Homemade Beauty Tips
आजकालची पिढी आपल्या दिसण्याला घेउन बरीच जागरूक झालेली आपण पाहातो. आपण प्रेझेंटेबल दिसावं असं कुणाला वाटत नाही? सगळयांनाच वाटतं. पण मग त्याबद्दल कशी काळजी घ्यावी आणि कमी वेळात चांगला परिणाम कसा दिसेल याबाबत आपण बरेचदा अनभिज्ञ असतो . . . .
प्रदुषणाने ग्रस्त वातावरणात आज आपण वावरतो आहोत आणि या वातावरणात आपल्या त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रदुषणामुळे आपल्याला धुळ माती आणि उन्हाचा नेहमीच सामना करावा लागतो त्वचा काळवंडलेली आणि निस्तेज पडलेली दिसते. वाढत्या वयाचा परिणाम त्वचेवर दिसायला लागतो, बाजारात बरेच प्राॅडक्ट यासंबधी आपल्याला बघायला मिळतात त्याच्या किमती तर जास्त असतातच शिवाय याचे दुष्परीणाम देखील होउ शकतात. खाली दिलेल्या त्वचेसंबधीच्या टिप्स् ला उपयोगात आणुन आपण आपल्या त्वचेची काळजी घरबसल्या घेउ शकता.

घरच्या घरी बनवता येणारे आयुर्वेदिक फेसपॅक – Homemade Beauty Tips
चेहे-यावर जर मुरूमांचे डाग पडले असतील तर दोन बदाम बारीक करून त्यात दोन चमचे दुध टाकावे आणि एक चमचा संत्र्याच्या सालीची पुड मिसळुन हलक्या हाताने चेहे-याला मसाज करावा आणि थोडया वेळानंतर चेहेरा धुवावा.
आठवडयातुन एकदा स्क्रब अवश्य केला जावा आजकाल पार्लर ला जावुन स्क्रब करण्याइतका वेळ कुणाजवळही नाही तेव्हा घरच्या घरी नैसर्गिक स्क्रब तयार करतांना तांदुळ 1 चमचा जाडसर बारीक केलेले, मसुर डाळ 1चमचा जाडसर बारीक केलेली, त्याचप्रमाणे 1 चमचा उडीद डाळ बारीक केलेली, 1 चमचा गुलाब जल, आणि अर्धा चमचा मध हे सगळे मिसळुन घट्ठ पेस्ट बनवा आणि चेहे-याला लावा. वाळल्यावर स्क्रब करत काढा चेहेरा ग्लो करत असलेला दिसेल.
हळदीला सायीमधे मिसळुन चेहे-यावर हलक्या हाथाने चोळल्यास त्वचा चमकते, कच्च्या दुधात हळदीला मिक्स करून मुरूमावर लावल्यास फायदा होतो.
तेलकट त्वचा असेल तर अर्धा चमचा संत्र्याचा रस, त्यात 4 ते 5 थेंब लिंबाचा रस थोडी मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि थोडे गुलाबजल मिसळुन थोडया वेळ फ्रिजमधे ठेवावे आणि नंतर चेहे-याला लावा, 15 ते 20 मिनीटांनी पाण्याने चेहरे स्वच्छ धुवावा.
काजु ला रात्रभर दुधात भिजवुन सकाळी बारीक पावडर करून मुलतानी माती आणि मधाच्या चार पाच थेंबासोबत मिसळुन स्क्रब करावा. हा स्क्रब कोरडया त्वचेकरता अत्यंत उपयोगी आहे.
उन्हामुळे त्वचा सावळी दिसते या सावळया झालेल्या त्वचेकरता नारळ पाणी, कच्चे दुध, काकडीचा रस, लिंबाचा रस, बेसन आणि थोडीशी चंदन पावडर एकत्र करून लेप बनवावा आण या लेपाला अंघोळीपुर्वी एक तास आधी चेहे-याला लावावे. हा प्रयोग आठवडयातुन दोनदा केल्यास उन्हामुळे आलेला सावळेपणा कमी होतो.
या फेसपॅक चा उपयोग करून आपण घरबसल्या आपल्या त्वचेला झळाळी देउ शकतो.
नक्की वाचा:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Homemade Beauty Tips असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा घरच्या घरी बनवता येणारे आयुर्वेदिक फेसपॅक – Homemade Beauty Tips तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.
नोट: घरच्या घरी बनवता येणारे आयुर्वेदिक फेसपॅक – Homemade Beauty Tips या लेखात दिलेल्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल याबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.