घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी चिकन बिरयानी

Chicken Biryani

खवय्येगिरी करता आपला भारत फार प्रसिध्द आहे वेगवेगळया प्रांतातील पक्वान्न बनवुन त्यावर ताव मारणे हे आपल्या लोकांना फार आवडते. चवीने खाणार त्याला देव देणार अशी म्हण उगीच पडली नाही त्यामुळे चवीने खाणा-यांकरता पदार्थांची काही कमी नाही आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही मांसाहारी असाल तर मग विचारायलाच नको! इतक्या पदार्थांची मेजवानी तुमच्याकरता हाजीर आहे की बघुन तुम्ही स्वतःला खाण्यापासुन थांबवुच शकणार नाही.

Chicken Biryani – चिकन बिरयानी एक प्राचीन भारतीय डिश आहे जीला लग्न समारंभात नक्की समाविष्ट केल्या जाते. तसं पाहता घरी नेहमीच वेगवेगळया निमीत्तानी चिकन बिरयानी बनवली जाते. बहुतेकदा रात्रीच्या जेवणात चिकन बिरयानीचा समावेश केला जातो. चिकन बिरयानी बनविण्याची एक मोठी प्रक्रिया आहे पण जर तुम्ही बनविण्याआधी ही प्रक्रिया व्यवस्थित समजुन घेतली तर अगदी सहज तुम्ही याला घरी बनवु शकाल.

घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी चिकन बिरयानी – Chicken Biryani Recipe

Chicken Biryani
Chicken Biryani

Ingredients of Chicken Biryani
चिकन बिरयानीसाठी लागणारी सामग्री:

  • 1 कप तेल / तुप
  • एक मोठे चिकन ( साधारण 1200 ग्रॅम ) छोटया तुकडयांमधे
  • 750 ग्रॅम बासमती तांदुळ, अध्र्या तासापर्यंत पाण्यात भिजवलेले
  • 1 ते 2 तेजपान
  • 4 कांदे कापुन ठेवलेले
  • 2 कप दही
  • हिरव्या मिरच्या 2 बारीक कापलेल्या
  • 2 चमचे आलं लसणाची पेस्ट
  • 5 ते 6 छोटे टोमॅटो बारीक कापलेले
  • 4 लवंगा
  • 2 इंच दालचीनी ची काडी
  • 4 इलायची
  • अर्धा चमचा शाही जीरे
  • 2 चमचे लाल तिखट पावडर
  • पुदीना
  • 2 चमचे धणे पावडर
  • चवीनुसार मीठ
  • कोथींबीरीची जुडी

Chicken Biryani Recipe
चिकन बिरयानी बनविण्याचा विधी:

एका मोठया भांडयात तेल किंवा तुप गरम करा आणि त्यात तेजपान, लवंग, दालचीनी, इलायची, शाही जीरे आणि लाल तिखट टाकुन 25 ते 30 सेकंद तळुन घ्या.

आता कांदा टाकुन सोनेरी रंग येईपर्यंत तळुन घ्या.

यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाकुन 30 सेकंद पर्यंत मिश्रण हलवा नंतर लाल तिखट, धणे पावडर, मीठ, टोमॅटो, चिकन आणि दही टाका आता चिकन शिजेपर्यंत तेल भांडयाच्या किना-यावर येईपर्यंत शिजवुन घ्या.

आता त्यात लिंबाचा रस, कोथींबीर आणि पुदीना टाका यानंतर गॅस बंद करून भांडयाला बाजुला ठेवा आता आपण पुलाव बनवुन घेउ.

एका मोठया भांडयात पुलाव शिजवण्याकरता पुरेसे पाणी घेउन गरम करून घ्या नंतर त्यात तांदुळ मीठ आणि 1 चमचा तेल टाकुन दया तेल तांदळाच्या दाण्याला वेगवेगळे ठेवण्यास सहाय्यक ठरतं तुम्ही तांदुळ शेवटी देखील टाकु शकता.

How to make Chicken Biryani

आता जवळजवळ 70% तांदुळ शिजवुन घ्या ( ही स्टेप खुप आवश्यक आहे अशावेळी एक मिनीटाकरता देखील स्वयंपाकघर सोडुन जाउ नका )
एका भांडयात पुलाव टाका त्याला मिक्स करू नका मिक्स करण्यापुर्वी 1 चमचा तुप पुलाववर टाका.

आता त्याला झाकुन ठेवा वाफ बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. मंद आचेवर कमीत कमी 20 मनीटे गे्रवीला गरम करून घ्या.

सर्व्ह करण्यापुर्वी ग्रेवी आणि पुलावला मिक्स करून घ्या आणि शेवटी गरमागरम बिर्यानीला रायत्यासोबत सर्व्ह करा.

तर अश्याप्रकारे तयार आहे तुमची गरमागरम चिकनबिर्यानी तुम्ही तुमच्या हाताने घरी बनवा आणि सगळयांना पोटभर खाउ घाला मग बघा सगळे कसे तुमचे कौतुक करतात ते!

चिकनबिर्यानी बनवतांना काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या अश्या बिर्यानी बनवतांना तांदुळ जास्त ओले आणि जास्त शिजवलेले नसावेत तांदुळ मउ असतील तर बिर्यानी चांगली बनेल.

बिर्यानी बनवतांना चांगले तांदुळच वापरा.

तांदुळ चांगले शिजवण्याकरता एका भांडयात पाणी गरम करा आणि त्यात तांदुळ टाका. जेव्हां पाणी उकळायला लागेल तेव्हां तांदुळ 10 च मिनीटे शिजवा बाकी सगळे तांदुळाच्या गुणवत्तेवर अवलंबुन आहे. आता तुम्ही तांदुळाला दाबुन पाहिल्यास तो तुम्हाला पुर्ण झालेला किंवा कच्चा लागायला नको तो मध्यावस्थेत असायला हवा.

Read More:

लक्ष्य दया: चिकन बिरयानी / Chicken Biryani रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top