Honey – शहद हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या व गोड पदार्थामधील एक आहे. आरोग्यासाठी शहद अत्यंत फायदेमंद आहे. आजच्या काळात सर्वांच्याच स्वयंपाक घरात शहद सापडते. आपण आज शहदाच्या फायाद्याविषयी माहिती जाणू या.
शहद चे स्वास्थवर्धक फ़ायदे – Benefits of Honey in Marathi

शहदाचे फायदे
१. शहद हृदयासंबंधी आणि कर्क रोगांसंबंधी रोगांमध्ये लाभकारी.
२. शहदामध्ये प्रतिरोधके आणि फ्लोनोविड तत्व शरीरात कर्करोग वाढविणाऱ्या तत्वांचा नाश करतात.सध्याच्याच संशोधनातून हे सिद्ध झाले आहे कि, शहद अल्सर आणि आतड्याच्या रोगांना कारणीभूत असणारया जीवाणूंना नष्ट करते.
३. मैदानी खेळामधील शारीरिक क्षमता वाढविणे.
पूर्वीच्या काळात नैसर्गिक साखरेचा भांडार म्हणून त्वरित उर्जा मिळविण्यासाठी शहद आणि अंजीराचा वापर करीत असतात.
४. गळ्यातील त्रास व कफ
अन्न गिळतांना त्रास होणे, गळा सुजणे, गळा बसने, खोकला व कफ वाढणे या सर्वावर शहद लाभदायी मानल्या जाते.अन्नामुळे तयार होणारया कफावर शहद अत्यंत लाभकारी सिद्ध होते.
५. रक्त शर्करा नियंत्रित करतो.
शहदामध्ये नैसर्गिक साखरेचा भांडार असतो. लवकरच टी शरीरात उर्जेत बदलली जाते. त्यामुळे रासायनिक साखरेपेक्षा शहद अत्यंत लाभकारी सिद्ध होते.
शहदाचा उपयोग नैसर्गिक साखर म्हणून आयुर्वेदिक पदार्थ व औषधीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. शहदामध्ये अनेक औषधीय तत्वांचा समावेश आहे. त्यामुळे याचा वापर अनेक औषधीमध्ये केला जातो. यामुळे शरीरात नैसर्गिक साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते.
६. जखम आणि जळल्यामुळे झालेल्या जख्मावर उपचार
शहदाचा वापर काही जखमा व जळल्यामुळे होणारया संक्रमणावर केला जातो. यातील प्रतिजैविक घटकांमध्ये जखमा दुरुस्त करण्याची क्षमता असते. जख्मावर शहद लावल्याने जखमा लवकरच बरया होतात.
७. प्रोबायोटिक – हानिकारक जैविकीय घटक
अनेक प्रकारच्या शहदामध्ये हानिकारक जीवाणू मोठ्या संख्येने अस्तित्वात असतात. यामध्ये ६ प्रकारचे लोक्टोबेसिली आणि ४ प्रकारचे बिफिडोब्याक्टेरीया यांचा समावेश आहे.
८. शहद रक्तशुद्धीसाठी लाभदायक मानले जाते.
शहद जेवढे अधिक सेवन केले तेवढे ते जास्त परिणामकारक प्रभाव शरीरावर टाकतो. शहद कोमट पाण्यासोबत मिसळून घेतल्यास लाल रक्तपेशीवर याचा चांगला प्रभाव पडतो. त्यांची संख्या वाढते त्यामुळे रक्तात ऑक्सिजन अधिक मात्रेत शरीरात पोहोचतो. त्यामुळे शरीरात हेमोग्लोबिन चे प्रमाण वाढते. अनेमिया सारख्या आजारावर प्रभावशाली औषध म्हणून शहद सेवन केले जाते.
शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे ऑक्सिजन शरीरात योग्य प्रमाणात विधीत भागात पोहोचत नाही. त्यामुळे शहदाचे सेवन केल्याने हि व्याधी नियंत्रण करता येते.
थकवा, डिप्रेशन आणि इतर अनेक रोगांवर शहद प्रभावीपणे उपचार करतो. शहद सेवनामुळे शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढून शरीर स्वस्थ होण्यास मदत मिळते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असणे फार जरुरी आहे. यामुळे आपले शरीर स्वस्थ व तंदुरुस्त ताहते.
शहद उच्च मानसिक दाब व उच्च रक्तदाब या दोन्ही व्याध्यावर अत्यंत लाभदायक मानले जाते.
९. साखरेच्या तुलनेत शहद अधिक योग्य व सुरक्षित
अध्ययनानुसार पांढरी साखर शरीरासाठी अति सेवनामुळे घातक मानली जाते. तर शहदाचा वापर साखरेपेक्षा अधिक योग्य आणि आरोग्यदृष्ट्या अधिक सुरक्षित मानले जाते. शहदामध्ये साखरेच्या तुलनेत कमी घातक तत्व असतात. यामध्ये ३० % ग्लुकोज ४० % फुक्टोज आणि २०% जड साखर तर १०% डेक्साट्रीन आणि स्टार्च फायबर असते हे प्रमाण साखरेपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्यास शहद सहाय्यक ठरते.
