गुणकारी मेथीचे स्वास्थ वर्धक फायदे | Benefits of Methi in Marathi

भारतीय पक्वान्नामध्ये नेहमीच Methi – मेथीचा वापर केला जातो. मेथीचे सेवन आपल्या स्वास्थासाठी चांगले असते.

Benefits of Methi

मेथीचे फायदे – Benefits of Methi in Marathi

मेथीमध्ये आढळणारे पोषके

मेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीचे बीज फारच कडू असते. त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येते.

मेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते. यासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात.

मेथीने होणारे आरोग्यदायी फायदे

मेथीचे बीज ट्रीगोनेलीन लाईसीन आणि एल ट्रीप्तोफान चे चांगले स्रोत आहेत. यासोबतच मेथीचे बीज स्यापोनीन आणि तंतू यांनी संपन्न असतात. जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात.Udit Narayan

मेथी आणि त्याच्या बीजांचा लाभदायी वापर खाली दिलेले आहेत. पारंपारिक पद्धतीने मेथी आणि त्याच्या बीजांचा वापर अनेक प्रकार करता येतो.

-रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रित करतो. मेथीमधील एन्टी डायबेटिक तत्व जे शरीरातील इन्सुलिन स्त्रावास हायपर ग्लीस्मिक पाद्धतीने वाढण्यास सहाय्यक असतात. मेथी संवेदनशीलता वाढविण्यात सहाय्यक असते. मेथीमधील ४१+०-११इ मधुमेहाच्या उपचारासाठी नेहमीच वापर केला जातो.

कोलेस्ट्रोल ला कमी करतो

मेथीमध्ये स्यापोनीन सापडते जो शरीरातील कोलेस्ट्रोलच्या प्रमाणास कमी करतो यासोबतच काही अध्ययानातून सिद्ध झाले आहे कि स्यापोनीन शरीरातील कोलेस्ट्रोल च्या स्तरास दूर करतो. मेथी पोटातील पथरी बाहेर टाकण्यास लाभकारी सिद्ध होते. हानिकारक कोलेस्ट्रोल शरीराबाहेर काढतो.

स्त्रियांमध्ये दुधास वाढविण्यास सहाय्यक

प्राचीन काळापासून मेथीचा वापर मातांमध्ये स्तनांना दूध वाढवण्यासाठी करत अलेलो आहे. याच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही प्रमाण नाही. काही अध्ययनात असे सिद्ध झाले आहे कि हे दूध उत्पादनासाठी उपयोगी आहे.

कर्करोगापासून बचाव

अभ्यासातून हे माहिती झालेले आहे कि मेथी मधील तंतू आपणास कर्करोगापासून वाचवतो मेथीमध्ये एस्ट्रोजेनिक प्रभाव असतो जो हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी साठी विकल्प बनू शकतो दुसरया अभ्यासातून हे माहिती झाले आहे कि मेथी मधील स्यापोनीन आणि कफ खाण्यातील विषारी पदार्थांना बांधून ठेवतो व शरीराबाहेर पाठवून देतो. तसेच मेथी आपल्याला पोटातील व गळ्यातील कर्करोगापासून वाचवते.

वजन कमी करण्यास सहाय्यक

मेथी मध्ये आढळणाऱ्या तत्वामुळे वरून पुरेसा व्यायाम केल्यास वजन कमी होते. मेथी शरीरासाठी कमी वेळेत जास्त उर्जेची निर्मिती करतो, तसेच अतिरिक्त चरबीस बाहेर टाकतो.

मेथीचा उपयोग नेहमीच आपण नैसर्गिकरित्या करतो.

मेथीच्या पाक तत्वान्मुळेच भाज्यांमध्ये त्यांचा वापर होतो.

भारतात प्राचीन काळापासून भारतीय महीला याचा स्वयंपाक घरात वापर करतात. प्राचीन जाणकारांच्या मते ताज्या मेथीची पान बारीक करून केसांना व त्वचेवर लावल्यास केस मुलायम व कोंड्याची समस्या दूर होते. त्वचा चमकदार होते.

ताप असताना मेथी, निंबूरस आणि शहद यांचा हर्बल चहा म्हणून ग्रहण करतात.

मेथीचा वापर महिलांमध्ये हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी व स्तनांचा आकार वाढविण्यासाठी होतो.

मेथी बिजांमध्ये जीवनसत्व E जास्त प्रमाणात असते. त्यामुळे याचा वापर अचारामध्ये मुख्यत्वे केला जातो.

मेथीची सुकी पान मसालेदार भाज्यांच्या मसाल्यात केला जातो.

एक्जीमा, जळजळ, फोड येणे, वात रोग्यांना मेथी खायला सांगितले जाते.

आपल्या आहारात मेथीचा समावेश केल्यास अनेक फायदे आहेत. मेथीचे अधिक सेवन हि हानिकारक असू शकते तेव्हा मेथी खाताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

मेथी खाल्ल्याचे दुष्परिणाम

मेथी बीज जास्त खाल्ल्यास आंतरिक रक्तस्त्राव होऊ शकतो.

जास्त मात्रामध्ये मेथीचे सेवन गर्भवतीने करणे हानिकारक असू शकते.

उलट्या, अपचन पोटातील वायू, सुजन आणि मूत्रात गंध येणे हे मेथीच्या जास्त खाल्ल्याचे दुष्परिणाम असू शकतात.

त्वचा जळ जळ करणे आणि एलर्जी ची समस्या मेथी खाल्ल्यास होऊ शकते.

मेथीपासून तयार होणारे व्यंजन

१)मेथी मुग डाळ भाजी
१ चम्मच तेल कढई मध्ये गरम होऊ द्या. त्यात १/२ चम्मच जिरे टाका. त्यास तडफड करू दिल्यानंतर कांदा काप,२ कापलेली लसणाच्या पाकळ्या आणि स्वादासाठी कापलेल्या हिरव्या मिरच्या टाका. त्यानंतर त्यास १-२ मिनिटे चांगले होऊ द्या.

त्यात एक चिमुट हळद, २ कप कापलेली मेथीची पाने आणि चवीनुसार मीठ घाला. काही मिनिटे झाल्यावर त्यात १/3 कप भिजलेली मुंगडाळ आणि १ कपभर गरम पाणी घाला.

आता हे मिश्रण चांगले शिजू द्या नंतर पाणी कमी झाल्यास १/२ कप पाणी घाला. त्यात १ चहा चम्मच बेसन घाला नंतर ते १०-१५ मिनिटे होऊ द्या. मुंगडाळ शिजल्यानंतर ग्यास बंद करा.

यास गरमागरम पोळी, पराठा किंवा भातासोबत खाऊ शकता.

  1. Benefits Of Coconut Oil
  2. Benefits of Milk
  3. Benefits of Anjeer

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मेथीचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा मेथीचे फायदे – Benefits of Methi in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Benefits Of Methi – मेथीचे फ़ायदे या लेखात दिलेल्या मेथीच्या फायद्यांन  – Benefits Of Methi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here