स्वस्थ त्वचेकरता काय खावे?

Food for Healthy Skin

आपली त्वचा ही आपल्या व्यक्तीमत्वाचा आरसा समजल्या जाते. प्रत्येकाच्या स्कीनचा अर्थात त्वचेचा एक टोन असतो. कुणाची त्वचा तेलकट तर कुणाची कोरडी, कुणाची मउ तर कुणाची रूक्ष. स्कीन कशी का असेना पण प्रत्येकाला ती नितळ, तजेलदार, मउ हवी असते. अश्या या स्कीन करता काय खावे काय खाउ नये हे देखील फार महत्वाचे आहे.

आपण नेहमी हा विचार करतो की आपल्या स्कीन ला कश्याप्रकारे आपण चांगली करू शकतो? याकरता आपण बरेच प्राॅडक्टस् आणि क्रिम चा देखील उपयोग करतो पण आपण कधी हा विचार केला नसेल की आपल्या खाण्यापिण्याचा प्रभाव जसा आपल्या शरीरावर होतो तसा आपल्या त्वचेवर देखील होतो. आणि म्हणुन आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत खुप सतर्क राहायला हवं.

चुकीच्या पध्दतीने जर आपण खादयपदार्थाचे सेवन करत असु तर आपली स्कीन कधी स्वस्थ राहाणार नाही आणि जर आपण चांगले अन्न ग्रहण केले तर नक्कीच आपली त्वचा संदर होईल.

चला तर पाहुया चांगल्या त्वचेकरता तुम्हाला कोणत्या गोष्टींचे सेवन करायला हवे.

Food for Healthy Skin
Food for Healthy Skin

 स्वस्थ त्वचेकरता काय खावे? – Food for Healthy Skin

  • पाणी

आपल्या त्वचेला तुकतुकीत, लवचिक आणि कोरडे होण्यापासुन वाचवण्याकरता त्वचेला रोज माॅश्चराइझ करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पुरेश्या प्रमाणात पाण्याचे सेवन केले नाही तर लवकरच तुमची त्वचा थकलेली आणि कोरडी दिसायला लागते.

आपल्यातील बरेच लोक दिवसात बरेचदा काॅफी चे सेवन करत असतात आणि खुप कमी लोक पुरेश्या प्रमाणात पाणी पितात.

जर स्वस्थ त्वचा हवी असेल तर दिवसातुन कमीत कमी सहा ग्लास पाणी प्यायला हवं.

काम करत असतांना प्रत्येक तासाला काॅफी पिण्यापेक्षा आपल्याजवळ पाण्याने भरलेली बाटली ठेवा आणि आवश्यकता भासल्यास पाणी प्या.

  • जैतुन चे तेल

जैतुन च्या तेलाला शेंगदाण्याच्या तेलासोबत आणि सुर्यफुलाच्या तेलासोबत तपासलं गेलं पण नेहमी जैतुन तेलच सर्वश्रेष्ठ ठरलं. याचे महत्वाचे कारण हे सुध्दा असु शकतं की जैतुन तेलात मोठया प्रमाणात मोनो सॅचुरेटेड चरबी आढळते जी आपल्या त्वचेला तरूण ठेवण्यात सहाय्यक आहे.

  • अंडे

अंडे आपल्या शरीराला कोणत्याही चरबीशिवाय उच्च मात्रेत प्रोटीन देतं आणि यात असलेली कमी चरबी तुमच्या त्वचेकरता लाभदायक असते. ज्या आहारांमध्ये जास्त प्रमाणात चरबी असते त्यांच्या सेवनामुळे एजिंग त्वचा यासारख्या समस्या उद्भवु शकतात.

  • स्ट्राॅबेरी

जेव्हां आपण फळांचा विचार करतो तेव्हा स्ट्राॅबेरी त्वचेकरता आणि स्वस्थ त्वचेकरता सगळयात जास्त लाभदायक आहे. स्ट्राॅबेरी अॅंटी एजिंग व्हिटामीन सी ने पुरेपुर असते ज्यामुळे चेहे-यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि कोरडया त्वचेपासुनही मुक्ती मिळते.

