आश्चर्यजनक कांदयाचे फायदे | Benefits Of Onion

स्वयंपाक घरात अनेकांच्या डोळयात पाणी आणणारा Onion – कांदा तसा बहुगुणी आणि बहुउपयोगी आहे. ब-याच दुखण्यांवर कांदा रामबाण उपाय म्हणुन उपयोगात येतो. पुर्वीच्या काळी जेव्हां इतक्या मोठया प्रमाणात हाॅस्पीटल्स, दवाखाने उपलब्ध नव्हते तेव्हां घरगुती उपाय करून दुखणी बरी होत असत.

आश्चर्यजनक कांदयाचे फायदे – Benefits Of Onion

Benefits Of Onion

कांदयाचे महत्वाचे फायदे खाली दिलेले आहेत:

 • वेदना, सुजेला दुर पळवतो.
 • कांदा कृमींना दुर करतो आणि अॅंटीबायटीक आणि अॅंटीसेप्टीक तत्वासारखे काम करतो.
 • जठरातील फोडांपासुन वाचवतो आणि सोबतच अपचनाच्या समस्या दुर करून पोटातील गॅसेस च्या तक्रारी दुर होतात.
 • कांदा मुत्रवर्धक, पाचक, टाॅनिक असुन उत्तेजक आहे.
 • कोलेस्ट्राॅल, उच्चरक्तदाब, ह्नदयविकार आणि मिरगीत गुणकारी आहे.
 • कांदा कर्करोग अर्थात कॅंसरवरही गुणकारी आहे.
 • रक्ताला घट्ठ करून शुध्द ठेवतो.
 • सर्दी, कफ, ताप अश्या छोटया छोटया आजारांवरही कांदा गुणकारी आहे.
 • रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत राहाते आणि अॅनिमीया तसच दातांच्या सडण्यापासुनही कांदयापासुन बचाव होतो.

विशेष परिस्थीतीत कांदयाचा उपयोग:

आईच्या दुधाला वाढवतो – रोजच्या जेवणासोबत कच्चा कांदा खायला हवा.

दृष्टी – कांदयाचा रोज उपयोग केल्यास किंवा सेवन केल्यास दृष्टी चांगली राहाते.

अनिद्रेत – अर्थात झोप येत नसल्यास लाल कांदयाचा ज्युस प्यावा, रोज रात्री झोपण्यापुर्वी 4 चमचे ज्युस प्यावा. कांदयाचा ज्युस आपण उकळुन किंवा कच्चा सुध्दा सेवन करू शकतो.

कुत्रा चावल्यास – कांदयाला चांगले किसुन त्यात मध टाकुन चावलेल्या जागी लावावे यामुळे बॅक्टीरीयल इन्फेक्शन थांबेल. यासोबत कांदयाचा रस प्यावा.

साप चावण्यावरही कांदा गुणकारी – 15ml कांदयाच्या रसाला सरसोच्या तेलात मिक्स करावे आणि ज्याला साप चावलाय त्याला हे प्यायला दयावे, हा केवळ एक डोज आहे असा प्रयोग अध्र्या तासाच्या अंतराने आणखीन दोनदा करावा. असे केल्यास सापाचे विष कमी होईल.

गाठ झाल्यास – आपण कांदयाचा रस लावु शकता.

कानाचे दुखणे – कानाचे दुखणे असल्यास कांदयाच्या रसाला गरम करून 5 ते 6 थेंब कानात टाकल्यास दुखण्यात आराम मिळतो.

उन लागल्यास – कांदयाचा रस छातील चोळावा त्यासोबत आपण हा रस सेवन करावा. उन्हाळयात म्हणुनच जेवणावेळी रोज कच्चा कांदा खावा याने आपण उन लागण्यापासुन स्वतःचा बचाव करू शकता.

केस – काळया केसांकरता कांदा किसुन केसांना लावावा आपले केस काळे होतील.

टक्कल पडले असल्यास – टक्कल पडले असल्यास त्या जागी रोज कांदयाचा रस लावुन मसाज करावा असे केल्याने त्या जागी नवे केस येतील आणि केस गळण्याची समस्या देखील दुर होईल.

अपचन – अपचन झाले असल्यास कांदा जास्त खाल्ल्यास भुक वाढते आणि जेवण सहज पचतं याबरोबरच लिव्हर चे कार्य सुध्दा विकसीत होते आणि पोटदुखीवर आराम मिळतो.
अपचनात एक पुर्ण कांदा गॅसवर गरम करून त्याचा रस काढावा त्यात थोडे मिठ टाकुन प्यावे आराम मिळतो.

अजीर्ण – एक लाल कांदा घ्यावा त्यात थोडा लिंबाचा रस पिळावा आणि जेवतांना खावा यामुळे अजिर्ण असल्यास लगेच आराम मिळतो.

लहान मुलांना कांदयाच्या रसाचे पाच थेंब दयायला हवे.

अॅसिडीटी – अॅसिडीटी झाली असल्यास 60 ग्रॅम कांदयाला बारीक कापुन 30 ग्रॅम दही टाकावे एक आठवडाभर दिवसातुन 3 वेळा सेवन करावे.

अतिसार असल्यास कांदयाला चांगले किसुन बेंबी ला लावावे लगेच आराम पडेल.

किडनी स्टोन –

 • किडनी स्टोन विकारात कांदयाच्या रसात साखर टाकावी आणि सिरप तयार करावे याचे सेवन केल्यास समस्या दुर होते.
 • रोज सकाळी रिकाम्या पोटी 50 ग्रॅम कांदयाचा रस प्यावा याने देखील किडनी स्टोन मधे आराम मिळतो.

अस्थमा / दमा असल्यास –

 • कांदा किसावा आणि कफापासुन सुटका मिळवण्याकरता श्वासावाटे याचा वास घ्यावा याने अस्थमा आणि फुफ्फुसासंबधी समस्यांपासुन सुटका होते.
 • कांदयाच्या रसात थोडे मध टाकुन पिल्यास अस्थमापासुन सुटका होते.

सर्दी –

 • कांदयाचे सेवन केल्याने सर्दी आणि कफापासुन सुटका होते.
 • तीन चार चमचे कांदयाच्या रसात तेवढेच मध घालुन घेतल्यास कफाच्या समस्येपासुन सुटका होते आणि छोटया छोटया आजारातही यामुळे आराम मिळतो.

डोकेदुखी आणि उन्हामुळे होणारी डोकेदुखी – कांदा किसावा आणि तळपायांना चोळावा.

दात दुखत असल्यास –

 • दातांच्या सुरक्षेकरता कच्चा कांदा खावा यामुळे हानिकारक बॅक्टेरिया मरतात आणि तोंडाची दुर्गंधी कमी होते.
 • दात दुखत असल्यास त्या दातावर कांदयाचा तुकडा ठेवावा.

ह्नदयविकारात गुणकारी –

 • संशोधनानुसार असे समजले आहे की रोज कांदयाचे सेवन केल्यास ह्नदयविकारापासुन बचाव होतो.
 • जेवतांना रोज कांदा खाल्ल्यास आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रीत राहातो.

त्वचेसंबधी समस्यांपासुन –

 • कांदा नियमीत सेवन केल्यास त्वचेसंबधी समस्यांपासुन आराम मिळतो. त्वचेचा रंग उजळतो.
 • किसलेल्या कांदयाला उकळुन त्वचेवर लावल्यास त्वचेसंबधी इन्फेक्शन दुर होते.

अॅनिमीया – कांदयाचा रस किंवा कच्चा कांदा खाल्ल्यास शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं कारण यात जास्त प्रमाणात आयर्न असतं. आणि म्हणुनच म्हणतात कांदयाच्या सेवनाने ताकत वाढते.

उल्टी – समान मात्रेत कांदयाचा रस आणि अद्रकाचा रस एकत्र करून 2 चमचे सेवन केल्यास उल्टी थांबते.

रक्ताच्या समस्येकरता उपाय – 10 ग्रॅम कॅंडी शुगर आणि 1 ग्रॅम भाजलेले जी-याचे बीज 50 ग्रॅम रसासोबत मिसळुन सेवन करावे.

वर दिलेली माहिती कुठल्याही मेडीकल आधारावर देण्यात आलेली नाही म्हणुन यातील कुठलाही उपाय करण्यापुर्वी वैद्यकिय सल्ला जरूर घ्यावा.

कांदयाचे प्रकार – Ttypes of Onion

साधारणतः कांदयाचे बरेच प्रकार आढळतात.

लाल कांदा – कांदयाच्या प्रकारातील हा सर्वात तीखट प्रकार आहे याचा वरचा रंग लाल असतो आतला कांदा पांढरा असतो याला जास्त काळापर्यंत आपण ठेवु शकत नाही अश्या कांदयाचा जास्त उपयोग सलाद आणि सॅंडविच बनवण्याकरता केला जातो.

पांढरा कांदा – अश्या कांदयाची आतली आणि बाहेरची त्वचा पांढरी असते, हा कांदा देखील चवील चांगला असतो या कांदयाला आपण कच्चा आणि शिजवुनही खावु शकतो. अश्या कांदयाचा उपयोग नेहमी मॅक्सीयन कुकिंग करता केल्या जातो.

हिरवा कांदा – हिरव्या कांदयाला आपण अविकसीत कांदा म्हणु शकतो. या कांदयाला कच्चे आणि शिजवुनही खाल्ल्या जाते.

कांदा जेव्हा कच्चा खाल्ल्या जातो तेव्हा जास्त फायदा होतो तसच जेव्हा कांदा कापला जात नाही आणि शिजवला जात नाही तेव्हा त्यात जास्त न्युट्रिशन्स् असतात तरीही शिजवलेल्या कांदयात पुरेश्या प्रमाणात न्युट्रिशन मिळतात जे आपल्या आरोग्याकरता लाभदायक असतात.

Read More:

 1. Benefits Of Coconut Oil
 2. Benefits of Milk
 3. Benefits of Anjeer

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी कांदयाचे फायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा कांदयाचे फायदे – Benefits Of Onionतुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Benefits Of Onion – कांदयाचे फायदे या लेखात दिलेल्या कांदयाचे फायद्यांन  – Benefits Of Onion बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top