Egg Curry Recipe
अंडे खाणं शरीराकरता उपयुक्त आहे. भरपुर प्रथीनांचा समावेश अंडयात आढळतो, रोज किमान एक अंड खाणं फायदेशीर समजल्या जातं. सकाळी आॅफीसला जातांना ब-याचदा आपण घाईत असतो नाश्ता करण्याकरता देखील पुरेसा वेळ आपल्याजवळ नसतो तेव्हा किमान एक उकडलेले अंडे खाउन जरी घराबाहेर आपण पडलो तर दिवसभराच्या कामाकरता चांगली एनर्जी आपल्याला मिळते.
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही म्हण बहुतेकांनी ऐकलेली आहे आणि डाॅक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. पण रोज अंडे खाउन देखील कंटाळा येतो पण जर अंडयाच्या वेगवेगळया डिश करता आल्या तर खायला सुध्दा मजा येईल. चला तर मग आज एक नवी अंडयाची रेसीपी इंडियन एग करी कशी बनवायची ते पाहुया.
चला तर बनवु या घरच्याघरी रेस्टोरेंट सारखी अंडा करी – Egg Curry recipe

Ingredients of Egg Curry
अंडा करीसाठी लागणारी सामग्री:
1) 4 अंडे (चांगली उकडलेली)
2) 1 कांदा
3) अर्धे टोमॅटो (पेस्ट बनवावी)
4) 3 ते 4 लसुण
5) अर्धा इंच अदरक
6) 1 ते 2 हिरव्या मिरच्या
7) थोडी कापलेली कोथिंबीर
8) चवीनुसार मीठ
9) चवीनुसार लाल तिखट
10) अर्धा चमचा हळद
11) अर्धा चमचा धणे पावडर
12) 1 चमचा गरम मसाला
13) 2 ते 3 चमचे तेल किंवा तुप
14) 1 कप हिरवे मटर आणि 250 ग्रॅम पनीर
Egg Curry Recipe
अंडा करी बनविण्याचा विधी:
उकडलेल्या अंडयांची सालं काढुन अंडे एकीकडे ठेवावे, जर पनीर चा उपयोग करणार असाल तर त्यांचे छोटे छोटे तुकडे कापुन घ्या सोनेरी रंगावर तळुन घ्या आणि बाजुला ठेवा.
आता कांदा लसुण अदरक आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट बनवुन घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात कांदयाची पेस्ट आणि लसणाची पेस्ट टाका आणि सोनरी रंग येईपर्यंत तळुन घ्या.
त्यात गरम मसाल्या व्यतिरीक्त मीठ हळद धणे पावडर आणि लाल तिखट टाका आणि 1 मिनीटापर्यंत तळुन घ्या आणि मग टोमॅटो ची पेस्ट टाका. जोपर्यंत पेस्ट त्या मसाल्यात पुर्णपणे मिक्स होत नाही आणि तेल सोडत नाही तोपर्यंत तळत राहा.
आता त्यात 1 कप पाणी टाका आणि मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजु दया.
त्यात पनीर चे तुकडे हिरवे मटार आणि उकडलेली अंडी टाका.
आता त्यात 1 कप पाणी आणखीन टाका आणि मंद आचेवर उकळु दया. 15 मिनीटे वाट बघा.
शेवटी त्यात गरम मसाला आणि कापलेल्या कोथींबीरीने सजवा आणि गरम गरम पराठे, पोळी, किंवा भाता सोबत सव्र्ह करा . . . . .
अंडयांच्या वेगवेगळया रेसिपी करून सुध्दा आपण अंडयाचा स्वाद त्याचे पौष्टीक गुण मिळवुच शकतो.
Read More:
लक्ष्य दया: अंडा करी बनवण्याची विधी / Egg Curry Recipe in Marathi रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्