Vyavsay Margdarshan
आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा नोकरी च्या मागे धावत आहे. पण कधी विचार केला का?
कि, सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकते का? तर उत्तर येईल नाही!
कारण देशाची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढत आहे कि प्रत्येकाला नोकरी देणे शक्यच नाही.
मग आपल्याला विचार पडला असेल मग करायचे तरी काय? आवश्यक नाही प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे. आपल्यात असलेल्या कला गुणांना वाव देऊन आपण आपली एक विशिष्ट छाप या सामाजावर टाकू शकतो आणि त्यामुळे आपण आपल्या स्वयंविकासाकडे सुद्धा वळू शकतो.
स्वयंविकास म्हणजे काय नेमक?
आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांवर, भर देऊन केली गेलेली प्रगती म्हणजे स्वयंविकास होय.
जीवन जगत असताना जीवनाच्या प्रत्येक पायरीवर माणूस हा स्वतःच्या स्वयंविकासात भर टाकत असतो. कारण माणसाचे जीवन हे एक प्रकारचे विद्यापीठच आहे ज्यामध्ये माणसाला अनुभवाच्या रुपात शिक्षण मिळत राहत. आणि माणूस हा मरेपर्यंत एक विध्यार्थी म्हणूनच जगत असतो.
त्याच प्रमाणे व्यवसायामध्ये सुद्धा माणसाला बरेच काही शिकायला मिळते. कारण व्यवसाय करताना बऱ्याचशा परिस्थितींना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये अनेक चढ-उतार येतात. आपण जर नवीन व्यवसाय सुरु करायचा विचार करत असाल किंवा केला असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
कारण या लेखामध्ये आपण पाहणार आहोत नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.
तर चला जाणून घेऊया त्या गोष्टी ज्या एक उत्तम व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहेत.
नवीन व्यवसाय सुरु करताय? मग वाचा ह्या ८ महत्वाच्या टिप्स! – Business Tips in Marathi
१) वेगळी कल्पना –
कोणताही व्यवसाय एका वेगळ्या कल्पनेशिवाय उभा राहूच शकत नाही. कारण बाजारात तुमच्या अगोदर बरेचशा लोकांनी व्यवसाय सुरु केलेला असतो. त्या बाजारात टिकण्यासाठी तुम्हाला एका वेगळ्या कल्पेनेची गरज असेल म्हणून कोणताही व्यवसाय सुरु करण्याच्या अगोदर एक वेगळी कल्पना घेऊन बाजारात व्यवसाय करायला उतरा जेणेकरून तुमचा व्यवसाय प्रगती पथावर लवकर पोहचेल.
२) भांडवल –
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल. भांडवल म्हणजे अर्थ, आणि अर्थ म्हणजे पैसा. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे. तुम्हाला व्यवसायासाठी लागणारे भांडवल बँकहि देऊ शकते.
तसेच भारत सरकारने त्यासाठी “प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे” आयोजन केलेले आहे जेणेकरून नवीन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना भांडवल दिल्या जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या बँकेला भेट द्या आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभे करा.
३) सकारात्मक दृष्टीकोन –
कोणत्याही गोष्टीला सकारात्मकतेने पाहणे हा सुद्धा एक गुण आहे.हा गुण प्रत्येक व्यावसायिकात असणे आवश्यक आहे.
त्यामुळेच प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे माणसाला चांगल्या प्रकारे जमत.
व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन असणे खूप गरजेचे आहे, कारण व्यवसायात चढ-उतार होणाऱ्या परिस्थिती नेहमी येतच राहतात.
त्यासाठी आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे.
४) बिझनेस प्लॅन –
कोणताही व्यवसाय हा बिझनेस प्लॅन विना पूर्ण होऊच शकत नाही.
बिझनेस प्लॅन व्यवसायाला एक योग्य दिशा देत असतो त्यामुळे आपला बिझनेस प्लॅन हा प्रभावी असायला हवा. हि गोष्ट लक्षात ठेवा! बिझनेस प्लॅन मुळे आपण आपल्या व्यवसायाची रूपरेषा ठरवत असतो.
जेणेकरून आपल्या व्यवसायाचे पुढील पाऊल काय होऊ शकेल हे ठरवता येते. म्हणून आपला बिझनेस प्लॅन ठरवताना योग्य रीतीने ठरवावा.
५) आवश्यक कागदपत्रे –
व्यवसाय सुरु करतेवेळी त्या व्यवसायाला लागणाऱ्या कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
जेणेकरून भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जायचे काम पडणार नाही.
म्हणून व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपण हि गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. कि आपल्या व्यवसायाच्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे कि नाही.
६) संयम ठेवा –
व्यवसायात सयंमाला खूप महत्व आहे. कोणताही यशस्वी व्यवसाय हा एका दिवसात उभा राहत नसतो.
व्यवसायाचे सुरुवातीचे काही दिवस हे बाळंतपणा सारखे असतात. ज्यामध्ये व्यवसायात आपल्याला बऱ्यापैकी नफा मिळत नाही.
त्यावेळेस नकारात्मक विचार न करता, संयम ठेवून आपल्या व्यवसायात आपले लक्ष लाऊन ठेवा.
एक दिवस तुम्ही स्वतः पहाल कि तुमचा व्यवसाय घोड्याच्या वेगाने बाजारात प्रगती करतो आहे.
७) बिझनेस पार्टनर चांगला निवडा –
व्यवसाय करतेवेळी जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला बिझनेस पार्टनर शोधता तेव्हा तो बिझनेस पार्टनर विश्वासू असायला हवा कारण बरेचदा असे होते कि आपण ज्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो तोच व्यक्ती आपल्या विश्वासाला पात्र ठरत नाही.
म्हणून व्यवसायात आपला बिझनेस पार्टनर निवडताना सांभाळून निवडा.
८) प्रतिस्पर्धा जाणून घ्या –
व्यवसाय म्हटलं म्हणजे प्रतिस्पर्धा तर येणारच! प्रतिस्पर्धा नसेल तर प्रगती होणारच नाही,
हा सृष्टीचा नियमच आहे! आपण पूर्वीच्या काळापासून पाहत आहोत. कि,
अश्मयुगापासून माणूस हा प्रतिस्पर्धाच करत आहे. त्यामुळेच माणसाची एवढी प्रगती होऊ शकली आहे. तसेच व्यवसायात सुद्धा प्रतिस्पर्धा आवश्यक आहे. तुम्हाला सांगायचे एवढेच कि प्रतिस्पर्धा हि वाईट गोष्ट नाही आहे. म्हणून न घाबरता आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्या!
थोडे दिवस व्यवसाय तग धरेल परंतु थोडे दिवस संयमहि ठेवा काही दिवसांनी आपल्याला दिसून येईल कि आपण एका चांगल्या व्यवसायाचे मालक झालेले आहोत.
आशा करतो कि या लेखामुळे आपल्याला व्यवसाय करतांना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे कळले असेलच.
जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका. सोबतच या लेखावर आपला अभिप्राय द्यायला सुद्धा विसरू नका.
THANK YOU!