Benefits of Drinking Water
आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या मते तरूणांनी दररोज 8 ग्लास पाणी प्यावे. इतके पाणी आपल्या आरोग्यासाठी जरूरी आहे परंतु आपण असे कधी कधी करत नाही.
चलातर पाणी पिण्याच्या फायदयांना जाणून घेउया.

पाणी पिण्याचे फायदे – Benefits of Drinking Water
पाणी योग्य प्रमाणात पिल्यामुळे आपण ब-याच समस्यांपासुन दूर राहू शकतो.
1. डोकेदूखी:
डोकेदुखी होण्याचे मुख्य कारण पाणी कमी पिणे होउ शकते यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिल्याने डोकेदुखीची समस्या दुर होउ शकते.
2. अन्नपचन:
शरीरामध्ये अन्नपचनासाठी योग्य प्रमाणात पाणी असणे जरूरी आहे. यासाठी नेहमी सांगितले जाते की जेवण केल्या नंतर भरपुर पाणी प्या.
3. वजन कमी करणे:
आपण जाणतो की आपण आपल्या जेवणाबाबत काळजी घेत नाही. महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिण्यामुळे वजन कमी होते. जेव्हा कधी तुम्हाला भुक लागते त्यावेळी योग्य प्रमाणात भरपुर पाणी प्या त्यामुळे भोजन कमी पोटात जाईल शक्यतो द्रवरूपातील पदार्थ सेवन करा. ज्युस कमी उष्मांकाचे सूप आणि इतर तरल पदार्थ यामुळे तुम्हास भूक कमी लागेल आणि तुमची वनज कमी करण्याची ईच्छा नक्कीच पूर्ण होईल.
4. कर्करोगापासुन बचाव:
भोजन पचवण्यासोबत पाणी 45% पर्यंत मलाशयाचा कर्करोग आणि 50% पर्यंत मुत्राशयाचा कर्करोग बरा होण्यास मदत मिळते त्यासोबतच 70% पर्यंत स्तनाचा कर्करोग बरा करण्याची क्षमता पाणी पिण्यामुळे शरीरात निर्माण होते. त्यामुळे शक्यतोवर योग्य मात्रेत नित्यनियमाने पाणी पिणे आवश्यक आहे.
5. हृदयासंबंधी रोग:
पाणी पिण्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे हदयासंबंधी रोगनियंत्रित ठेवण्यास मदत मिळते योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे ह्नदयविकाराचा धक्का येण्याच्या शक्यता कमी होतात.
काही गोष्टींचे लक्षात असुदया:
1. डोक्यात पाण्याचे प्रमाण ब-यापैकी असते त्यामुळे कमी प्रमाणात पाणी पिल्यास चक्कर येणे, थकवा येणे, डोके दुखणे अशा समस्या उद्भवू शकतात त्यामुळे पर्याप्त मात्रेत पाणी नक्की प्या.
2. दररोज किमान 8 ग्लास पाणी पीणे जरूरी मानले जाते.
3. पाणी शुध्द आणि पिण्यायोग्य असावे. खारे पाणी शक्यतो पिणे टाळावे.
4. पाणी पिण्याची सवय नियमीत करण्यासाठी एक दोन आठवडे रोजच्या पाणी पिण्याची नोंद ठेवा त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिण्यात येईल व तोवर तुम्हास सवय लागेल.
5. आई वडीलांनी आपल्या पाल्यांना पाणी योग्य प्रमाणात पिण्याची सवय लावावी. पाणी पिण्याचे फायदे समजून सांगावे.
आपण काही डाॅक्टर नाही आहोत तरीही स्वतःच्या आरोग्याची काळजी आपणास स्वतः घेणे आवश्यक आहे त्यामुळे शक्यतो स्वतः चांगल्या सवयींना पाळणे शिका . . . .
लक्ष्य दया: Benefits of Drinking Water in Marathi – पाणी पिण्या बाबत टिप्स तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्