Eye Care Tips in Marathi
तेरी आखो के सिवा दुनीयामे रख्खा क्या है? खरतर ही सृष्टी, हे जीवन, जीवनाचा आनंद डोळयाशिवाय? याची कल्पना देखील आपण करू शकतो का? तर मुळीच नाही.
डोळे हा आपल्या संपुर्ण शरीरातील अतिशय महत्वाचा, गरजेचा भाग आहे त्याची काळजी योग्य त-हेने आपण घ्यायलाच हवी.
आपले डोळे म्हणजे जगाला बघण्याकरता लागणारी खिडकी आहे आणि म्हणुन त्याची निगा राखणं अत्यंत आवश्यक आहे, वेळोवेळी डॉक्टरकडे जाउन डोळे तपासुन घेणे, पुरेश्या प्रमाणात झोप घेणे, जेव्हांही आपण संगणकावर काम करत असु तेव्हा थोडयावेळ डोळयांना विश्रांती देणे या गोष्टी जर आपण केल्या तर आपले डोळे नेहेमी सुंदर आणि निरोगी राहातील.
जर तुमच्या डोळयांना काही त्रास असेल तर डॉक्टरांना नक्की दाखवा आणि ज्या गोष्टींमुळे तुमचे डोळे सुरक्षीत आणि स्वस्थ राहातात अश्या गोष्टींना नेहमी वाचा आणि अमलांत आणा.
आज आम्ही तुम्हाला डोळयांना स्वस्थ ठेवण्याकरता काही महत्वाच्या टिप्स् देणार आहोत.
डोळे सुंदर ठेवण्याकरता काही उपाय – Eye care tips in Marathi
1) डोळयांच्या डॉक्टरकडे वेळोवेळी जाउन डोळे तपासुन घ्या:
फक्त डॉक्टरच असतात की जे तुमच्या डोळयांना बरोबर ओळखतात आणि त्याची काळजी घेउ शकतात मग ते डोळयांचे डॉक्टर असोत किंवा डोळयांचे स्पेशालिस्ट.
आपल्या डोळयांना स्वस्थ ठेवण्याकरता नियमीत त्याची तपासणी करा. डोळयांसंबंधी जास्तीत जास्त माहिती गोळा करा आणि डॉक्टरांना प्रश्न विचारत राहा.
डोळयांच्या संबंधी आजार आणि त्यांपासुन वाचण्याच्या उपायांबाबतीत जास्तीत जास्त माहिती गोळा करा यामुळे तुमचे डोळे स्वस्थ राहातील.
जर तुम्हाला दिसण्यासंबंधी काहीही तक्रार नाही तरीही तुम्ही डॉक्टरकडे जाउ शकता. 18 ते 35 या वयोगटातील व्यक्तीला 3 ते 7 वर्षाच्या अंतरात आपले डोळे तपासुन घ्यायला हवेत.
35 ते 70 या वयोगटातील व्यक्तीला 1 ते 3 वर्षाच्या दरम्यान डॉक्टरांकडे जायला हवे. आणि 65 वर्षानंतर देखील जर तुम्हाला दिसण्यासंबंधी काहीही तक्रार नसेल तर दरवर्षी एकदा डॉक्टरांकडे नक्की जा.
2) रात्री झोपण्यापुर्वी डोळयांवर केलेला मेकअप काढुन घ्या:
रात्री झोपायला जाण्यापुर्वी डोळयांवर केलेला मेकअप काढायला विसरू नका. डोळयांवर केलेला मेकअप तसाच ठेवुन कदापी झोपु नये. जर तुम्ही आय लायनर आणि मस्करा लावुन झोपत असाल तर लवकरच तुम्हाला डोळयांसंबधी आजाराचा सामना करावा लागु शकतो.
तेव्हां झोपण्यापुर्वी मेकअप काढुन झोपा गरज पडल्यास डोळयांना स्वस्थ ठेवण्याकरता औषधी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला ऐका. मेकअप काढण्याकरता ज्या लिक्वीड चा उपयोग केला जातो ते सतत जवळ ठेवा, जेव्हा ही थकवा जाणवेल त्याचा उपयोग करायला विसरू नका.
3) योग्य वेळी चष्मा नक्की वापरा:
जेव्हांही आपण केमिकल किंवा कोणत्याही हत्यारा सोबत काम करत असाल ज्याचा थेट परिणाम डोळयावर होउ शकतो तेव्हा अश्या वेळी चष्मा नक्की वापरा.
चष्मा वापरल्यास तुम्ही तुमच्या डोळयांना सुरक्षीत ठेवु शकता.
4) पुरेशी झोप घ्या:
अपुरी झोप तुमच्या डोळयांना थकवु शकते. डोळयांना जळजळ होणे, डोळे जड होणे, अचानक डोळयातुन पाणी वाहु लागणे ही अपु-या झोपेची लक्षण आहेत. अस्पष्ट दिसणे, कमी दिसु लागणे, हे सुध्दा अपु-या झोपेमुळेच होते.
नेहमी लक्षात असुदया की रात्री तुमची झोप पुर्ण व्हायला हवी. तरूणांची रात्री 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे.
5) रात्री कॉण्टॅक्ट लेन्स काढुन टाका:
20 तासापेक्षा जास्त कॉण्टॅक्ट लेन्स घालु नका. जास्त वेळ तो वापरल्यास नेहमी करता दृष्टीदोष होउ शकतो. कॉण्टॅक्ट लेन्स घालुन झोपु नये याबाबतीत नेत्रतज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
डोळयांना पुरेश्या प्राणवायुची गरज असते आणि लेन्स घातल्याने डोळयांना पुरेश्या प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही आणि म्हणुन डॉक्टर लेन्स वापरणा-यांना काही काळ डोळयांना आराम देण्याचा सल्ला देतात.
रात्री तर लेन्स मुळीच वापरू नये. कॉण्टॅक्ट लेन्स घालुन स्विमींग करू नका.
जोपर्यंत फिट स्विमींग चष्मा तुम्ही घालत नाही तोपर्यंत लेन्स घालुन स्विमींग करू नका.
डॉक्टरांना विचारून स्विमींगकरता चष्मा विकत घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेले शॅम्पु आणि साबण वापरा.
कॉण्टॅक्ट लेन्स संबंधीत उपाय आणि सावधानता नेहमी लक्षात ठेवा त्यावर कधी दुर्लक्ष करू नका.
लेन्स ला डोळयांवर लावतांना तुमचे हात नेहमी स्वच्छ करून घ्या.
6) रोज व्यायाम करा:
रोज व्यायाम केल्यास आपण ब-याच आजारांपासुन मुक्तता मिळवु शकता.
याकरता तुम्हाला आठवडयातुन फक्त 3 वेळा 30 मिनीटे व्यायाम करण्याची आवश्यकता आहे.
असे केल्यास डोळयाच्या गंभीर समस्येला सुध्दा तुम्ही सहजतेने सोडवु शकाल.
7) डोळयांची सुज कमी करण्याकरता डोळयावर काकडीचे तुकडे ठेवा:
रोज रात्री झोपण्यापुर्वी डोळयांवर कमीत कमी 15 ते 20 मिनीटं काकडीचे तुकडे ठेवा, असे केल्यास डोळयांवर येणारी सुज कमी होईल.
ग्रीन टी देखील तुमच्या डोळयांवरची सुज कमी करू शकते याकरता काही वेळ ग्रीन टी ची बॅग थंड पाण्यात बुडवुन 15 ते 20 मिनीटांपर्यंत आपल्या डोळयांवर ठेवावी या उपायाने डोळयांसंबंधी ब-याच समस्या दुर होउ शकतात.
8) अॅलर्जी कमी करणारे आय ड्रॉप वापरा:
डोळयांच्या स्वस्थ राहण्याकरता आय ड्रॉप चा वापर निश्चित आरामदायक ठरू शकतो.
परंतु याचा रोज रोज वापर करणे देखील पुढे समस्या निर्माण करू शकतं.
पुढे याने तुमचे डोळे लाल देखील होउ शकतात कारण डोळे जास्त काळ आय ड्रॉप च्या थेंबांना सहन करू शकत नाही.
अॅलर्जी कमी करणारे आय ड्रॉप वापरल्यास कॉर्नियात रक्त प्रवाह कमी व्हायला लागतो ज्यामुळे डोळे सुस्त व्हायला लागतात यामुळे त्यांना रक्तातुन पुरेश्या प्रमाणात ऑक्सीजन मीळत नाही, आणि डोळयांना जर स्वस्थ ठेवायचे असेल तर पुरेश्या प्रमाणात ऑक्सीजन मिळणे खुप आवश्यक आहे.
तुम्ही जो ही आय ड्रॉप वापरत असाल तो वापरण्यापुर्वी त्यावर लिहीलेल्या सुचन जरूर वाचा.
खास करून जेव्हा तुम्ही कॉण्टॅक्ट लेन्स वापरत असाल, कारण बरेच आय ड्रॉप कॉण्टॅक्ट लेन्स लावलेले असल्यास उपयोगात आणु शकत नाही.
म्हणुन कोणताही आय ड्रॉप वापरण्यापुर्वी नेत्रतज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.
अश्या त-हेने जर डोळयांची योग्य निगा आपण राखली तर इतके सुंदर जग पाहण्यास आपल्याला कोणीही रोखु शकत नाही.