Home / Recipes / रोज काय भाजी बनवु याचा कंटाळा आलाय् मग आज हि भाजी बनवा

रोज काय भाजी बनवु याचा कंटाळा आलाय् मग आज हि भाजी बनवा

Dahi Aloo

प्रत्येक प्रांताची खवय्येगिरी ही वेगवेगळी पहायला मिळते. कुठे कुठल्या पदार्थाचा समावेश जास्त असतो तर कुठे आणखीन वेगळया पदार्थाचा समावेश. कुठे दही जास्त वापरतात, कुठे चींच जास्त तर कुठल्या भागात तळलेले पदार्थ जास्त बघायला मिळतात अश्या या पदार्थांची लज्जत चाखण्याकरता खाद्यभ्रमंती करणारे देखील खवय्ये आपल्याकडे कमी नाहीत.

मित्रांनो आज आपण चव चाखणार आहोत दही आलु या पदार्थाची. तसा हा पदार्थ खास करून राजस्थान भागातला आहे आणि संपुर्ण भारतियांना हा पदार्थ आवडतो. घरी जर पाहुणे येणार असतील तर पनीर सोबत तुम्ही दहीआलु बनवले तर पाहुणे खुप खुष होणार हे नक्की! राजस्थानी रेसिपींचे एक खास वैशिष्टय आहे. चला तर मग बघुया हा दहीआलु पदार्थ कसा बनवायचा ते.

रोज काय भाजी बनवु याचा कंटाळा आलाय् मग आज हि भाजी बनवा

Dahi Aloo Recipe
Dahi Aloo Recipe

Ingredients of Dahi Aloo
दही आलु साठी लागणारी सामग्री:

  • पातळ दही – 1 कप
  • पाणी – अर्धा कप
  • बटाटे – 200 ग्रॅम ( उकडलेले आणि चैकोनी कापलेले )
  • बेसन – 1 टीस्पुन
  • लाल तिखट पावडर – 1 टीस्पुन
  • धणे पावडर – अर्धा टीस्पुन
  • हळद – अर्धा टीस्पुन
  • तेल – 1 टेबलस्पुन
  • मोहरी आणि जीरे – अर्धा टीस्पुन
  • कापलेली कोथींबीर – 1 टेबलस्पुन
  • चवीनुसार – मीठ

Dahi Aloo Recipe
दही आलु बनविण्याचा विधी:

बटाटयाला चांगले उकडुन छोटया छोटया आकारात कापुन घ्यावे आता पॅन मधे तेल गरम करा जीरं मोहरीची फोडणी करून उकडलेले बटाटे त्यात टाकावे नंतर त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर, आणि मीठ टाकुन 5 मिनीटांपर्यंत चांगले होउ दया.

आता एका बाउल मध्ये दही, पाणी आणि बेसन मिसळुन पातळ घोळ बनवा नंतर हा घोळ त्या बटाटयावर टाकुन उकळी येईपर्यंत शिजवा. 5 मिनीटे मंद आचेवर शिजवुन खाली काढुन घ्या, हिरवी कोथिंबीर टाकुन सजवा.

Read More:

लक्ष्य दया: Dahi Aloo – दहीआलु रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

About Editorial team

Check Also

Motichoor Ladoo

मोतीचूर लाडू कसा बनवायचा | Motichoor Ladoo Recipe

Motichoor Ladoo गोड पदार्थ आपल्याकडे आवडीनं खाणारा एक वर्ग आहे. जरी आजकालच्या काळात हेल्थ बाबतीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *