किवी फळाचे स्वास्थ्यवर्धक फायदे

Kiwi – किवी हे फळ वा चिनी करवंद एक प्रकारचे फळ आहे. याचा आकार साधारण कोंबडीच्या अंडयाऐवढा लांबीला असतो, या फळात शरीराकरता लागणारे लाभदायक फायबर भरपुर मात्रेत असतात, बाहेरून हे फळ भु.या त्वचेचे आणि आतुन गडद हिरव्या रंगाचे असते ज्यात खाण्यायोग्य बिया देखील असतात.

हे फळ आतुन खुप मऊ आणि चवीला गोड असतं परंतु या किवी ची चव अन्य फळांपेक्षा खुप वेगळी असते. वेगळया चवीकरता सुध्दा किवी प्रसिध्द आहे. ब.याच देशांमध्ये याची शेती केली जाते, जसे इटली, न्युझीलेण्ड, चिली, ग्रीस आणि फ्रांस.

Kiwi Fruit

किवी फळाचे स्वास्थ्यवर्धक फायदे – Benefits of Kiwi Fruit in Marathi

विटामिन C चा उत्तम स्त्रोत –

आपल्याला नेहमी हे सांगण्यात आलं की लिंबु आणि संत्र सर्वाधीक व्हिटामीन C देणारी फळं आहेत. परंतु हे खोटे आहे कारण किवी फळाचे परिक्षणाअंती हे समजले की प्रत्येक 100 ग्रॅम किवीत 154 टक्के व्हिटामिन C चे प्रमाण आढळते जे लिंबु आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट आहे. व्हिटामिन C आपल्या शरीरात अॅंटीआॅक्सीडेंट च्या रूपात काम करतं आणि आपल्या शरीराला कॅंसर सारख्या भयावह रोगापासुन वाचवते तसेच व्हिटामीन ब् शरीराच्या रोग प्रतिकाराक क्षमतेला देखील वाढवण्यास साहायक आहे.

सुंदर त्वचा –

नैसर्गिक रित्या किवी क्षारयुक्त आहे या अर्थी हे खाण्याला आपल्याला थोडेसे आंबट देखील लागते. एक संतुलीत शरीर ते असते ज्यात PH चे चांगले संतुलन आहे यामुळे आपले शरीर सक्रीय, फ्रेशनेस ने पुर्ण, आणि आपल्या त्वचेला तरूण ठेवण्यात मदत मिळते. असे म्हंटल्या जाते की किवीत असणारे व्हिटामीन C आणि E आपल्या शरीरात अॅंटीआॅक्सीडेंट सारखे काम करते आणि त्वचेच्या दुर्दशेपासुन आपल्याला वाचवतात. या समस्येपासुन वाचण्याकरता आणि आपल्या त्वचेला संुदर ठेवण्याकरता किवीला आपल्या त्वचेवर लावावे.

फोलेट करता उत्तम स्त्रोत –

चीनी लोक काही कारणाशिवाय किवी ला एक औषधी मानत नाहीत, खरतर किवी मध्ये व्हिटामीन B6 विपुल प्रमाणात आहे. व्हिटामीन B6 लाच फोलेट म्हंटल्या जातं. व्हिटामीन B6 आपल्या शरीराला आणि गर्भाला स्वस्थ ठेवण्यात सहायक आहे तसच वाढत्या मुलांकरता देखील किवी लाभदायक आहे.

किवी मुळे पाचनक्रिया सुधारते –

किवी फायबर चा एक उत्तम स्त्रोत आहे. यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्येला कधी सामोरे जावे लागत नाही.

डायबिटीज असणा.यांकरता किवी गुणकारी आहे –

ग्लीसमिक च्या इंडेक्स मधे किवी सर्वात खालच्या स्थानावर आहे याचा अर्थ असा आहे की किवी तुमच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढवत नाही. त्यामुळे आम्ही निश्चित रूपानं असं म्हणु शकतो की डायबिटीज असणारे देखील किवी खाउ शकतात.

आकर्षक चव –

किवी चा आकार आणि चव दोन्ही वैशिष्टयपुर्ण आहेत. लहान मुले खुप आवडीने किवी हे फळ खातात कारण इतर फळांपेक्षा किवी अगदीच वेगळे आहे. शरीराला संतुलीत पोषण मिळण्याकरता सर्व त.हेची फळं आणि अन्न खाणं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक खाद्यान्नात वेगवेगळे गुणधर्म आणि ताकद असते. आपला आहार निश्चित करतांना ब.याच लोकांसोबत ही समस्या असते की ते ब.याच कमी खाद्यान्नाला आपल्या आहारात समाविष्ट करतात त्यामुळे त्यांना पुरेसे पोषण तत्व मिळत नाहीत.

चांगली झोप –

अभ्यासाअंती असे लक्षात आले की झोप न येण्याच्या समस्येवर किवी एक चांगला उपाय आहे. युवकांना आणि लहान मुलांना जर पुरेशी झोप येत नसेल तर किवी त्यावर एक उत्तम उपाय आहे. याच्या सेवनाने झोपेचा अवधी अगदी सहज वाढतो आणि कुठल्याही व्यत्ययाशिवाय तुम्ही गाढ झोप घेउ शकता.

साठवण –

फळांना नेहमी पिकवण्याकरता आधीच तोडले जाते आणि मग त्याची साठवण केली जाते त्यामुळे ते सहजतेने 8 आठवडयाच्या आतच मार्केट ला पाठवता यावे म्हणुन.

किवी ची साठवण केल्यानंतर काही दिवसातच ते पिकतात पण किवी ची साठवण थेट सुर्यप्रकाश पडेल अश्या ठिकाणी करू नये. जर तुम्ही किवी ला एका पेपर बॅग मध्ये सेफ आणि केळासोबत ठेवाल तर ते लवकर पिकेल. एकदा का किवी पिकले तर त्याची फार काळजी घ्यावी लागते कारण हे फळ फार मुलायम असते, म्हणुन नेहमी लोक किवीला फ्रिज मधेच ठेवणे पसंत करतात. साधारणतः एक ते दोन आठवडयात तोडुन ठेवलेले किवी अगदी सहज पिकतात.

Read More:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Kiwi चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा किवी फळाचे स्वास्थ्यवर्धक फायदे – Benefits of Kiwi Fruit तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट: Benefits of Kiwi- किवी चे फायदे  या लेखात दिलेल्या किवीच्या फायद्यांन  -Benefits of Kiwi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया

1 thought on “किवी फळाचे स्वास्थ्यवर्धक फायदे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top