• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Health

बाळांसाठी तापावर घरगुती उपाय | Home Remedies For Fever In Babies

Home Remedies For Fever In Babies

ताप हे एक मोठ्या आजाराचे संकेत हि होवू शकते. परंतु ताप येणे याचा अर्थ मोठ्या आजाराशी संबंध जोडला जावू नये.

बाळामध्ये बरेचदा सांसर्गिक संक्रमणामुळे ताप – Home Remedies For Fever In Babies येतो. बरेचदा दातांचे दुखण्यामुळे बाळामध्ये ताप येतो. जेव्हाही आपल्या शरीराचे तापमान वाढते. हे एक चिंतेचा विषय बनू शकते. त्यामुळे मनात अनेक दुविधा उत्पन्न होतात.

अशावेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला व योग्य औषधी वेळेवर घेणे फार जरुरी आहे.

Home Remedies For Fever In Babies

बाळांसाठी तापावर घरगुती उपाय – Home Remedies For Fever In Babies

नवजात बाळाला ताप आल्यास आपण डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधांसह काही घरगुती उपायही करू शकतो.

खाली नवजात शिशूला तापिमध्ये औषधींचे काही उपाय दिले आहेत.

१) थंड पट्ट्या

आपल्या शिशूला जर ताप आला आहे असे जाणवल्यास एका नरम कपड्याला पाण्यात भिडवून त्यास शिशूच्या कपाळावर ठेवावे. पट्टी थोडी कोरडी झाल्यास परत २-3 वेळा पट्टी पाण्यात भिजवून ठेवावी. यामुळे शिशूचा ताप कमी होईल.

सूचना – पाणी फ्रीजमधील नसावे. त्यामुळे बाळाचा ताप वाढू शकतो.

२) कोमट पाण्यानी स्नान

बाळास ताप असतांना कोमट पाण्यातच आंघोळ करावी तसेच त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित होते.

– ६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या शिशूस नरम कपड्याने कोमट पाण्यात भिजवून अंग चांगले पुसून काढावे. यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळेल.

– ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या शिशूस कोमट पाण्याने रोज आंघोळ करावी.
सूचना – जास्त गरम किंवा थंड पाणी आंघोळीस घेवू नये. असे केल्यास ताप आणखी वाढतो.

3) स्तनपान

६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या शिशूसाठी आपल्या मातेचे स्तनपान हे एक सर्वोत्तम औषध व टॉनिक मानले जाते. त्यात विविध रोगांशी लढण्याचि मातेच्या स्तनातील दुधातून मिळते.

त्यामुळे तापीत शुशुस स्तनपान करणे फार जरुरीचे व त्यास बहुपयोगी ठरते. यातून त्यास आवश्यक सर्व पोषके मिळतात. त्यामुळे शिशु विविध रोगांशी दोन हात करण्यास सक्षम असते.

-स्तनाचे दूध सहजतेने पचते व त्यामुळे बाळाची भूक वाढते. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

– बाळ स्तनाचे दूध पीत नसल्यास स्तनाचे दूध भांड्यात काढून बाळास चमच्याने पाजावे.

– ६ महिन्यांपर्यंत दररोज २-3 वेळा किंवा बालकाच्या रडल्यावर त्यास पाजावे.

४) अधिक द्रव्य पदार्थ पाजावे

६ महिन्यापेक्षा जास्त वयाच्या बाळांना स्तनपाना शिवाय ORS पाणी, नारळाचे पाणी, थंड दूध, फळांचा रस, पातळ दही यापैकी कोणते हि पातळ केलेले मिश्रण पाजू शकता.

यामुळे बाळाच्या शरीरात तापामुळे कमी झालेले पाणी पुन्हा नियंत्रित करता येते.तापिमुळे बाळाच्या शरीरास पाण्याची कमतरता येते. अशावेळी बाळास सहज पचवता येईल असे कोणतेही पातळ पदार्थ देता येते.

५) थंड जागेत ठेवावे
शिशूची तब्ब्येत स्वस्थ नसल्यास त्यांना जास्त थंड किंवा जास्त गरम खोलीत ठेवू नये. खोलीत पुरेशी हवा व प्रकाश हवा. सोबतच जागा मोकळी असावी. साधारणतः २१.१ c ते २३.3 c तापमानात शिशु सामान्य राहतात.

जर फॅन लावत असाल तर तो मंद गतीवर ठेवा. बालकास त्रास होत असल्यास फॅन बंद करा.

– हिवाळ्यात रूम हिटर चा वापर जास्त करू नये.
– जास्त वेळ खोलीतच ठेवावे. बाहेर नेतांना त्यास झाकून घ्यावे.

६) नवजात बालकास आरामदायक कपडे

नवजात बालकास ताप असल्यास त्यांचे कपडे नरम व कमी उष्मा धारक असावे. कपडे नेहमी नरम व सैल असावे.

बालकास गरम ब्ल्यान्केट मध्ये गुंडाळू नये. त्याने ताप वाढतो. त्याच्या अंगावर नरम टॉवेल व दुपट्टया सारखा कपडा ठेवावा.

७) पायांची मालिश

तापीत बालकांच्या हातापायांची मालिश करावी. त्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्मा कमी होते. विशेषतः पाय व तळपायाची तेलाने मालिश केल्यास त्याची उष्मा कमी होते व बालक चांगल्या प्रकारे झोपते.

तापीत झोप येणे फार कठीण असते त्यामुळे पायाची मालिश केल्यामुळे बालक शांत झोपतो. व तापही कमी होते.

मालीशमुळे तापमान नियंत्रित ठेवता येते.

१. आपल्या बाळाच्या तळपायांची मालिश एरंडीच्या तेलाने करता येते.

२. आपल्या अंगठ्या व बोटांनी बाळाच्या तळपायाची हलकी हलकी मालिश करावी.

३. आधी तळपाय व नंतर संपूर्ण पायांची मालिश करावी.

४. असे ४ मिनिटांपर्यंत करावे. दिवसातून २ वेळा पायांची मालिश करावे. ध्यान ठेवा कि मालिश हळू हळू व शांततेने करावी.

८) एपल साईड विनेगर

१. १ वर्षापर्यंतच्या मुलांच्या तापास नियंत्रित करण्यासाठी एपल साईड विनेगरचा वापर करू शकता. यामध्ये शरीराचे तापमान कमी करण्याची क्षमता असते.

२. १ कप एपल साईड विनेगर कोमट पाण्यात मिळवून घ्या

३. त्यात नरम कपडा जो स्वछ धुतलेला असावा.

४. त्यातील पाणी सावटून थोडा कोरडा करावा. व आपल्या बाळाच्या हातापायांवर व संपूर्ण अंग याने पुसून घ्या. हि क्रिया २ वेळा करावी. दिवसात एकदा केल्यास अंगातील ताप कमी होतो. ताप जाईपर्यंत हि प्रक्रिया करत जावे.

९) तुळस

१ वर्षापर्यंतच्या बालकांना ताप आल्यास त्यांच्या साठी तुळस लाभदायी ठरते. यात ताप नाशक तत्व असतात व शरीरास ते थंड ठेवतात.

– १ कप पाण्यास उकडून थंड कोमट करावे. त्यात ८-१० तुळस पाने कुटून त्यात टाकावे व चवीस साखर घालावी. हे मिश्रण ताजे ताजे बालकास प्यायला द्यावे.जर बालकास तापिमुळे गळ्यात कम असल्यास तुळस पाने चावायला द्यावे व शहद त्यावर चाखायला द्यावे. लवकरच आराम मिळतो.

१०) शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे.

नवजात बालकाचे शरीर तापात होईस्पर थंडच ठेवावे. त्यामुळे ताप जास्त चढणार नाही. दररोज तापमानाची नोंद घ्यावी जास्त असल्यास त्यावर वरील पैकी उपचार द्यावे जर ताप कमी न होता सारखा वाढतो आहे तर मग डॉक्टरांकडेच न्यावे. तापमानाची नोंद घेत राहावे. यामुळे डॉक्टरांना मदत मिळेल.

टिप्स

  1. आपल्या नवजात बालकाची नियमित तपसणी व तापमानाची नोंद घ्यावी.
  2. जर शरीरात तापिमुळे तोंड कोरडे झाल्यास त्यास तरल पदार्थ प्यावयास द्यावे.
  3. नवजात बालक ४-५ तासात लघवी करते. याची नोंद ठेवावी. त्याचा रंग हलका असावा याची नीट तपासणी करावी.
  4. शिशु दिवसभर रडत असेल तर त्यास योग्य सल्ल्यासाठी डॉक्टरकडे न्यावे.
  5. तापीत बाळाला त्याच्या आईजवळच ठेवावे.
  6. बाळाला ठोस पदार्थ तापीत देवू नये व त्यांना त्याची जबरदस्ती करू नये.
  7. त्यांना पातळ व लवकर पचणारे पदार्थ द्या.

वरील सर्व प्रकारच्या उपायांचा वापर करून आपण आपल्या बाळाचा ताप नियंत्रित ठेवू शकतो.

जर बालकात काही विशेष आजाराचे लक्षण दिसत असतील तर त्यांना नजरंदाज करू नका. तातडीने डॉक्टरांकडे न्यावे. बालकांच्या तापाची नोंद घेणे जरुरी आहे. ताप हे काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. मातेने आपल्या शिशुजवळ असणे गरजेचे आहे.

परिस्थितीनुरूप डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

लक्ष्य दया :- Home Remedies For Fever In Babies बाळांसाठी तापावर घरगुती उपाय तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

Benefits of Almonds
Fruit Information

बदामचे गुणकारी फायदे

Badamache Fayde पूरातन काळापासुन लोक बदामचे सेवन करत आहेत, व त्यांच्या गुणांचा फायदा घेत आहेत. खास करून बुद्धीची क्षमता वाढावी...

by Editorial team
June 17, 2022
तुळशीचे फायदे आणि माहिती
Health

तुळशीचे फायदे आणि माहिती

Tulsi chi Mahiti Marathi आपल्या सर्वांच्या परिचयाची तुळस या वनस्पतीला महाराष्ट्रामध्ये देवाच रूप मानल जात. तुळस हे भारतातील एक पवित्र...

by Editorial team
March 24, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved