Email che Fayde
मित्रांनो,आजच्या लेखात आपण पाहणार आहोत इमेल फायदे आणि तोटे, आज आपण एकमेकांशी संवाद साधण्याच्या काही पद्धतींविषयी जाणून घेऊ, आणि त्यामधील
एक म्हणजे इमेल, हि एक प्रभावी पद्धत आहे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी खूप दिवसांपासून हि पद्धत वापरली जात आहे. चला आता जाणून घेऊया इमेल चे फायदे आणि तोटे –
काय आहेत ईमेल चे फायदे आणि तोटे – Benefits of email in Marathi
इमेल चे फायदे – Advantages of Email in Marathi
-
इमेल ला कोणत्याही प्रकारची किंमत मोजावी लागत नाही – No Needs of Money for Email
पहिला आणि सर्वात मुख्य फायदा म्हणजे याला कोणत्याही प्रकारे कोणतीही किंमत मोजावी लागत नाही, जवळ जवळ हे फ्री च आहे आणि याला दर महिन्याला पेड ची गरज पण नाही. फक्त एक वेळ तुम्हाला त्यामध्ये खाते उघडावे लागेल.
-
सर्वांच्या उपयोगाचे – Useful For All
एकदा खाते उघडल्यानंतर इमेल हि सेवा प्रत्येकासाठी वापरणे खूप सोपे आहे.
त्यानंतर तुम्ही कोणालाही इमेल करू शकता, त्याचबरोबर तुम्ही तुमचा डेटा आणि तुमचे संपर्क त्यामध्ये सेव करून ठेवू शकता.
-
वेगवान माध्यम – Fast medium
इमेल हे मेसेज पाठवण्याचे आणि रिसीव करण्याचे एक वेगवान माध्यम आहे, जसे आपण डोळ्याची पापणी उघडझाप करायला जेवढा अवधी लागतो अगदी तितक्याच वेळात आपण इमेल वर एक मेसेज पाठवू शकतो आणि रिसीव करू शकतो.
आणि हे मेसेज पाठवण्यासाठी जवळ जवळ फक्त एक सेकंदच लागतो.
-
सर्व जगात वापरल्या जाणारे – Used all over the world
सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे जगातल्या काना कोपऱ्यात वापरले जाणारे प्रभावी साधन आहे.
एखादा व्यक्ती जगात कुठेही असो आपण त्याच्याशी इमेल द्वारे संपर्क साधू शकतो फक्त गरज असेल ती म्हणजे इंटरनेट कनेक्शन ची.
-
पर्यावरणासाठी उपयोगी – Useful for the Environment
पूर्वी संभाषणासाठी पत्र व्यवहाराचा उपयोग केल्या जात असे परंतु इमेल मुळे कागदांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला परिणामी कागदासाठी होणारी जंगलतोड कमी झाली आणि पर्यावरणासाठी हि गोष्ट अनुकूल झाली.
-
इमेल मुळे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आल्या – Everything came together in the email
email फक्त मेसेज पाठवणे आणि रिसीव करण्यासाठीचे प्रभावी साधन नसून आपला मौल्यवान वेळ वाचवण्यासाठीचे तसेच आपल्या पुष्कळ फाईल्स आपण सेव करून ठेवण्यासाठीचे आणि त्या फाईल्स जेव्हा आपल्याला हव्या असतील तेव्हा आपण त्या उपयोगात आणू शकतो याकरिता सुद्धा हे उपयोगी साधन आहे.
इमेल वापरण्याचे तोटे – Disadvantage of Email in Marathi
-
भावनांची कमतरता – Lack of emotion
इमेल वापरणे हे संभाषणाचे एक उत्तम साधन आहे. आणि जलद ही! परंतु त्यामुळे वैयक्तिक रिलेशन मध्ये भावनांची उणीव भासत आहे, इमेल हि पूर्वीच्या काळात होणाऱ्या पत्रव्यवहाराची बरोबरी करू शकत नाही.
-
एकाच वेळी आलेले खूप मेल सांभाळू शकत नाही – Can’t Use more than one Email
इमेल मध्ये प्रमाणापेक्षा जास्त मेल एकाच वेळी आले तर आलेले मेल एकाच वेळी हाताळता येत नाही आणि त्यामुळे आपला थोडा वेळ व्यर्थ जातो.
तसेच त्यामुळे एखादा महत्वाचा मेल आपल्याला वेळेवर मिळत नाही.
-
मेसेजस मुळे चुकीची माहिती पसरते – Messages spread misinformation
इमेलच नाही तर सोशल मिडिया वर पण मेसेजस मुळे चुकीची माहिती पसरते, एखादी व्यक्ती एखादा मेसेजच्या पाठीमागची सत्यता न पाहता त्याला दुसऱ्याला फोरवर्ड करतो, आणि खूप वेळा या मुळे समाजातील शांताता भंग पावते.
आणि चुकीची माहिती सुद्धा पसरते.
-
उत्तर पाठवण्यासाठी दबाव – Pressure to send the answer
आपल्याला आलेल्या मेसेज चा रिप्लाय देण्याचा आपल्यावर मानसिक दबाव असतो जसे एखाद्याला रिप्लाय दिला नाही तर त्याला वाईट वाटेल का ? किंवा त्याने माझा मेसेज पाहिल्यावर मला त्याने रिप्लाय का नाही केला वगैरे वगैर.
-
इमेल मुळे वेळ वाया जातो – Wasting of Time
ज्या प्रमाणे इमेल वेळ वाचवते त्याच प्रमाणे वेळ वाया हि घालवते जसे एखादी इमेल वापरणारी व्यक्ती आहे ती एखादा मेसेज पाठवल्यानंतर सतत सतत इमेल उघडून चेक करते कि समोरच्याचा रिप्लाय आला असेल का ? आणि चेक करता करता त्याला कधी त्या गोष्टीची सवय पडून जाते त्यालाच कळत नाही.
आणि या प्रकारे कधी इमेलची आपल्याला सवय लागून जाते आणि कधी आपला वेळ वाया जातो कळतच नाही.
-
काही इमेल मध्ये वायरस पण असू शकतात – Some emails may even contain viruses
असे आवश्यक नाही कि प्रत्येक इमेल मध्ये वायरस असेलच पण कधी कधी काही इमेल्स असे असतात कि ज्यामध्ये वायरस असतात पण आपल्याला ते कळत नाही आणि आपण तो मेल उघडतो आणि त्यानंतर आपल्या कम्प्युटरची स्पीड आपल्याला स्लो होताना दिसते, असे झाले कि समजून जायचे कि त्या मेल मध्ये वायरस आहे, आणि शक्यतोवर असे अनोळखी मेल उघडायचेच नाहीत.
कारण त्या मुळे आपल्या कम्प्युटर ला धोका असतो.
तर याप्रमाणे आपण आज या लेखात बघितले संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी एक इमेल चे फायदे आणि तोटे.
तसेच आपण यामध्ये इमेल च्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींना पण समाविष्ट केले आहे ज्यामुळे आपल्याला याविषयी सविस्तर आणि योग्य माहिती मिळेल.
अश्याच प्रकारची अजून माहीती मिळवण्यासाठी Majhi Marathi ला अवश्य भेट द्या.