१०. योग करणाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक
योग करणाऱ्या व्यक्तीने शहदाचा वापर केल्यास त्यास याचा फार फायदा होतो. शरीराचे सास्थ अधिक चांगले होण्यासाठी शहद उपयोगी सिद्ध होते. सकाळी कोमट पाण्यासोबत याचे सेवन केल्यास हे फार लाभदायी ठरते.
११. शहद उत्तम एन्टी ब्याक्टेरीयल आणि एन्टीसेप्टिक
शहद शरीरात प्रतिरोधके वाढवतो. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील एन्टी बोडीज उत्तेजित करतो त्यामुळे शरीर रोगांशी चांगल्याप्रकारे लढते. जख्मावर शहद लावल्यास जखमा बऱ्या होतात. पोटातील अल्सरवर शहद अत्यंत लाभकारक मानले जाते.
ज्या रोग्यांना अस्थमा आहे त्यांनी दररोज शहद सेवन करायला पाहिजे.
वैद्यकीय संशोधनातून हे सिद्ध झाले आहे कि पोटातील अपायकारक जंतूंना शहद सेवनाने मारता येते. पोटातील संक्रमण कमी करतो. शरीरात प्रतीजैविक घटक वाढवितो.
१२. शहद एक उर्जेचे स्रोत
शहदाचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. याचा वापर मुख्यत्वे औषधी बनविणे तसेच स्वतः शहद हे एक उत्तम औषधी मानले जाते. यातील फुक्टोज आणि ग्लुकोज मिळून सुक्रोस हि पचनक्रिया सुलभ बनविणारी शर्करा तयार करतात त्यामुळे शरीरास पाहिजे तेवढी उर्जा अन्नातून मिळते.
शहदाचे सेवन केल्यावर लगेच उर्जा मिळते यातील सिम्पल शुगर रक्तात लवकरच मिसळून त्याचे उर्जेत रुपांतर होवून शरीरात ती खर्च करण्यास तयार असते. त्यामुळे शहद हे उर्जेचे एक उत्तम स्रोत आहे.
यात जीवनसत्वे व खनिजे चे प्रमाण कमी असते यात रेबोफ्लोबीन, प्यान्थोथेनिक एसिड, क्याल्शियम, आयरन, म्यान्ग्नीज व फोस्फोरस पोट्याशियम व झिंकचे प्रमाण असते जे आरोग्यास लाभदायक असतात.
१३. शहद पचनक्रियेस मदत करतो
शहद अपचन, वायू कफ आणि मुळव्याध इत्यादी रोगांवर चांगले प्रभावी ठरते. यात भरपूर मात्रेत प्रतिजैविक असतात. जे पचनक्रियेत सुकर करण्यास मदत करतात. शरीरातील आंतरिक कार्यान्वन ठीक करतो. एलर्जी वाढण्यास रोखतो. शहद कधीच खराब होत नाही त्याचा हा गुण त्यास एक उत्तम प्रतिजैविक बनविते. त्यामुळे शरीरास विविध हानिकारक जैविक घटकांशी लढण्यास मदत मिळते.
शरीरातील विषजन्य पदार्थांना शरीराबाहेर टाकण्यासाठी शहद उपयोगी सिद्ध होते.
शहद १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना देवू नये. कारण शहदामधील काही प्रतिजैविक घटक बालकांना वाढीसाठी मदत करणारया लाभकारी जीवाणूंना नष्ट करू शकते त्यामुळे त्यांनी करी मात्रेत शहद घ्यावे.
शहदाचा आयुर्वेदात उपयोग
शहद हे एक संपूर्ण नैसर्गिक साखर मानले जाते. त्यामुळे ते लवकर उर्जेत रुपांतरीत होते याचा वापर शरीरासाठी लागणाऱ्या विविध टॉनिक्स व रक्त वाढविणाऱ्या औषधींमध्ये होतो. ज्यापैकी बऱ्याच औषधी आयुर्वेदीक आहेत. जेव्हा ह्या औषधी शरीरात प्रवेश करतात तेव्हा शहद यांना त्वरित उर्जेत व त्याच्या प्रभावात रुपांतरीत करतो.
सिद्ध शुद्धीकरणात शहदाचे विशेष महत्व मानले जाते. शरीराची उष्णता वाढणे, उलट्या होणे तसेच इतर अनेक आजारावर शहद लाभकारी मानले जाते. आयुर्वेदात ७ प्रकारचे शहद मानले जाते. त्यापैकी डोंगराळ प्रदेशात सापडणारे शहद सर्वोत्तम मानले जाते. औषधीमध्ये त्याचे गुण जास्त वेळ टिकवण्यासाठी शहदाचा वापर होतो. पर्वतीय शहदामध्ये अनेक औषधी गुणांनी भरलेले तत्व असतात.
