Chicken Korma – चिकन कोरमा एक मुघलई डिश आहे. ही एक शाही डिश समजली जाते. आपण घरीच ही डिश बनवू शकतो चला तर मग माहिती करून घेउया चिकन कोरमा कसे बनवतात?
चिकन कोरमा बनविण्याची विधी – Chicken Korma Recipe In Marathi
Ingredients of Chicken Korma
चिकन कोरमासाठी लागणारी सामग्री:
- चिकन – 400 ग्रॅम (मध्य आकाराचे पिस)
- बदाम – 1 चमचा
- लिंबू रस – 1 चमचा
- काळे मिरेपुड – अर्धा चमचा
- लसुण पेस्ट – 1 मोठा चमचा
- कांदा – 1 मोठा (अगदी बारीक कापून)
- तेल – 2 मोठे चमचे
- हळद – अर्धा चमचा
- दही – 150 ग्रॅम ( घट्ट – जास्त आंबट नको )
- मिरच्या – 2 हिरव्या (बारीक कापुन)
- 4 इलायची ची पूड
- कलमीच्या काडया – 2-3
- तेजपान
- गरम मसाला – अर्धा चमचा
- हिरवी कोथींबीर – 50 ग्रॅम कापुन
- बदाम पावडर – अर्धा चमचा
- मिठ – स्वादानुसार
Chicken Korma Recipe
चिकन कोरमा बनविण्याचा विधी:
चिकन साफ पाण्याने धूवून घ्या, त्यात लिंबुरस, अर्धा चमचा मिठ, काळी मिरपुड, लसन पेस्ट, चांगले मिसळून घ्या. चिकनच्या तुकडयांमध्ये चांगले लागायला हवे. 1 ते 2 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
भांडयात तेल घ्या चांगले गरम झाल्यावर त्यात कापलेला कांदा व हळद घाला. कांदा तांबूस रंगाचा झाल्यानंतर त्यास काढुन घ्या, त्यातील तेल काढुन घ्या. आता मिक्सर मध्ये तळलेला कांदा, दही, बदाम, हिरव्या मिरच्या यांची पेस्ट बनुनु घ्या.
भांडयात तेल घेवून त्यास मध्यम आचेवर ठेवा. त्यात इलायची पावडर कलमी काडया, तेजपान. 1 ते 2 मिनीटे होउ द्या त्यात चिकनचे मिश्रण वरून टाकावे. 1 कप पाणी घालून चांगले होउ द्या. वेळोवेळी बघत राहावे, चिकन जास्त नरम होऊ. चिकन शिजुन झाल्यास त्यावरून गरम मसाला व हिरवी कोथिंबीर टाकावी सोबतच बदाम पुड शिंपडुन खायला द्यावे.
Read More:
लक्ष्य दया: चिकन कोरमा / Chicken Korma रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्