Home / Recipes / छोले भटुरे बनविण्याची विधी | Chole Bhature Recipe in Marathi

छोले भटुरे बनविण्याची विधी | Chole Bhature Recipe in Marathi

भारतात छोले भटुरे – Chole Bhature चना मसाला आणि मैद्यास मिळवून बनविले जाते. हा एक सकाळचा नाश्ता आहे ज्यास पंजाबी लोक लस्सी सोबत खातात यात फार उर्जा मिळते.

यास गाजर, कांदा, हिरवी चटणी, लोणच्या सोबत खाल्ले जाते हि एक मुख्य पंजाबी डिश आहे ज्यास आज संपूर्ण भारतात चवीने खाल्ले जाते.चला तर मग छोले भटुरे बनवू या.

छोले भटुरे बनविण्याची विधी – Chole Bhature Recipe in Marathi

Chole Bhature

Ingredients of Chole Bhature
छोले भटुरेसाठी लागणारी सामग्री :-

१. 250 ग्राम काबुली चने (रात्रभर पाण्यात भिजवलेले)
२. चहापत्ती चे पाणी – 2 चम्मच
३. ½ चमचा जिरे
४. 1 मोठा कांदा कापलेला
५. अद्रक चे काप
६. 4 – 5 लसणाच्या पाकळ्या बारीक किसुन
७. 2 चम्मच छोले मसाला
८. 2 चम्मच लाल तिखट
९. 2 चम्मच आमचूर पावडर (आमसूल)
१०. ½ चम्मच हळद पावडर
११. ½ चम्मच धनिया पावडर
१२. 1 चमचा जिरे पावडर
१३. तेल
१४. स्वादानुसार मीठ
१५. सांभार

भटूरयांसाठी:
1. ½ कप मैदा
2. 2 – 3 मोठे आलू गर काढलेले
3. तेल आवश्यकता नुसार
4. स्वादानुसार मीठ

सलादसाठी:
1. 1 कांदा कापून
2. 1 निंबू कापून
3. 1 टमाटर
4. 1 काकडी

Chole Bhature Recipe
छोले भटुरे बनविण्याचा विधी:-

छोले बनविण्यासाठी:
कुकर मधून काबुली चने आणि चहापत्ती चे पाणी उकडून घ्या. ध्यान ठेवा कि चने जास्त गरम नकोत.

कढईत तेल गरम होऊ द्या त्यात जीर, बारीक चिरलेला कांदा, अदरक लसणाची पेस्ट घाला व 5 मिनिटे कांदा तांबूस होई पर्यंत होऊ द्या त्यात आमसूल, हळद, धने पावडर, जीर पावडर, छोले मसाला, मिरची पावडर व स्वादानुसार मीठ घाला यास सुमारे 5 – 10 मिनिटे आणखी होऊ द्या.

त्यात उकडलेले काबुली चणे घाला सोबतच 1 कप पाणी ही घाला, 5 – 10 उकडी येईपर्यंत होऊ द्या, नंतर गस बंद करा. त्यात हिरवा सांभार कापून घाला.

भटुरे बनवण्याची विधी:

मैदा आणि उकडलेल्या आलूचा गर चांगले मिळवा त्यात 1 चमचा तेल घालून मिश्रण चांगले घट्ट बनवा यात पाणी घालू नका. 5 – 10 मिनिटे यास फ्रीज मध्ये ठेवा. नंतर बाहेर काढून याचे 10 – 15 समान गोळे बनवा.

नंतर त्यांच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या कढई गसवर ठेवा. आणि तेल टाकून. तेल चांगले गरम करून घ्या. त्यानंतर एक एक पुरी चांगली तडून घ्या तर भटुरे तयार होतील.

गरमागरम छोले सोबत गरमागरम भटुरे फारच चवदार लागतात या सोबत कांदा टमाटर, काकडी सोबत सर्व्ह करा.

टिप्स:
1. तेल चांगल्याप्रकारे गरम झाल्यावरच भटुरे तळून घ्या.
2. तळल्यावर टिशूपेपरने भटूऱ्यातील तेल काढता येते.

Check Also

Matar Paneer

मटर पनीर बनवण्याची विधी – Matar Paneer Recipe in Marathi

Matar Paneer Recipe in Marathi मटर पनीर एक उत्तर भारतीय डीश असुन ज्याला हिरवे मटर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *