Home / Health / स्ट्राॅबेरी फळाचे फायदे | Benefits of Strawberries

स्ट्राॅबेरी फळाचे फायदे | Benefits of Strawberries

Strawberries – स्ट्राॅबेरी हे फळ लहान मुलांना खुप प्रीय आहे. त्याची चव त्याचा रंग मुलांना आकर्षीत करतो इतर फळं खायचा मुलं कंटाळा करतील पण स्ट्राॅबेरी मुलांचा जीव की प्राण आहे. अश्या या फळात खुप गुणधर्म आणि शरीराकरता मुबलक प्रमाणात पोषकतत्वं देखील समाविष्ट आहेत.

स्ट्राॅबेरी फळ यातील सुगंध, गडद लाल रंग, रसयुक्त आणि त्याच्या गोडीकरता प्रसिध्द आहे. याचा विषेशतः उपयोग फळांचा ज्युस, आईसक्रीम, मिल्कशेक, चाॅकलेट बनवण्याकरता आणि थेट खाण्याकरता देखील केला जातो. मानवनिर्मीत स्ट्राॅबेरी फ्लेवर आणि सुगंधाचा उपयोग ब-याचश्या उत्पादनात उदा. लिपगार्ड, हॅण्ड सॅनिटायजर, आणि परफ्युम बनवण्याकरता केला जातो.

Benefits of Strawberries
Benefits of Strawberries

स्ट्राॅबेरी फळाचे फायदे – Benefits of Strawberries

1750 मधे स्ट्राॅबेरी फ्रांस इथं ब्रिटनीत एका जातीच्या रूपात सापडली होती. सुरूवातीला लोक याचे सेवन जास्त करत नव्हते या कारणाने याचे उत्पादन देखील कमी प्रमाणात घेतले जात होते त्यानंतर मात्र व्यावहारीक दृष्टीकोनाला लक्षात घेउन याचे उत्पादन सुरू झाले. आज स्ट्राॅबेरी पेक्षा चांगले काही नाही त्याची चव, गोड स्वाद, आणि रसयुक्त बनावटीने तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. त्याची चव चाखण्याआधी त्याचे लाल गोंडस रूप बघुनच तुम्ही आकर्षीत व्हाल.

गुलाबी रंगाने व्यापलेले स्ट्राॅबेरी एकमेव असे फळ आहे ज्याचे बी आत नसुन बाहेर असते. त्याचे आकर्षक रूप मनमोहक ठेवण आणि रसस्वादच त्याला इतर फळांपासुन वेगळे आणि प्रसिध्द बनवते.

या फळाचा जर तुम्हाला संपुर्ण आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला थेट याचे सेवन करावे लागेल याचा उपयोग तुम्ही आईसक्रीम, जेली, सिरप, चाॅकलेट आदी पदार्थांमधे देखील करू शकता.

स्ट्राॅबेरी ताजी असो किंवा स्टोअर केलेली यात नेहमी आकर्षक स्वास्थ्यलाभदायक गुण असतातच जे निश्चित तुम्हाला अचंबीत करतील.

स्ट्राॅबेरी व्हिटामीन सी आणि के सोबतच फाॅलीक अॅसीड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप स्ट्राॅबेरीत 49 कॅलरीज असतात यात साखरेचे प्रमाण देखील कमी असते आणि डाइटरी फायबर चा उत्तम स्त्रोत म्हणुन देखील स्ट्राॅबेरीला पाहीलं जातं शिवाय स्ट्राॅबेरीत फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइड चे प्रमाण चांगले आढळते.

संपुर्ण देशभरात स्ट्राॅबेरीच्या जवळ जवळ 600 पेक्षा जास्त प्रजाती आहेत तसच सर्वाधिक अॅंटीआॅक्सीडंट असलेल्या फळात याचा समावेश होतो.

  • स्वस्थ पाचनक्रिया आणि शरीरातील जमा चरबी कमी करण्याकरता

स्ट्राॅबेरीत फायबर मोठया प्रमाणात आढळतं म्हणुन स्ट्राॅबेरी आपल्या आतडयांना स्वस्थ ठेवते, एंथोसायनिन हे लाल रंगाचे अॅंटीआॅक्सीडंट देखील स्ट्राॅबेरीत सापडतं यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते या सर्वोत्तम फळात नाईट्रेट देखील आहे जे शरीरात आॅक्सीजनचे प्रमाण वाढवते शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीला विकसीत करतं ज्याने शरीराला आलेला स्थुलपणा सहज कमी होतो.

  • हाडांच्या स्वास्थ्याला विकसीत करतं

स्ट्राॅबेरीत पोटॅशियम मॅग्नीशियम आणि व्हिटामीन के सापडतं ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडांची ताकत वाढते जे आपल्या आरोग्याकरता खुप आवश्यक आहे.

  • एसोफागेल कर्करोगापासुन वाचवतो

एका शोधानुसार असे समजते की सहा महिन्यांपर्यंत कोरडया स्ट्राॅबेरी पावडर मधे पाणी मिसळुन पिल्यास कॅंसर चे 80% सेल्स कमी होतात आणि यात एसोफागेल कॅंसर थांबवण्याची क्षमता आहे.

  • ह्नदयासंबधीचे आजार कमी होतात.

यात आढळुन येणारे फ्लोवोनाईड आपल्या शरीरातील ह्नदयासंबधीच्या विकारांना कमी करतं त्यासोबतच स्क्स् कोलेस्ट्राॅल चे प्रमाण कमी करून हायपरटेंशन ची समस्या देखील कमी होते. अभ्यासाअंती हे देखील समजले जी माणसं रोज 2 ते 3 स्ट्राॅबेरी खातात त्यांच्यात ह्नदयविकाराचे प्रमाण 32% पर्यंत कमी होते.

  • संधीवात आणि गाउट मधे उपयोगी

अॅंटीआॅक्सीडंट मुबलक प्रमाणात असल्याने स्ट्राॅबेरीमुळे संधीवात आणि गाउट या आजारांपासुन मुक्ती मिळु शकते. या फळात ते सगळे कंपाउंड मिळतात जे आपल्या शरीरातील वेदनांना कमी करून रॅडीकल्स मुळे होणा-या समस्यांना कमी करतं. संशोधनाअंती हे समजले की महीलांनी एका आठवडयात जर 16 किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्राॅबेरी सेवन केल्यास त्यांना शरीरात सुज असल्यास पुर्ण आराम मिळु शकतो. तसच शरीरात आढळुन येणा-या ब्त्च् च्या प्रमाणाला सुध्दा 14% पर्यंत कमी करत ( CRP यामुळे शरीरातील सुज वाढलेली दिसते )

  • फाॅलीक अॅसीडने भरलेले फळ

स्ट्राॅबेरी हे फळ तुमच्या शरीराला फोलेट ने भरतं जे खादयपदार्थांमधे आढळुन येणा-या फाॅलीक अॅसीड चा महत्वपुर्ण भाग आहे. व्हिटामीन B चे प्रमाण शरीरात हवे तेवढे नसेल तर आपल्याला संवहनी रोग, अॅथेरोस्कलेरोसिस आणि पचनतंत्रात गडबड सारखे आजार होवु शकतात.

  • आपल्या शरीरातील सुरक्षाप्रणाली विकसीत होते

स्ट्राॅबेरीत मोठया प्रमाणात व्हिटामीन सी ( आपल्याला रोज आवश्यक 113% ) आढळतं जे शरीराला आवश्यक असणा-या प्रमाणापेक्षा थोडे जास्त आहे आणि ते असल्याने त्याचे दुसरे फायदे देखील आपल्याला मिळतात. तणावपुर्ण स्थितीत जेव्हा शरीर व्हीटामीन सी चा उपयोग करतं तेव्हा यात रक्तदाबाला कमी करून सामान्य पातळीवर आणण्याची क्षमता असते ज्यामुळे हाइपरटेंशन ची समस्या सुध्दा कमी होते.

  • मेंदुच्या कार्याला गतीमान करतं.

एजिंग आणि मानवी शरीरातील ब-याचश्या समस्यांकरता आपण मुक्त रॅडिकल्सला दोष देतो खरतर या समस्या मेंदुतील टिश्यु च्या कमतरतेमुळे आणि न्युरोट्रांसमीटर च्या कमजोर होण्यामुळे होतात. स्ट्राॅबेरीत आढळुन येणा-या व्हिटामीन सी आणि फायटोन्युट्रियंट मुळे या समस्येला आळा बसतो. लोडीन नावाचे आणखीन एक न्युट्रियंट स्ट्राॅबेरीत विपुल प्रमाणात सापडतं जे मेंदुच्या कार्याला विकसीत करण्यात सहाय्यक आहे. एंथोसायनिन मधे शाॅर्ट टर्म मेमरी लाॅस ला विकसीत करण्याची क्षमता असते.

  • रिंकल एलिमिनेटर

बायोटिन सोबत चांगल्या केसांकरता आणि नखांकरता आवश्यक जे तत्व असतात ते स्ट्राॅबेरीत आढळतात ज्यात अॅंटीआॅक्सीडंट एल्लागिक अॅसिड सापडतं जे आपल्या शरीरातील फायबर ची रक्षा करतं आणि आपल्या त्वचेला तरूण ठेवतं.

  • उच्चरक्तदाबात उपयोगी

पोटॅशियम, वसोडीलेटर, आणि मॅग्नेशियम प्रभावी रूपात उच्चरक्तदाबाच्या समस्येला दुर करतात आणि हे स्ट्राॅबेरीत आढळतात. रोज स्ट्राॅबेरी सेवन केल्यास केवळ हाइपरटेंशनच नाही तर शरीरातील रक्तप्रवाहाला वाढवुन स्वस्थ आॅक्सीजनचा संचार शरीरात वाढवतं ज्यामुळे उच्चरक्तदाबाला नियंत्रीत केल्या जातं.

स्ट्राॅबेरीत जर इतके सगळे गुण आहेत तर मग वाट कसली बघताय ! आजपासुनच स्ट्राॅबेरी खायला सुरूवात करा आणि निरोगी आणि स्वस्थ जीवन जगा . . . .

Read More:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Strawberries चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा स्ट्राॅबेरी फळाचे स्वास्थ्यवर्धक फायदे – Benefits of Strawberries Fruit तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट: Benefits of Strawberries- स्ट्राॅबेरी चे फायदे  या लेखात दिलेल्या स्ट्राॅबेरीच्या फायद्यांन  -Benefits of Strawberries बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया

Check Also

Eye care tips in Marathi

डोळे सुंदर ठेवण्याकरता काही उपाय – Eye care tips in Marathi

Eye care tips in Marathi तेरी आखो के सिवा दुनीयामे रख्खा क्या है? खरतर ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *