आल (अद्रक) ची माहिती आणि फ़ायदे

Adrak in Marathi

आपल्याला सर्वांना परिचित असलेली आणि रोजच्या वापरातील असणारी झुडूपवर्गीय वनस्पती म्हणजे आले होय, आले रंगाने काळपट पिवळे असते, ओले असताना त्याला आले म्हणतात; परंतु त्यावर प्रक्रिया करून उन्हात वाळवल्यावर त्याची सुंठ तयार होते. थंडीच्या दिवसांत व पावसाळ्यात आले घालून तयार केलेला चहा प्यायल्यास खूप बरे वाटते. अश्या अनेक प्रकारे याचा उपयोग केला जातो. आणि आले हे एक औषधी मानली जाते. या विषयाची आणखी माहिती आपण समोर पाहूया.

आल (अद्रक) ची माहिती आणि फ़ायदे – Ginger Information in Marathi 

Ginger Information in Marathi
Ginger Information in Marathi

आल (अद्रक) ची माहिती – Alya chi Mahiti

शास्त्रीय नाव: (झिंजिबर ऑफिसिनेल) Zingiber officinale
इंग्रजी नाव : (जिंजर) Ginger

आल्याचे हे आल ही वनस्पती झुडूप कंदवर्गात मोडते. सर्वसाधारणपणे आल्याचे झाड दोन ते चार फूट उंच वाढते. याची पाने सर्वसाधारणपणे २० ते २५ सें.मी. लांब व वरच्या बाजूने गुळगुळीत असतात. तसेच आल्याला हिरवी-पिवळट रंगाची फुले येतात. पण ही फुले या झाडावर बहुधा दिसत नाहीत. याचा वास अतिशय उग्र स्वरूपाचा असतो.

अद्रक ची लागवड – Adrak Lagwad

आल्याची लागवड प्रामुख्याने भारतात गुजरात, आंध्र प्रदेश, मद्रास, महाराष्ट्र व केरळ इ. राज्यांत केली जाते. आले हे एक कंदमूळ आहे. आल याची जमिनीतच वाढ होते. जमिनीवर गवतासारखी पाती येतात. तसेच आल्याची शेती करण्यासाठी उष्ण व दमट हवामानाची गरज असते.

आल्याचे विविध उपयोग आणि फ़ायदे – Ginger Uses and Benefits

 • आल्याचा (सुंठेचा) वापर पोटातून घेण्यासाठी व बाहेरून लेप लावण्यासाठी सुद्धा केला जातो.
 • सर्दी झाली असल्यास सुंठ पाण्यात उगाळून लोखंडी कढईत गरम करून, त्याचा लेप कपाळावर व नाकावर लावल्यास उत्कृष्ठ असा आराम मिळतो.
 • सूज आली असता त्यावर सुंठीचा लेप लावतात.
 • आल्याचा उपयोग आपल्या रोजच्या जेवणात स्वादासाठी केला जातो.
 • तसेच विशेषता थंडीच्या दिवसांत व पावसाळ्यात आले घालून तयार केलेला चहा प्यायल्यास बरे वाटते.
 • सुंठेच्या चूर्णाचे उटणेसुद्धा शरीराला लावण्यासाठी उपयोग करतात.
 • भरपूर घाम येऊन अंग गार पडत असल्यास सुंठेचे बारीक चूर्ण अंगास चोळावे म्हणजे त्याने छान असा आराम मिळतो.

अद्रकाचे औषधी उपयोग – Ginger Medicinal Uses

 • पोटात घेण्यासाठी सुंठेचा वापर केला जातो. वातनाशक, पित्तनाशक म्हणून सुद्धा सुंठेचा वापर केला जातो.
 • मळमळ, अपचन, कावीळ, मूळव्याध इत्यादि रोगांवर देखील सुंठेचा उपयोग होतो.
 • खोकला येत असल्यास सुंठ, मिरे, लवंग, दालचिनी, तुळस वगैरे घालून केलेला काढयाचा उपयोग केला जातो.
 • खोकला येत असेल, कफ झाला असेल तर सुंठेचा काढा घेतल्यास आराम मिळतो.
 • प्रसूती झालेल्या स्त्रियांना अनेक प्रकारच्या रोगांवर, तसेच शक्ती येण्यासाठी सुंठ याचा औषधी म्हणून वापर केला जाते.
 • पित्त झाले असल्यास आलेपाकच्या वड्या खाव्यात म्हणजे ज्यानेकरून छान असा आराम मिळतो.

अशी औषधी असलेली सुंठ ग्रीष्म-शरद ऋतूत वापरू नये. इतर ऋतूंत याचा उपयोग करावा. तसेच आर्द्रकखंड, शुष्ठीपानक, त्रिकटु चूर्ण, सौभाग्यशुण्ठीपाक अशा विविध कल्पांत सुंठीचा वापर हा केला जातो.

इतर माहिती :

आले रंगाने काळपट पिवळे असते, ओले असताना त्याला आले म्हणतात; परंतु त्यावर प्रक्रिया करून उन्हात वाळवल्यावर त्याची सुंठ तयार होते. प्रथम आल्याची वरची साल काढून आतील गाभा पाण्याने स्वच्छ धुऊन ८ ते १० दिवस उन्हात व नंतर सावलीत वाळवतात, आणि एक दिवस पाण्यात भिजवून ते पुन्हा चुन्याच्या निवळीत ठेवून नंतर ते पुन्हा उन्हात वाळवतात; म्हणजे आल्याचे रूपांतर हे पांढऱ्या सुंठीत होते. आले व सुंठ या दोन्हींचा औषधी म्हणून उपयोग करतात.

आल्याचे इतर आरोग्यदायी फ़ायदे – Other Health Benefits of Ginger

१) मळमळी वर उत्तम औषध

उलटी व मळमळीची समस्या उदभवल्यास अद्रकाचा काप शहदासोबत तोंडात ठेवून चावल्यास मळमळ नाहीशी होते. गळ्यातील कफ खोकला ज्यात फार कफ येतो. त्यावर अद्रकाच्या रसात शहद मिळवून घेतल्यास लवकरच आराम मिळतो.

२) भूक वाढविणे

अद्रकातील उग्रगन्धामुळे व तीव्र स्वादामुळे तोंडातील ग्रंथींना बेचव वाटणारे अन्न चवीचे वाटू लागते. अद्रकाचे काप जेवण्याआधी तोंडात ठेवून चावल्या नंतर काहीवेळानी तोंडात ठेवून चावल्या नंतर काहीवेळाने जेवल्यास अन्न चविष्ट लागते. त्यामुळे भूक वाढते.

3) पोटातील समस्या

अपचन, पोट दुखणे, पोटात वायू जमा होणे यावर रोज सकाळी शहदासोबत अद्रकाचा रस कोमट पाण्यासोबत घेतल्यास. वरील समस्या दूर होतात.

४) सर्दीपासून बचाव

सर्दीत गळ्यात कफ होतो. नाकाच्या नासिका बंद पडतात. अशा वेळी २ चम्मच अद्रक रस व शहद कोमट पाण्यासोबत सर्दी बसेपर्यंत घेतल्यास सर्दी बरी होते.

५) शरीरात कामोत्तेजना वाढविणे

आयुर्वेदात बऱ्याच ठिकाणी अद्रकाचा वापर शरीरात यौन इच्छा अधिक प्रबळ करण्यासाठी व अधिक परिणामकारक करण्यासाठी होतो. याचे उल्लेख सापडतात.

६) शरीराच्या संध्याच्या दुखण्यावर परिणामकारक

रोज सकाळी उन्हात बसून अद्रकाच्या तेलाची सांध्यावर चांगली मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केल्यास सांध्यांच्या दुखण्यात कमतरता येते. ह्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

७) रक्तप्रवाह सुरळीत करणे

अद्रकत झिंक मॅग्नेशियम आणि क्रोमियम सारखे खनिज असतात. त्यामुळे अद्र्काचे शहदासोबत सेवन पहाटे निर्जळी केल्यास रक्त प्रवाह बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतो.

८) श्वासासंबंधी समस्यावर प्रभावशाली

अद्रकाचा उग्र गंध व तीव्र स्वाद यामुळे हे एक बहुगुणी एक्स्पेटोरांट मानल्या जाते. हे श्वास नलिकेतील घाण बाहेर काढणे, श्वास घेण्यास त्रास व दम भरणे यावर प्रभावशाली औषध मानले जाते. अद्रक कुटून एका कपड्यात टाकून त्याचा ताजा गंध नियमित घेतल्यास श्वासा संबंधी अनेक समस्या दूर होतात.

९) शरीर प्रतिरक्षकांना मदत

अद्रक शरीरातील रोग प्रतीकारक क्षमता वाढविणाऱ्या पेशींना नष्ट करतो व नवीन चांगल्या पेशी तयार होण्यास मदत करतो.
पोषण मूल्यासंबंधी माहिती

 • – १०० ग्राम सुक्या अद्रकात अनेक खनिज तत्वे व पोषके असतात.
 • – १ चम्मच अद्रक रोज वापरल्यास यातील पोषक तत्वे आपणास मिळतात.

– अद्रक नवी असो व जुनी किंवा सुकलेली असो याच्यातील पोषकांची कधीच कमी होत नाही. अद्रकाचा वापर सरळ व सोपा आहे.

तर मग आपल्या घरी अद्रकाचा वापर करायला विसरू नका हे आपल्या शरीर स्वास्थासाठी लाभदायक आहे.

आल विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ about Ginger in Marathi

1. आल याचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर – आल याचे शास्त्रीय नाव (झिंजिबर ऑफिसिनेल) Zingiber officinale हे आहे.

2. आल याची लागवड ही कधी केली जाते ?
उत्तर – आल्याची लागवड प्रामुख्याने भारतात गुजरात, आंध्र प्रदेश, मद्रास, महाराष्ट्र व केरळ इ. राज्यांत केली जाते.

3. आल्याची कोणकोणत्या नावाने ओळखली जाते ?
उत्तर – आल्याची (झिंजिबर ऑफिसिनेल) Zingiber officinale, (जिंजर) Ginger इत्यादि नावाने ओळखली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top