Good Health Tips in Marathi
आजकाल विविध आजार मोठया प्रमाणात वाढायला लागले आहेत असं आपण आपल्या अवतीभवती सतत ऐकत असतो. पण मित्रांनो आजार वाढण्याचे कारण देखील आपणच आहोत म्हणजे आपली अस्वच्छता, आपल्या सवयी, हीच तर कारणं आहेत आजार वाढण्याची. चला तर आम्ही सांगतो आहोत काही चांगल्या सवयी उत्तम स्वास्थ्याकरता ज्यामुळे आजारपण दुर होउन चांगला स्वास्थ्यलाभ होईल.
उत्तम स्वास्थ्याकरता चांगल्या सवयी – Good Habits for Health in Marathi

उत्तम आरोग्यासाठी काही टिप्स – Tips For Good Health
१) जेव्हा आपण बाहेरून घरी येतो तेव्हां हाथ चांगल्याप्रकारे धुवुन घ्या. हेच नाही तर कोणत्याही वस्तुला हात लावल्यानंतर, जेवण करण्याआधी आणि तयारी करण्यापुर्वी, बाथरूम आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हाथ चांगले धुवुन घ्या. जर आपल्या घरी लहान बाळ असेल तर त्याच्या जवळ जाण्यापुर्वी हाथ चांगले साफ करा.
२) घरात कुठेही पाणी सांडलेले किंवा जमा होउ देउ नका. आपल्या घरातील स्वयंपाकघर आणि शौचालय चांगल्याप्रकारे स्वच्छ असावेत. सिंक, वॉश बेसीन, सारख्या जागांवर नेहमी स्वच्छता करतांना फिनाईल आणि फ्लोर क्लिनर चा उपयोग करत जा. उघडयावर कुठलेही अन्न ठेवु नका. अन्न शिजवण्याच्या भांडयाना, फ्रिज, ओव्हन ला स्वच्छ ठेवा. ओल्या भांडयाना मांडणीत ठेवु नका तसच ओल्या डब्यांना पुर्ण वाळल्यानंतरच झाकणं लावा.
३) दुकानातुन कोणतेही सामान आणण्यापुर्वी त्याची एक्सपायरी डेट पाहुन घ्या. ताज्या भाज्या आणि ताजे फळच उपयोगात आणा. घरात उपयोगात येणारे मसाले, धान्य आणि अन्य सामग्री ची साठवण योग्य तऱ्हेने करा. अन्न शिजवतांना आणि पिण्याकरता स्वच्छ पाण्याचाच उपयोग करा.
४) आपल्या आरामाची रूम नेहमी स्वच्छ ठेवा. चादर, बेडसीट, पीलोकव्हर, पडदे वेळोवेळी बदलत राहा. गादयांना नियमीत उन दाखवत राहा. आपल्या सभोवताली स्वच्छता ठेवा तेव्हांच आजार आपल्यापासुन दुर राहातील. असं म्हणतात स्वच्छ ठिकाणी भगवंत वास करतात आणि भगवंत असल्यावर आजारपण कसे येईल? आपल्या आसपासची जागा स्वच्छ ठेवण्याकरता सरकारनेही पावलं उचलली आहेत, त्या योजनांचा लाभ आपणही घेत आहोत.
मित्रांनो जर आपण आपली कामे स्वच्छतेने करू तर आपण निरोगी राहू आणि जर आपण निरोगी राहीलो तर आपल्याला कामात यश मिळेल. प्रत्येक काम यशस्वी होईल आणि आपले जीवन आनंदी राहील, चला तर मग आपण आपल जीवन आनंदी बनवुया.
तर ह्या होत्या काही छोट्याश्या टिप्स ज्या आपल्याला निरोगी ठेवतील. आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद!