Cancer Symptoms
आपलं आरोग्य हे सर्वात मोठ आपल्याला मिळालेलं धन आहे. खरतर असं म्हणतात की पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार आणि तिसरीचा प्रकार आहे तो धनमानाचा. आपलं आरोग्य चांगल असेल तर कुठल्याही गोष्टीचा निर्भेळ आनंद आपल्याला घेता येतो. त्यामुळे पैशाच्या मागे धावत असतांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण उदया पैसा हातात येईल पण त्याच्या पाठीमागे धावता धावता आपण आपलं आरोग्य गमावलेले असेल. तेव्हा वेळीच सावध व्हा . . . .
कॅंसर जगातला सगळयात वेगवान आणि वाढत जाणारा रोग मानल्या जातो. भारतात साडे तीन लाख लोक दरवर्षी या आजाराचे बळी ठरतात. तुम्हाला तुमची जोखीम कमी करण्याकरता काय करायला हवं?
हि लक्षणं दिसल्यास तो कॅंसर असू शकतो? – Cancer Symptoms

एका सर्वेमध्ये हे स्पष्ट झाले की भारतात कॅंसर चे सर्वात जास्त रूग्ण आहेत. कॅंसर च्या एकुण रूग्णांमध्ये काही लिप, ओरल, कॅविटी, कोलोरेक्टम, सर्विक उटेरी, प्रोस्टेट आणि लंग कॅंसर चे रूग्ण देखील आपल्याला आढळुन येतात.
कॅंसर ला समजुन घेण्याचे काही सोपे उपाय आहेत. जर अचानक तुम्हाला रक्ताच्या शिंका येत आहेत, कफ मध्ये रक्त येत आहे, अचानक वजन कमी होत आहे, तर लगेच डाॅक्टर कडे जाउन आपली तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. अशी लक्षण जर तुमच्यात आढळली तर तुम्हाला कॅंसर असु शकतो. पुढे कॅंसरची आणखीन काही लक्षणं सांगितली आहेत.
कर्करोग प्रतिबंध – Cancer Prevention
- दिवसातुन कमीत कमी 30 मिनीटे शारीरीक श्रम करा.
- साखरेपासुन बनलेले पेय आणि जास्त कॅलरीज चे फुड खाणे बंद करा.
- सगळया प्रकारच्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. फळं खा
- मासांहार टाळा.
- जर तुम्ही दारू सेवन करत असाल तर त्याची सिमा निर्धारीत करा.
- मीठाचे जास्त सेवन टाळा
- आईने कमीत कमी सुरूवातीच्या सहा महिन्यात नियमीत बालकांना स्तनपान करायला हवे.
- तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळा. जखम झाल्यास त्यावर योग्य उपचार करा.
शरीरातील कोशीकांची अनियंत्रीत वाढ कॅंसर आहे. जेव्हां या कोशिका टिश्यु ला प्रभावीत करतात तेव्हां कॅंसर शरीरातील अन्य भागात पसरतो. कॅंसर कुणालाही आणि कोणत्याही वयात होवु शकतो पण जर त्याचे निदान योग्य वेळी झाले नाही आणि त्यावर उपचार शक्य नसतील तर मृत्युचा धोका वाढतो.
कॅंसर चे प्रकार – Types of Cancer
कॅंसर चे अनेक प्रकार आहेत किंवा आपण असेही म्हणु शकतो 100 प्रकारचे कॅंसर आहेत. उदा. Breast Cancer, सर्वाइकल कैंसर / Cervical Cancer, ब्रेन कैंसर / Brain Cancer, बोन कैंसर / Bone Cancer, ब्लैडर कैंसर / Bladder Cancer, पेंक्रियाटिक कैंसर / Pancreatic Cancer, प्रोस्टेट कैंसर/ Prostate Cancer, गर्भाशय कैंसर / Cervical Cancer, किडनी कैंसर / Kidney Cancer, लंग कैंसर / Lung Cancer, त्वचा कैंसर / Skin Cancer, स्टमक कैंसर / Stomach Cancer, थायरॉड कैंसर / Thyroid Cancer, मुंह का कैंसर / Mouth Cancer, गले का कैंसर / Throat Cancer इत्यादी.
प्राचीन काळी कॅंसर ला जगातील सगळयात भयानक रोग म्हणुन ओळखण्यात येत होतं. पण आजच्या वैज्ञानिक युगात कॅंसर चा इलाज शक्य आहे. फक्त याकरता आपल्याला काही काळजी घेणं आवश्यक आहे.
आपली दिनचर्या आपले खानपान आपला व्यायाम यावर जर दिवसातला थोडा वेळ आपण दिला तर आयुष्यभर निरोगी जिवन जगणं शक्य आहे.
लक्ष्य दया: Cancer Symptoms तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Very nice