शहदाचा पारंपारिक उपयोग
1-3 चम्मच शहद कोमट पाण्यासोबत सेवन केल्यास शरीरात लवकरच उर्जा मिळते व शरीर उर्जावान होते. याचा वापर वजन नियंत्रित करण्यास हि होतो.
शहद जखमांना लवकर बरे करतो. जखमांवर शहद लावल्यास त्या जलद गतीने बऱ्या होतात. चेहऱ्यावरील साचलेली घाण दूर करण्यासाठी शहद वापरले जाते.
चेहऱ्यावरील काळे डाग काढणे व चेहरा चमकदार करण्यासाठी शहद वापरले जाते.
शहद व निंबू रस समान मात्रेत मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा टवटवीत व चमकदार होतो.
शहद व अद्रकाचा रस काढून एकत्र मिळवून १५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावे. रोज सकाळी हे द्रावण दोन चमचे कोमट पाण्यासोबत घेतल्यास गळ्यातील विकार व रक्त शुद्धीकरणास मदत मिळते. हे द्रावण फ्रीजमध्ये ५-६ दिवस राहते.
अद्रकावरील साल काढून त्याचे बारीक तुकडे करून एका छोट्या तोंडाच्या बरणीत भरावे त्यात अद्रक डूबेपर्यंत शहद भरावे. ह्या बरणीचे तोंड घट्ट बंद करून १५ दिवस कडक उन्हात ठेवावे नंतर दररोज पहाटे अद्रकाचे 3-४ तुकडे तोंडात ठेवून चावत राहावे ह्यामुळे खोकला व सर्दीत फार आराम मिळतो.
उन्हात ठेवलेले शहद व अद्रकाच्या मिश्रणात २ निंबूचा रस व २ कप कोमट पाणी मिळवून हिवाळ्यात घेतल्यास घश्याच्या आजारापासून मुक्तता मिळते.
हृदयाची काळजी
अद्रक रसात १ चम्मच शहद पहाटे खालीपोट घेतल्यास हृदयातील रक्तसंचार सुरळीत होतो.
सर्दीसाठी शहदाचा उपयोग
अद्रक रस व शहद समप्रमाणात घेवून त्यात थोडी हळद मिळवून पहाटे घेतल्यास सर्दी बरी होते.
आणखी काही उपचार
-निम्बांच्या पानांना कुटून त्याचा घट्ट मिश्रणाचे गोल गोल बनवावे. बादलीत ठेवून वरून त्यात डूबेपर्यंत शहद भरावे हे १०-१२ दिवस उन्हात ठेवावे याचा उपयोग पोट साफ करणे व चांगले पचनासाठी रोज सकाळी खालीपोट सेवन केल्यास पोटातील विविध व्याधी दूर होतात.
टरबूज व अद्रक आपल्याला थंड ठेवतात.
खाली दिलेले थंड पेय आपल्याला उन्हाळ्यात थंड व उष्माघातापासून वाचवतो.
साहित्य
१) ५०० ग्रॅम टरबूज सालीवीना कापलेले.
२) १० ग्रॅम अद्रकाचे तुकडे.
३) पुदिना पत्ते ४-५ बारीक कापावे
४) मीठ चवीनुसार
५) काळे मिरे ५-६ पिसून बारीक केलेले
६) ४ चम्मच शहद
विधी
सर्व प्रथम टरबूजाचे बारीक काप कापावे.अद्रकाची साल काढून त्यास बारीक किसून त्याचा रस काढावा आपल्याला २ चम्मच रस हवा. टरबुजाचे काप अद्रकाचा रस काळे मिरे पिसून, पुदिन्याच्या पानाचे बारीक काप आणि शहद हे मिक्सरमध्ये मिसळून चांगल्याप्रकारे गाळून सकाळी पहाटे खालीपोट घेतल्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व उन्हात निघाल्यावर रक्षण होते.
शहद आणि षड्माशांचे काही रोचक ज्ञान
१. शहदमाशांच्या जगात जवळपास २५००० प्रजाती आहेत. त्यापैकी काहींचीच ओळख झाली आहे.
२. बाजारात मिळणारे ८०% शहद पाळेलेल्या शहदाच्या माशांद्वारे बनते.
३. सर्वात आधी सुमारे इ.स.६०० मध्ये शहद गोळा करत असल्याचे पुरावे आहेत.
४. ५०० ग्रॅम शहद बनविण्यासाठी माशांना २० कि.मी.प्रवास करावा लागतो.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शहदचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की हा शहद चे स्वास्थवर्धक फ़ायदे | Benefits of Honey in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट : Benefits Of Honey – शहदचे फ़ायदे या लेखात दिलेल्या शहदच्या फायद्यांन – Benefits Of Honey बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.