुर्गंधी कमी होते. एक कपात एक चम्मच कलमी पावडर टाकून गुळण्या केल्यास हे एक उत्तम मुखशुद्धीकारक म्हणून काम करतो. याचा वापर कंडी आणि टूथपेस्ट मध्ये मिळवून तोंडातील कडूपणा दूर करू शकतो.

कलमीचे अनेक फायदे आहेत जसे याच्या पुडीचे सेवन केल्यास माश्तीश्क ताजेतवाने होते.कपड्यात याची पूड बांधून सरळ सुगंध घेऊनही लाभ मिळतो त्याशिवाय डोकेदुखी, झोप न लागणे, नकारात्मकता वाढणे यावर एक उत्तम उपाय आहे.

कलमीचे औषधीय गुण

कलमी फक्त चाऊन खाल्ल्यास दात मजबूत होतात याशिवाय ५ चम्मच शहद आणि १ चम्मच कलमी पूड मिळवून प्राशन केल्यास मुखरोग आणि उदरातील रोगावर आळा बसतो.

आपण जळल्याच्या जखमांच्या वेदना आणि हाडांच्या सांध्यामधील वेदनासाठी एक चम्मच कलमीपूड व चार चम्मच शहद मिळवून सकाळी नास्त्यासह केल्यास किंवा गरम पाण्यासह घेतल्यास बराच फायदा होतो. कलमीचे तुकडे पाण्यात उकडून त्याचा चहा पिल्यास आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. चहा मसाल्यात कलमीचा वापर होतो.

*गरम पाण्यात सुक्या अद्रकाची, लवंगाची आणि कलमीची पूड मिसळून एक कपसाठी एक चम्मच पूड चहात टाकून घेतल्यास कफाची व गळ्यातील संक्रमणापासून आराम मिळतो.

*दररोज एक चिमुट कलमी पूड एक चम्मच शहदासोबत चाखल्यास मानसिक कोशिकांना उत्तेजना मिळून त्या त्याज्यातवान्या होतात. त्यामुळे शरीरात उर्जा वाढते. त्वचा गोरी करण्यासाठी शहद व कलमिपुड १/४ प्रमाणात मिसळून त्वचेवर लावून मालिश करावी. विशेषतः मान व हातावरील त्वचा.

*चेहऱ्यावरील पुरळ आणि पिंपल्ससाठी १ चम्मच निम्बुचा रस व एक चम्मच कालमिपुड लावून मालिश केल्यास लवकर परिणाम दिसतात.

*१/२ चम्मच कलमीपूड १ कप पाण्यात उकडून सकाळी घेतल्यास झोप जास्त लागत नाही.

*व्यायाम करताना मास पेशींमध्ये वेदना होत असतील तर कालमिपूड चाहत टाकून घेतल्यास आराम मिळतो. याशिवाय १ कप दुधात १/२ चम्मच कलमीपूड घालून ते चांगल्याप्रकारे गरम करून सेवन केल्यास आराम मिळतो. यासोबत शहद घेतल्यास अधिक परिणाम मिळतात.

*हगवनित आराम मिळविण्यासाठी पुढील पैकीचे मिश्रण बनवावे, एक चम्मच कलमीपूड, अद्रक, जिरपूड आणि ४ चम्मच शहद या मिश्रणास दिवसाला 3 वेळा घ्यावे. उलट्या येत असेल तर एक चिमुट कलमी पूड शहदासोबत घ्यावी, लवकरच आराम मिळेल.

*डोके दुखीसाठी १ चम्मच पाणी, १ चम्मच कलमी पूड कपळावर लावून मालिश केल्यास किंवा लेपन केल्यास बराच आराम मिळतो.

*वजन कमी करण्यासाठी १ चम्मच शहद व १/२ चम्मच कलमी पूड गरम पाण्यात टाकून घेतल्यास आराम मिळतो. हे मिश्रण रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यावर उपाशी पोटी घेतल्यास प्रभावी परिणाम मिळतात.

*दररोज १/२ चम्मच कलमी पूड पाण्यासोबत घेतल्यास मधुमेह नियंत्रित करता येतो. ४० ते ४५ दिवस नियमित सेवनाने नक्कीच परिणाम दिसू लागतो.

कलमी मुख्यतः एक नैसर्गिक संरक्षक आहे. जे प्रामुख्याने त्वचा आणि श्वसनातील अपायकारक जीवाणूंना मारण्याचे गुण असतात. त्यामुळे भारतीय आहारात हे एक महत्वाचे मसाल्याचे पदार्थ मानल्या जाते. याचा वापर गरम पेय पदार्थांमध्ये केला जातो.

सावधानता

*कलमीमधील कैसिया यात कैमरीन पदार्थ जास्त मात्रेत असते. त्यामुळे यकृतासंबंधी आजारांना बळ मिळते.

*ज्या लोकांना अल्सर ह आतड्यांचा आजार जो पोटातील आजारांतील एक आहे. त्या लोकांनी कलमी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अल्सर चा त्रास वाढतो.

*गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कलमी तेलाचा वापर करावा. पोटांवर गर्भ धारणेवेळी धारा येतात त्यावर कलमी तेलाची मालिश करतात. परंतु योग्य सल्ला घेवून व कोणताही त्रास होत नसल्यास वापर करावा.

*सामान्यतः कलमी पूड १ व २ चम्मच रोज पाणी किंवा शहदासोबत घेतल्यास त्याचा लाभच आहे.

  1. Benefits Of Coconut Oil
  2. Benefits of Milk
  3. Benefits of Anjeer

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी कलमीचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा कलमीपासून होणारे काही स्वास्थ लाभ – Dalchini Benefits in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Benefits Of Dalchini – कलमीचे फ़ायदे या लेखात दिलेल्या कलमीच्या फायद्यांन  – Benefits Of Dalchini बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

1 thought on “कलमीचे लाभदायक फायदे | Benefits Of Dalchini In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top