व्हिटामीन सी पेस्की मुक्त रॅडिकल्स आणि अणुंशी लढण्यात साहाय्यक आहेत जे आपल्या त्वचेला हानी तर पोहोचवतातच आणि लवकर वृध्द देखील बनवतात.

स्ट्राॅबेरी ला खाण्याऐवेजी तुम्ही याचा उपयोग स्ट्राॅबेरी फेस मास्क च्या रूपात देखील करू शकतात.

  • टोमॅटो

स्वस्थ त्वचेकरता जास्तीत जास्त टोमॅटो खाण्याचा प्रयत्न करा. टोमॅटो लाईकोपिन नावाच्या एंटीऑक्सीडेंट ने भरलेला असतो जो आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या SPF ला वाढवतो.

टोमॅटो चा उपयोग सनस्क्रीन ला पर्याय म्हणुन करू नका.

  • लालभोपळा

यालाच काही लोक डांगर सुध्दा म्हणतात. यात असलेल्या कैरोटिनोईड मुळे याचा रंग गडद नारंगी असतो.

कैरोटीनोईड, लालभोपळयाशिवाय गाजरात देखील असतं जे चेहे-यावर लवकर सुरकुत्या येउ देत नाही आणि रॅडीकल्सशी सुध्दा लढतं,

शिवाय तुमच्या त्वचेला चांगला आकार आणि स्वस्थ ठेवण्यात साहाय्यक आहे.

याशिवाय लालभोपळयात व्हिटामीन सी आणि दुसरे अॅंटी एजिंग व्हिटामीन देखील आढळतात जे तुमच्या त्वचेला स्वच्छ आणि स्वस्थ ठेवतात.

  • डार्क चाॅकलेट

डार्क चाॅकलेट निश्चित रूपानं तुमच्या त्वचेकरता लाभदायक आहे.

काॅकोया फ्लावानोल सारख्या एंटीऑक्सीडेंट ने भरलेले असल्याने डार्क चाॅकलेट तुमच्या त्वचेला हाइड्रेट ठेवते शिवाय साफ आणि स्वस्थ ठेवण्यात साहाय्यक आहे.

काॅकोया तुमच्या त्वचेला मुलायम बनवतं आणि सोबतच चेहे-यावर सुरकुत्या सुध्दा लवकर येउ देत नाही परंतु तुम्ही याचे सेवन जास्त प्रमाणात करू नका रोज एका सिमीत मात्रेत याचे सेवन करणे निश्चितच तुमच्याकरता फायदयाचे राहील.

  • साग

सागात सर्व प्रकारच्या त्वचे करता लाभदायक न्यूट्रीशन असतात आणि मजेदार गोष्ट म्हणजे तुमचे शरीर त्या सर्व न्यूट्रीशन ला चमत्कारीक स्पंज प्रमाणे शोषुन घेतो. साग जसे की पालक, कोबी, ब्रोकोली आणि हिरवे सफरचंद निश्चितच आपण आपल्या दैनिक आहारात याचा समावेश करायला हवा.

  • डाळींब

तुम्ही डाळींब खाता? बरेच जण नाही खात पण त्यांना हे माहीत नाही की डाळींबात बरेचसे एंटीऑक्सीडेंट असतात जे आपल्याला दुस-या फळांमध्ये मिळत नाही.

जेव्हा स्वस्थ त्वचेबद्दल आपण बोलतो तेव्हा कदापीही आपल्याला डाळींबाला विसरून चालणार नाही.

  • दलिया

सकाळचा नाश्ता हा संपुर्ण दिवसभरातुन महत्वाचा आहार असतो. आणि तरीही आपल्यातले बरेचजण या गोष्टीकडे कानाडोळा करतात.

जेव्हा तुम्ही नाश्ता करत नाही तेव्हा एक प्रकारे तुम्ही तुमच्या चेहे-याला स्वस्थ ठेवण्याची एक चांगली संधी गमावता.

दलीया डोनट्स्, बगेल्स, आणि जेलीपेक्षा बरेच जास्त गुणधर्म दलीयात आहे.

बे्रेेकफास्ट न केल्याने तुमच्या खाण्यात जी कमतरता राहाते त्यामुळे तुमच्या त्वचेवर विपरीत परीणात होवु शकतो.

म्हणुन जर तुम्ही तुमच्या त्वचेला स्वस्थ आणि एकसारखी ठेवु ईच्छिता तर सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळी दलीयाचे सेवन अवश्य करा.

  • ग्रीन टी

जेव्हा मोठया प्रमाणात स्वास्थ्य लाभ हवा असेल आणि तो कशानी मिळेल असा जर कुणी प्रश्न केला तर सर्वात वरच्या क्रमांकावर ग्रीन टीचे नाव येईल.

ग्रीन टी तुम्हाला सुंदर बनवते.

कॅंसर पासुन दुर ठेवते शिवाय तुमच्या त्वचेला स्वच्छ देखील ठेवते आणि तुमच्या चेहे-याला लागणा-या आवश्यक तत्वांनाही पुर्ण करते.

जे लोक सतत 3 महिने ग्रीन टी चे सेवन करतात त्यांची त्वचा ग्रीन टी चे सेवन न करणा-यांच्या तुलनेत जास्त मुलायम स्वस्थ आणि कोमल असते. आणि हे सर्व याकरता होतं कारण यात महत्वपुर्ण तत्व जसे कैटेचीन, EGCG असतात जे आपल्या शरीरात आॅक्सीजनच्या प्रवाहाला वाढवतात आणि त्वचेत रक्ताच्या कमतरतेला भरून काढतात.

  • बदाम चे दुध

बदामाचे दुध देखील तुमच्या त्वचेकरता खुप लाभदायक आहे. शोधाअंती असे समजले की डेअरी चे दुध घातक असते याचा अर्थ की मुरूम, सुरकुत्या आणि डाग हे या दुधामुळे वाढतात. जेव्हा तुम्ही काॅफी चे सेवन करता तेव्हां तुम्ही डेअरी चे दुध सेवन करायला नको. त्यापेक्षा बदामाच्या दुधाचे सेवन करायला हवे कारण त्वचेमधल्या पोषकतत्वांच्या कमतरतेला बदामाचे दुध भरून काढते.

  • कीवी

हे एक छोटेसे फळ आहे जे पुर्णपणे व्हिटामीन सी ने भरलेले आहे. जवळजवळ 120% व्हिटामीन सी कीवी मध्ये आढळतं.

किवी तुमच्या त्वचेला मुलायम ठेवण्यात साहाय्यक आहे.

अमेरिकन जर्नल आॅफ क्लिनिकल न्यूट्रीशन मध्ये प्रकाशीत झालेल्या अभ्यासानुसार ज्या आहारात व्हिटामीन सी भरपुर प्रमाणात असतं त्याचे सेवन केल्याने चेहे-यावरील सुरकुत्या आणि मुरूमांसारखे प्रकार दुर होतात.

  • रेड वाइन

जे लोक दिवसातुन अर्धा ग्लास रेड वाइन चे सेवन करतात त्यांना सुर्याच्या किरणांशी संबंधीत केराटोसेस होण्याची भिती 28% कमी होते.

रेड वाइन मध्ये त्वचे करता लाभदायक सगळे एंटीऑक्सीडेंट असतात.

  • गाजर

गाजर चे सेवन केल्यास तुमच्यात नैसर्गिक तजेला येतो. गाजरात जास्त प्रमाणात कैरोटीनोईड सापडतं जे आपल्या त्वचेला तजेला देण्यात साहाय्यक आहे.

आरोग्यानी परीपुर्ण आणि त्वचेला स्वस्थ ठेवण्याकरता हे उपाय जर आपण अमलात आणले तर तुमच्या त्वचेला याचा नक्की फायदा होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top