मित्रहो दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव होय. दिवाळीत सर्वांच्याच घरी अनेक प्रकारच्या गोड आणि विविध प्रकारचे पक्वान्न बनविले जातात आम्ही आज येथे आपणास दिवाळीत बनविल्या जाणाऱ्या “चकली” – Chakli या पक्वान्नास बनविण्याची विधी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची दिवाळी खास होईल. दिवाळीत चकल्या बनवून आपण पाहुण्यांना त्याचा स्वाद चाखू शकता.
चकली बनविण्याची विधी – Chakli Recipe In Marathi
चकली हि भारतीय अल्पाहार मानला जातो. साधारणतः चकली तांदूळ, चण्याची डाळ आणि उळद यांच्या मिश्रणाच्या आटयापासून बनविल्या जातात याच्यात डाळीत विभिन्नता असू शकते.
भारतात इतरही डाळीचा वापर याच्यात करतात. दक्षिण भारतात यास “मुरुक्कू” म्हटले जाते.
Ingredients of Chakli
चकलीसाठी लागणारी सामग्री :-
१) १ कप तांदळाच पीठ
२) १ कप चना व उळद डाळीच पीठ
३) १ कप पाणी
४) १/२ कप बटर
५) स्वादानुसार मीठ, जिरे
६) १/२ चमचा मिरची पावडर व हळदी १/२ चमचा
७) तळायला तेल
Chakli Recipe
चकली बनविण्याचा विधी:-
एका मोठ्या भांड्यात दिलेले सर्व पीठ एकत्र मिळवून त्यात मीठ, मिरची पावडर, हळद, जिरे, आणि बटर टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या त्यात १ कप पाणी टाकून घट्ट पीठ मळून कणिक तयार करून घ्या. त्यास सुमारे २० मिनिटे थंड कपड्यात गुंडाळून ठेवा.
यानंतर चकलीच्या माशिनीत तेल लावून कणकेचे गोळे भरून कच्च्या चकल्या बनवून घ्या. गॅसवर तेल चांगले गरम होईपर्यंत ठेवा. गरम झाल्यावर त्यात कच्च्या चकल्या सोडा. चांगल्याप्रकारे तळून घ्या.
चकली बनविताना चकली मशिनीतून बाहेर गोलाकार आकारातच बनेल याची काळजी घ्या.
नंतर चकल्या प्लास्टिक पेपरवर ठेवून थोडावेळ मगच तळायला घ्याव्यात. तळ्ल्यानंतर यास पेपर टॉवेलवर ठेवून त्याचे तेल सुकू द्या. थंड झाल्यावर त्या बंद डब्यात ठेवा ज्यामुळे त्या खराब होणार नाही.
टिप्स –
१. मंद अग्नीवर चकलीस तळू नये यामुळे चकलीत खूप तेल भरेल.
२. तांदळाच्या आट्यात चिकटपणा नसतो. त्यामुळे तळताना चकली तुटण्याची भीती असते त्यामुळे याची काळजी घ्यावि की आरामाने चकल्याना पलटून घ्यावे.
3. तयार कणिक चाखून बघा त्यात मिठाचे प्रमाण जास्त किंवा कमी याची तपासणी करून चवीनुसार मीठ घाला किंवा जास्त मीठ असल्यास त्यात तांदळाचे पीठ घाला.
४. आपणास जर जास्त काळ टिकणाऱ्या कुरकुरीत चकल्या हव्या असतील तर त्यांना लालसर होऊ देईपर्यंत तळा. जर चकली कमी लालसर रंगाची झाल्यास ती कमी कुरकुरित व जास्त नरम होईल. जास्त गर्द रंग झाल्यास याच्या चवीत फरक पडेल.
लक्ष्य दया :- चकली – Chakli रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Khup chan i love you