Boondi Raita
भारतीयांची खवय्येगिरी जगभरात प्रसिध्द आहे. वेगवेगळे पदार्थ बनवुन चव चाखण्यात आणि आल्यागेल्यांची सरबराई करण्यात भारतीयांना आनंद मिळतो. इतकच काय तर विदेशी नागरीकांना देखील या भारतीय पदार्थांनी भुरळ घातली आहे. हे पदार्थ फक्त चवीलाच चांगले असतात असे नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ते कसे पोषक राहातील याबाबत भारतिय नागरिक जागरूक असतात.
रायत्याचं नाव ऐकुन तोंडाला पाणी आल्याशिवाय राहात नाही आणि त्यातल्या त्यात जर तो बुंदीचा रायता असेल तर मग विचारायलाच नको लगेच खायला मिळाला तर के सांगायच असे होउन जाते पण ब-याचश्या मित्रांना बुंदीचा रायता घरी कसा बनवायचा हे ठाउक नाही त्यामुळे त्यांची ईच्छा मनातल्या मनात विरून जाते. पण आता काळजी करण्याची गरज नाही ज्यांना बुंदीचा रायता कसा बनवायचा हे ठाउक नाही त्यांच्या करता आम्ही या पदार्थाची रेसिपी घेउन आलो आहोत.
(राजस्थानी रेसिपी) बुंदी रायता – Boondi Raita Recipe in Marathi
Ingredients of Boondi Raita
बुंदी रायता साठी लागणारी सामग्री:
बुंदी बनविण्याकरिता:
- 3 टेबलस्पुन बेसन
- अर्धा चमचा लाल तिखट
- मीठ चवीनुसार
- तळण्याकरता तेल
रायता बनवण्याकरता:
- 1 कप घट्ठ दही
- अर्धा कप पाणी
- थोडी कोथिंबीर बारीक कापलेली
- 1 चमचा साखर
Boondi Raita Recipe
बुंदी रायता बनविण्याचा विधी:
एका बाउलमधे बेसन आणि पाणी घेउन घट्ठ घोळ बनवायचा एका पॅनमधे तेल गरम करा, झा-यावर बेसनाचे मिश्रण टाका त्यामुळे थेंब थेंब गरम तेलात पडेल सोनेरी रंगाचे तळुन झाल्यावर टिश्यु पेपर वर बुंदी काढुन घ्या. आता त्यावर मीठ आणि लाल तिखट भुरभुरा, थंड होउ द्या. दहयात पाणी, साखर, आणि मीठ मिसळुन घ्या यात बुंदी टाका आणि कोथिंबीर टाकुन सव्र्ह करा.
अश्या प्रकारे बुंदीचा रायता तयार करा. लहानांपासुन मोठयांपर्यंत ही रेसिपी सर्वांना आवडेल हे नक्की.
लक्ष्य दया: Boondi Raita – बुंदी रायता रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्