Himachali Sabji
भारतात सर्वच राज्यात अनेक प्रकारचे व्यंजन बनविले जातात. हिमाचल हा उंच पर्वतरांगांचा प्रदेश मानला जातो. येथे हिमाचली सब्जी हे एक प्रसिध्द व्यंजन बनविल्या जाते जे फार पसंत केले जाते.
जाणुन घेउया हिमाचली सब्जी कशी बनविली जाते.
हिमाचली सब्जी रेसिपी – Himachali Sabji Recipe in Marathi
हिमाचली सब्जीसाठी लागणारी सामग्री – Ingredients of Himachali Sabji
टोमॅटो ग्रेवीसाठी लागणारी सामग्री – Ingredients of Tomato Gravy
- १०० ग्रॅम टमाटर पेस्ट
- ५० ग्रॅम काजु पेस्ट
- ५० ग्रॅम क्रिम
- ३० ग्रॅम खवा
- २० ग्रॅम चीज
- गाजर, हिरवा वटाना, फुलकोबी, मशरूम, हया भाज्या कापुन २०० ग्रॅम
- पनीर १०० ग्रॅम
- १०० ग्रॅम तेल
- मिठ स्वादानुसार
पालक ग्रेवीसाठी लागणारी सामग्री – Ingredients of Palak Gravy
- १०० ग्रॅम पालक पेस्ट
- ५० ग्रॅम काजू पेस्ट
- १ चमचा अद्रक लसुण पेस्ट
- २ कापलेल्या मिरच्या
- १०० ग्रॅम विविध भाज्या कापुन
- ५० ग्रॅम तेल
- मिठ चवीनुसार
- क्रिम सजावटीसाठी
- हिरव्या मिरच्या, कोथींबीर, वटाणा दाणे.
टोमॅटो ग्रेवी विधी – Tomato Gravy Recipe
एका पॅनमध्ये १०० ग्रॅम हया भाज्या सोडून सर्व पदार्थ पॅन मध्ये टाकून १० मिनिटे होवू दया नंतर त्यात भाज्या घालून होवू दया. १०-१५ मिनिटे होऊ द्या, गरजेनुसार थोडं पाणी घालून शिजु दया.
पालक ग्रेवी विधी – Palak Gravy Recipe
दुसऱ्या पॅनमध्ये कांदा, अद्रक लसुण पेस्ट व हिरव्या मिरच्या टाकुन चांगले होवू द्या यात पालक पेस्ट टाकुन २ मिनीटे होउ द्या, त्यात काजु पेस्ट, सर्व भाज्या मिठ टाकुन ग्रेवी घट्ट होवू दया. किमान १५-२० मिनीटे होवू दया.
प्लेटमध्ये एकाबाजुस टोमॅटो ग्रेवी आणि दुसऱ्या बाजुस पालक गे्रवी ठेवावी. क्रिम, हिरवा वटाणा, कोथींबीर आणि चिज किसुन त्यात घाला, गरमागरम खायला द्या.
आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रपरिवारात शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद !