भारतीय चलना विषयी काही न ऐकलेल्या रोचक गोष्टी!

Facts about Indian Currency

प्रत्येक देशाचे एक चलन असते.त्याचप्रमाणे भारताचे पण एक चलन आहे ज्याला आपण रुपया म्हणतो. बऱ्याच लोकांना भारताच्या या चलनाविषयी काही गोष्टी माहिती नाहीत.

तर आपण आजच्या लेखात जाणून घेऊया त्या रोचक गोष्टी ज्या भारतीय चलनाविषयी ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत.

भारतीय चलना विषयी काही न ऐकलेल्या रोचक गोष्टी! – Facts about Indian Currency

Facts about Indian Currency
Facts about Indian Currency

१८ व्या शतकात सर्वात पहिल्यांदा कागदाच्या नोटा छापल्या गेल्या होत्या.

त्या शतकात बँक ऑफ हिंदुस्तान, जनरल बँक ऑफ बंगाल या बँकांनी सर्वप्रथम ह्या नोटा बाजारात आणल्या होत्या.

सर्वात आधी  भारत सरकार ने विक्टोरिया पोर्टेट या सिरीज च्या नोटा बाजारात आणल्या होत्या.

पण काही कारणास्तव सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ह्या नोटा सरकार ला बंद कराव्या लागल्या होत्या,

आणि १८६७ मध्ये त्या नोटांच्या जागी अंडरप्रिंट सिरीज च्या नोटा बाजारात आणाव्या लागल्या.

जर तुमच्या जवळ ५१% फाटकी नोट असेल तरीही तुम्ही बँक मध्ये जाऊन त्या नोटेच्या जागी नवीन नोट घेऊन येऊ शकता.

आपल्या देशात एक रुपयाच्या नोटेवर किंवा पाचशेच्या नोटांवर गवर्नर ची सही असते कारण ह्या नोटा छापण्याचा अधिकार फक्त भारत सरकार ला आहे.

जवळजवळ सगळ्या लोकांना वाटते कि नोट हि कागदाची असते पण खर तर ती “कॉटन” आणि “कॉटन रग” यांच्या मिश्रणापासून बनलेली असते. त्यामुळेच नोट भिजली तरीपण लवकर खराब होत नाही.

बँकेच्या नोटांवर एकूण १७ भाषा असतात त्यापैकी १५ भाषा ह्या डाव्या बाजूला एका कोपऱ्यात लिहलेल्या दिसतात, आणि नोटेच्या मध्यभागी हिंदी भाषा दिसून येते तसेच नोटेच्या मागच्या बाजूला पाहिले असता इंग्रजी भाषा लिहिलेली दिसते.

भारताला स्वतंत्र मिळाल्या नंतर चलनातील नाणे हे तांब्याचे बनत होते, त्यानंतर १९६४ मध्ये अल्युमिनिअम, आणि १९८८ मध्ये स्टेनलेस स्टील पासून बनण्यास सुरुवात झाली.

About Indian Currency

नोटांवर सीरिअल नंबर यासाठी असतो कि रिजर्व बँकेला माहिती रहावे, कि या वेळेस मार्केट मध्ये किती नोटा आहेत.

रिजर्व बँकेच्या अनुसार भारतामध्ये प्रत्येक वर्षाला २००० करोड नोटा छापल्या जातात.

आता ज्या नोटा बाजारात आहेत त्यांना महात्मा गांधी सिरीज च्या नोटा म्हणतात, ह्या सिरीज च्या नोटा १९९६ पासून बाजारात आल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटांच्या सीरिअल नंबर मध्ये I,J,O,X,Y,Z हि अक्षर मिळत नाहीत.

१९३८ मध्ये रिजर्व बँकेने १०,००० रुपयांची नोट बाजारात आणली होती. त्यांनतर १९५४ मध्ये सुद्धा आणखी एक वेळ त्या नोटेला बाजारात घेऊन येण्यात आले होते.

परंतु या मोठ्या नोटांवर १९४६ आणि १९७८ मध्ये बंदी आणल्या गेली होती.

रिजर्व बँक त्याच नोटांना बाजारात आणू शकते ज्या नोटांना केंद्र सरकार परवानगी देते.

त्यामध्ये ५००० किंवा १०,००० रुपयाच्या नोटा असू शकतात, परंतु १९३४ च्या कायद्यानुसार केंद्र सरकार १०,००० रुपयांच्या वर कोणतीही नोट काढू शकत नाही.

रिजर्व बँकेची सुरुवात इसवी सन १९३५ ला झाली होती. तेव्हापासून रिजर्व बँकेला नोटा छापण्याचे अधिकार मिळाले होते.

पहिल्यांदाच रिजर्व बँकेने सहावा राजा जॉर्ज पोर्ट्रेट चे चित्र असलेली पाच रुपयाची नोट काढली होती.

जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा रुपयाला आण्यांमध्ये मोजल्या जात असे.

तेव्हा १६ आण्यांचा मिळून एक रुपया होत असे. आणि एका आण्याला सुद्धा ४ पैसे आणि १२ पाई मध्ये मोजल्या जात असे.

आता रुपयाला पैश्यामध्ये मोजल्या जातं, तसेच १०० पैसे मिळून एक रुपया होतो.

Indian Currency History

भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये एक रुपया च्या नोटा छापल्या गेल्या होत्या.

२०१० मध्ये पहिल्यांदाच ७५ रुपये,१०० रुपये, आणि १,००० रुपयाचे नाणे बनवल्या गेले होते.

परंतु ते नाणे फक्त स्मृती चिन्ह म्हणून वापरले गेले होते.

त्या नाण्यांना या साठी बनवले गेले होते कारण त्या वर्षी रिजर्व बँकेला ७५ वर्ष पूर्ण झाले होते, सोबतच रवींद्रनाथ टागोर यांना १०० वर्ष आणि ब्रिहदेश्वर मंदिराला १००० वर्ष पूर्ण झाले होते.

२०१० मध्ये एक रुपयाला “र” हे चिन्ह देण्यात आले.

या चिन्हाला बनवण्याचे पूर्ण श्रेय डी.उदय कुमार यांना दिल्या जाते.

याला देवनागरी भाषेतील “र” अक्षरापासून बनवल्या गेले आहे.

या चिन्हाला बनवण्यासाठी लॅटिन अक्षर “आर” चा वापर केला गेला तेव्हा कुठे भारतीय रुपया ला हे चिन्ह भेटले.

चिन्हामध्ये जे समांतर लाईन दाखवल्या गेली आहे ती भारताच्या झेंड्याला दर्शवण्याचे काम करते.

२०११ च्या नाण्यांच्या कायद्यानुसार १,००० रुपयांपर्यंत नाणे बाजारात आणल्या जाऊ शकतात.

१ पैसा, २ पैशे, ३ पैशे, ५ पैशे, १० पैशे, २० पैशे, २५ पैशे,

या सगळ्या नाण्यांना ३० जुन २०११ ला पूर्णपणे बंद केल्या गेले.

आशा करतो तुम्हाला या लेखामध्ये भारताच्या चलनाविषयी नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल, आम्ही अश्याच नवीन रोचक गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत राहू, हा लिहिलेला लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका. आणि असेच रोचक लेख वाचत राहण्यासाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत,

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top