Homemade Beauty Tips
मित्रांनो आपणा सगळयांना जगात सर्वात जास्त सुंदर दिसाव असं सतत वाटत असतं. आणि म्हणुन आपण आपल्या दिसण्याला घेउन सतत काळजीत असतो. रोज काही ना काही उपाय करून आपण आपल्या सुंदरतेमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत असतो. आज म्हणुनच आम्ही आपल्याकरता सौंदर्यामधे भर घालणा-या काही घरगुती टिप्स् घेउन आलो आहोत.
सौंदर्य वाढवण्याकरता काही घरगुती उपाय – Homemade Beauty Tips in Marathi
1) थंडीत आपले ओठ नेहमी फाटतात म्हणुन ओठांवर नेहमी लिपगार्ड, लिपकेयर, किंवा व्हॅसलीन चा वापर करावा. तुम्ही याचा उपयोग दिवसातुन कितीही वेळा करू शकता. रात्री झोपतांना चांगले घरगुती तुप चांगल्या त-हेने ओठांवर लावावे.
2) रात्री झोपण्यापुर्वी ओठांना खोबरेल तेलाने हलकी मालीश अवश्य करा.
3) नेहमी दिवसभर कॉम्प्युटर वर काम करून आणि धुळ माती यांनी थकलेल्या डोळयांवर काकडीचे काप अवश्य ठेवावे, यामुळे तुमचे डोळे फ्रेश राहातील.
4) आपल्या डोळयांभवती जर काळेपणा आला असेल तर तो बटाटयाने नाहीसा होतो. कच्चा बटाटा कापुन आपल्या डोळयांवर 10 ते 15 मिनीटे ठेवावा.
5) आपल्या केसांना तंदुरूस्त ठेवण्याकरता आपल्याला जास्तीत जास्त पौष्टीक आहार घ्यायला हवा. जितके शक्य होईल तितके ड्रायफ्रुट आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा. उचित आहार, वेळेवर केस कापणे, चांगला शॅंपु, आणि हेयर एक्सपर्ट चा सल्ला खुप आवश्यक आहे.
6) शॅंपु डोक्याच्या त्वचेकरता आणि केसांकरता चांगला असतो पण केसांकरता नेहमी चांगला शॅंपु वापरणे डोक्याच्या त्वचेकरता आणि केसांकरता चांगले असते. शॅंपु डोक्याच्या त्वचेवरून अतिरीक्त तेल काढते आणि कोंडा होण्यापासुन देखील बचाव होतो.
7) नखांच्या स्वच्छतेकरता तुम्ही रोज साबणाचा फेस करून चांगल्या प्रकारे ब्रश ने नखांना साफ करायला हवे. साबणाच्या फेसमधे नखं 10 मिनीटांपर्यंत बुडवुन ठेवावीत त्यानंतर स्वच्छ करून कोमट पाण्याने धुवावे.
8) आजकाल लांब नखांची फॅशन आली आहे. लांब नखांकरता बाजारात प्लास्टीक च्या कॅप उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या नखांच्या संरक्षणाकरता याचा वापर करू शकता. नखांच्या सेफ्टी आणि मजबुतीकरता एक विशेष प्रकारची वार्निश देखील मिळते ज्याच्या नियमीत वापराने चांगला फायदा होतो.
9) जर तुमची त्वचा तेलकट असेल तर अश्या त्वचेवरच ब्लॅक हेडस् आणि मुरूमांचा त्रास जास्त असतो. नेहमी आपल्या चेहे-याला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसातुन 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्या चेहे-याला धुवुन घ्या. या सोबत डाळयांना बारीक करून थोडे जाडसर दळुन घ्या. यात एक चमचा मुल्तानी माती, एक चिमुट हळद आणि काकडीचा रस टाका, या स्क्रब चा वापर केल्यास ब्लॅक हेडस् निघुन जातील.
10) तुम्हाला तुमच्या नाकाच्या आकाराला धारदार बनवायचे असेल तर हे तुम्ही योगा चा उपयोग करून देखील करू शकता. योगा आणि प्राणायामाच्या मदतीने सर्व नैसर्गिक पध्दतीने होईल आणि कळणार देखील नाही की तुमचे नाक धारदार झाले देखील.
अनुलोम विलोम प्राणायाम यापैकीच एक प्राणायाम आहे. हा प्राणायाम करतांना तुम्हाला पहिल्यांदा डाव्या नाकपुडीला बंद करावे लागेल आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा लागेल आणि यानंतर याच्या विपरीत करावे लागेल. हे करत असतांना दिर्घ श्वास घ्यावा. (श्वास घेण्याचा वेळ 15 सेकंद आणि सोडायचा वेळ साधारण 20 सेकंद) परंतु वेळेकरता जास्त काटेकोर होण्याची गरज नाही.
या टिप्स् चा उपयोग करून तुम्ही तुमच्या सौंदयामध्ये अधीक वाढ करू शकता.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Homemade Beauty Tips असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्