चविष्ट गाजरचा हलवा बनविण्याची विधी | Gajarcha Halwa Recipe

Gajarcha Halwa

गाजर खाणे आरोग्याकरता चांगले मानले आहे तसंही जेवणात सलाद चे प्रमाण जास्त ठेवल्यास पाचनशक्ती सुधारते. या सलाद मध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, चा वापर करायला हवा. गाजराचे पदार्थ देखील आपल्याकडे बनवले जातात आणि त्याचा स्वाद देखील अप्रतीम असतो. अश्याच गाजरापासुन बनवलेल्या एका पदार्थाची चव आपण आज पाहाणार आहोत.

Gajarcha Halwa Recipe
Gajarcha Halwa Recipe

चविष्ट गाजरचा हलवा बनविण्याची विधी – Gajarcha Halwa Recipe

आज आपण चाखुया गाजरहलव्याचा स्वाद. गाजरहलवा लहान मुलांपासुन तर मोठयांपर्यंत सगळयांनाच आवडतो. आणि जेवणानंतर जर स्वीट डिश म्हणुन गाजर हलवा असेल तर मग क्या कहेने. गाजरहलव्याला गोड पदार्थांमध्ये खुप जास्त पसंत केल्या जातं. चला तर मग आज आपण पाहुया कसा बनवायचा गाजर हलवा.

Ingredients of Gajar Halwa
गाजरहलव्यासाठी लागणारी सामग्री:

  • 1 किलो गाजर
  • 1 लीटर दूध
  • 1 चमचा इलायची
  • अर्धा कप पाणी
  • 3 चमचे तुप
  • 2 चमचे किशमिश
  • 2 चमचे बदाम
  • 2 चमचे पिस्ता
  • 450 ग्रॅम साखर

Gajar Halwa Recipe
गाजर हलवा बनविण्याचा विधी:

सुरूवातीला गाजर धुवुन त्याचा किस बनवुन घ्या. किशमीश ला पाण्यात अर्धा तास भिजवुन ठेवा. सगळया सुक्यामेव्याला चांगल्या प्रकारे बारीक बारीक कापुन घ्या.
पातेल्यात पाणी टाका, पाणी उकळायला लागल्यावर त्यात गाजराचा किस टाका, आता 10 ते 15 मिनीटं शिजु दया.

आता त्यात दुध टाका त्यानंतर कमीत कमी 1 तासापर्यंत मंद आचेवर शिजु दया. शिजल्यानंतर त्यात साखर टाका, चांगल्या त-हेने मिक्स करून घ्या जोपर्यंत साखर पुर्णपणे विरघळत नाही तोवर शिजु दया.

थोडया वेळानंतर तुप टाका बारीक केलेली इलायची पुड त्यात वरतुन भुरका, किसमीस टाका आणि चांगल्या त-हेने सर्व जिन्नस एकत्र करा.
गॅसवरून गाजर हलवा उतरवुन घ्या त्यात बदाम पिस्ता टाकुन सजवा आणि गरम गरम सव्र्ह करा.

Read More:

लक्ष्य दया: गाजरचा हलवा बनविण्याची विधी – Gajarcha Halwa रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top