कोरोनापासून सहकार्यासाठी ह्या हस्ती आल्या समोर, १५०० कोटींची केली मदत

Donation for Coronavirus

देशात कोरोनाचे संकट पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे, एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला ह्या विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन ठेवले आहे, तसेच देशात या निर्णयाचे जनतेकडून स्वागत होत आहे, देशात कोरोनापिडित रुग्णांच्या संख्ये मध्ये वाढ होत असल्याने माननीय मोदींजींनी व्यवस्थापनासाठी जनतेला त्यांनी सांगितले आपल्या कडून होईल तेवढी मदत आपण करू शकता या त्यांच्या ट्वीट नंतर संपूर्ण देशातून प्रधानमंत्री कोशात योगदानाची प्रत्येकाला ओढ लागली आहे.

कोरोनापासून सहकार्यासाठी ह्या हस्ती आल्या समोर, १५०० कोटींची केली मदत – Coronavirus- Ratan Tata donation

Coronavirus- Ratan Tata donation

देशातील नामवंत व्यक्ती यामध्ये आपले योगदान देत आहेत, यामध्ये देशातील उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा ग्रुप कडून ५०० कोटींची मदत देण्याचे जाहीर केले आहे सोबतच १००० कोटींचा अतिरिक्त निधी सुद्धा टाटा ग्रुप्स कडून भारत सरकार ला दिल्या जाईल अशी माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यातून दिली.

कोरोनामुळे फक्त टाटा समूहच नाही तर देशातून अनेक कलाकार सुद्धा ह्या मोहिमेचा भाग बनले आहेत.

बॉलिवूड मधील खिलाडी च्या अभिनयाने प्रसिद्ध अक्षय कुमार यांनी सुद्धा प्रधानमंत्री कोशात २५ कोटींची मदत जाहीर केली, सोबतच क्रिकेट बोर्डाकडून सौरभ गांगुली यांनी सुद्धा प्रधानमंत्री कोशात ५१ कोटी रुपये देण्याची मदत जाहीर केली, तसेच देशातील अनेक कलाकारांनी समोर येऊन आपल्यापरी होईल तेवढी मदत भारत सरकार ला केली, परंतु असेही काही सुपरस्टार आहेत ज्यांनी अजूनही या संकटाच्या काळात देशाला मदत केली नाही सोशल मीडियावर त्यांच्यावर वेगवेगळे प्रश्न उठत आहेत.

अश्याच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here