बेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe

Besan Sev – बेसनाची शेव भारतात सर्वत्र खाल्ल्या जाते. शेव विविध आकार आणि चवीची बनविल्या जाते. काही बारीक असतात तर काही जाड, काही मुख्य पदार्थ मिळवुन त्याची ही शेव बनविल्या जाते.

पाहुया, मध्यम आकाराची मसालेदार शेव कशी बनवायची

बेसन शेव बनवायची विधी – Besan Sev Recipe

Besan Sev Recipe

Ingredients of Besan Sev
बेसन शेव साठी लागणारी सामग्री:

  • बेसन – 200 ग्रॅम
  • काळे मिरे पुड – अर्धा चमचा
  • मिरची पावडर – 1 चमचा
  • जिरे पुड – अर्धा चमचा
  • लवंग – 4 ते 5 कुटून
  • हिंग – चिमुटभर
  • मिठ – गरजेनुसार
  • तळायकरता तेल

Besan Sev Recipe
बेसन शेव बनविण्याचा विधी:

सर्वप्रथम एका मोठया भांडयात बेसन, तिखट, जिरे पुड, काळे मिरे पुड, तेल, कुटलेली लवंग, हिंग, मिठ, आणि 2 चमचे तेल टाकावे व पाणी घालुन चांगले घट्ट मिश्रण बनवावे. गरजेनुसार पाणी टाकत राहावे.

आता खोल कढईत तेल घेउन गरम होवु द्या, तोपर्यंत शेव बनविण्याचा साचा घेउन त्यात बेसनाचे सारण भरून कढईत शेव दाबुन काढुन घ्यावे, 1 – 2 मिनीटे तसेच ठेवावे व नंतर त्यास हलवत राहावे. त्यास भुरकट रंग आल्यास काढुन घ्यावे. अशाप्रकारे संपुर्ण कणकेची शेव बनवुन घ्यावी.

शेव कशाही सोबत चांगली लागते. आपल्या आवडीप्रमाणे खायला घ्यावी.

लक्ष्य दया: Besan Sev Recipe in Marathi – बेसन शेव बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here