भस्त्रिका प्राणायाम | Bhastrika Pranayama in Marathi

जीवनातील व्यवस्थेत आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे बंद करतो. आपण जर आपल्या दिनचर्येवर लक्ष दिले तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. इंटरनेट जगात आल्याने आपले मन शांत आणि स्थिर राहू शकत नाही. आपले शरीर व मश्तीश्क यांच्या चमकदार कामगिरीसाठी शरीरास वेळ देणे फार गरजेचे ठरते. बाबा रामदेव यांच्या योगासनामध्ये विभिन्न योग मुद्रांचा व त्यांच्या फायद्यांचा विचार कराल तर उत्तर मिळेल कि यापासून असंख्य फायदे आपल्या शरीरास मिळतात त्यापैकी भस्त्रिका प्राणायाम / Bhastrika Pranayama एक असा प्राणायाम आहे ज्यामुळे शरीर आणि मश्तीश्क यांच्यात ताजेपणा येतो.

Bhastrika Pranayama

भस्त्रिका प्राणायाम – Bhastrika Pranayama in Marathi

योग आणि ध्यानसाधनेने आपले मन आणि शरीर शांत ठेवण्यास मदत मिळते. विभिन्न प्राणायामामुळे शारीरिक क्षमतांचा विकास होते. शरीरात जमा उर्जा कार्यान्वित होते. योग प्राणायाम भारतीयांचाच शोध आहे. याबाबत संशोधनातून अनेक प्रकार समोर आले आहेत. जसे कि पावर योगा आणि विक्रम योगा प्राणायाम हे श्वासाशी संबंधित योग आहे. जे आपल्या श्वसनप्रणालीस उत्तम ठेवून शरीरातील अशुद्ध हवा योग्य गतीने शरीराबाहेर टाकतो.

भस्त्रिका प्राणायाम कसे करावे

पद्मासनात बसून मान व शरीर सरळ ताठ ठेवून तोंड बंद ठेवावे. नंतर जलदगतीने श्वास अंदर बाहेर टाकत पोट संकुचींत करून त्याचा संकुचित भाग वाढवत जावा. असे करताना नाकातून “भूस भूस” असा आवाज येणार याच्या अभ्यासासाठी श्वास अंदर बाहेर सोडतांना चांगल्या गतीने सोडावे व ग्रहण करावे.पहिल्यांदा १० वेळा करून पाहावे हळू हळू याचे प्रमाण वाढवावे. भस्त्रिका प्राणायामचे पहिले चरण पूर्ण होते.

आता श्वास शांत करा व ध्यानस्थ व्हा काही वेळ ध्यानस्थ बसून झाल्यावर पुन्हा हीच प्रक्रिया करावी.

भस्त्रिका प्राणायाम सकाळ व संध्याकाळीही करता येते.

भस्त्रिका प्राणायामाचे लाभ

१.गळ्यातील खरखर कमी होईल

२.पोटातील जळजळ कमी होते.

3.नाक आणि छातीच्या संबधित आजारांवर परिणाम होवून त्या पूर्णपणे कमी होऊ शकतात.

४.एपेटाइट यामुळे दुरुस्त होतो.

५.ट्युमर यामुळे बऱ्यापैकी बरा होऊ शकतो.

६.यामुळे कुंडलिनी जागृत होते.

७.श्वासासंबंधी आजारांमध्ये कमी येते.

८.शरीर संतुलित गरम राहते.

९.शरीरातील नाड्या शुद्ध होतात.

१०.शरीरात ऑक्सिजन चांगल्या मात्रेत शरीरात पोहोचतो.

११.या प्राणायामामुळे वात,पित्त, आणि कफ संतुलित होऊन ते कायमचे नाहीसे होतात. त्यामुळे रक्तशुद्ध राहते.

१२.मनातील शांतता वाढते.

या प्राणायामामुळे आपल्याला कोणत्याही आजारापासून मुक्तता मिळू शकते. यामुळे शरीर स्वस्थ राहते. श्वासांना २० वेळा आतबाहेर केल्याने चांगला लाभ होते. त्याकरिता उजव्या नाकपुडीला बंद करून डाव्यांनी १० वेळा श्वास आतबाहेर करावा. नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने १० वेळा श्वास घ्यावा.
जर सर्दी खोकला असेल तर त्यामुळे नाकपुड्या बंद असतील तरच हि क्रिया दोन्ही बाजूनी नियमित. प्राणायामात गडबड आणि घाई करू नये. दोन्ही नासिका मधून १०-१० वेळा श्वास आत बाहेर करून आरामात प्राणायामाची सांगता करावी.

भस्त्रिका करताना जेव्हा आपण श्वास आत बाहेर करताना आपले अवचेतन शुद्ध व ध्यानस्त असावे. कोणतेही दुर्विचार मनात येवू देवू नका तरच याचा लाभ पूर्णपणे आपल्याला मिळेल. यामध्ये मनात शांतता व ध्यानमग्नता जरुरी बाब मानली जाते.

असे समजू नका कि फक्त श्वास आत बाहेर केल्याने या प्राणायामाचे लाभ तुम्हाला मिळतील.

या प्राणायामाच्या वेळी आपले डोळे बंद ठेवा आणि “ओमं” मंत्राचा जप करावे.

घ्यायची काळजी

१. हा प्राणायाम हाय बी.पी.रोग्यांनी करू नये.
२. गर्भवती स्त्रीने हा प्राणायाम करू नये.
३. या प्राणायामाचा आरंभ हळूहळू करावे.
शरीराला प्राणायामाची सवय पडू द्या. त्यासाठी चांगला वेळ द्या.

हे पण नक्की वाचा :-

बाह्य प्राणायाम

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Bhastrika Pranayama चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा भस्त्रिका प्राणायाम / Bhastrika Pranayama in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Bhastrika Pranayama in Marathi – बाह्य प्राणायाम  या लेखात दिलेल्या भस्त्रिका प्राणायामच्या फायद्यांन  – Bhastrika Pranayama बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here