मित्रानो कोरोना व्हायरसमुळे अवघं जग भीतीग्रस्त झालेलं आपण अनुभवतो आहोत. आपण घरात राहून या व्हायरसमुळे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवु शकतो. या आणि अश्या साथीच्या रोगांपासून आपला बचाव कसा करायचा यासाठी प्रत्येकानं जागरूक असायला हवं. छोटे-मोठे आजार, ताप, साथीचे रोग, यापासून जर आपण स्वतःचा बचाव करायला शिकलो, आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवली तर पुढे वाढणाऱ्या इतर समस्या वेळीच आटोक्यात येऊ शकतात…
या लेखातून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे सोपे आणि महत्वपूर्ण उपाय देत आहोत ज्यामुळे आपण आणि आपलं कुटुंब नक्कीच सुरक्षित राहू शकेल.
रोगप्रतिकारक शक्ती मधे आपला आहार-विहार महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्यामुळे आहारात कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असावा ते पाहूया…
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय – How to Improve Immunity in Marathi
- पाणी म्हणजे जीवन हे आपल्या सर्वांना माहितीये, आपल्या शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते नियमित आणि गरजेनुसार पाणी पिल्यास आपण कित्येक आजारांपासून स्वतःला दूर ठेवु शकतो…
- त्यामुळे भरपूर पाणी प्या.
- मित्रानो पाणी भरपूर प्यायला सांगितलंय म्हणजे कधीही केंव्हाही आणि कसही पाणी पिऊ नये,
- पाणी नेहमी बसून प्यावं, पाणी जेवणाच्या आधी 10 मिनिटं आणि जेवणा नंतर साधारण 45 मिनिटानंतर प्यावं, शक्यतो जेवतांना पाणी पिऊ नये.
- आवळा, लिंबू यामध्ये विपुल प्रमाणात व्हिटामिन “सी” आढळतं, ज्यामुळे आपली त्वचा डोळे केस यांना उत्तम पोषण मिळतं, आपल्या शरीराला वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून दूर ठेवण्यास विटामिन सी महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने अगदी आवर्जून आवळा लिंबू याचा आपल्या रोजच्या आहारात समावेश नक्की करावा.
- जेवणानंतर रोज एक फळ खावं…फळांमध्ये भरपूर पोषण मूल्य असल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यास ते पूरक ठरतात.
- पालक या पालेभाजी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात, यात आढळणाऱ्या फॉलिक या घटकामुळे आपल्या शरीरात नवीन पेशी तयार होण्यास भरपूर मदत होते.
How to Improve Immunity
- शिवाय पालक ही पालेभाजी व्हिटामिन सी, फायबर, विटामिन ई, विटामिन ए चा चांगला स्त्रोत आहे.
- रोज किमान 5-6 बदाम अवश्य खावे यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास मदत मिळते.
- दह्याचे सेवन रोज करणे देखील आपल्या शरीराकरता चांगले ठरते.
- योग्य आहार हा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे वेळेनुसार सकस आहाराचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात केल्याने आपल्याला पुष्कळ पोषणद्रव्य मिळतात ज्यामुळे शरीराचं कार्य सुरळीत रहाण्यास मदत मिळते.
- मित्रानो जसा सकस आहार आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतो त्याचपद्धतीनं आपल्या शरीराला पुरेशी झोप देखील खूप गरजेची आहे.
- पुरेशी झोप न घेणाऱ्या व्यक्ती वरचेवर आजारी पडतात.
- आपल्या रोजच्या झोपेवर परिणाम झाल्यास त्याचा विपरीत परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर देखील होतो.
- रोज आपल्या शरीराला 8 तासांची झोप आवश्यक आहे.
- जर 7 तासांपेक्षा कमी झोप मिळाली तर शरीरात संसर्ग होण्याचं प्रमाण देखील वाढतं आणि त्याचा प्रतिकार करण्यास शरीर असमर्थ ठरतं.
- त्यामुळे रोज 8 तासांची झोप नक्की घ्या.
- मद्यपान…धुम्रपान या गोष्टींपासून दूर रहा,
- या गोष्टी कुठल्याही समस्येवरचा उपाय कधीच होऊ शकत नाही उलट आपली रोगप्रतिकारक शक्ती या व्यसनांमुळे कमी कमी होत जाते.
Rog Pratikar Shakti Vadhavnyache Upay
- मानसिक, शारीरिक ताणतणावांमुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते…त्यामुळे तणावांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा किंवा किमान तणावावर नियंत्रण मिळवा.
- आहारासोबत विहार अर्थात व्यायामाला आपल्या रोजच्या जीवनात महत्वं द्यायलाच हवं… आपल्याला आवडेल, पचेल, रुचेल असा व्यायाम रोज किमान अर्धा तास तरी न विसरता न कंटाळता नक्की करायला हवा. व्यायामाने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत रहतो, आपलं शरीर प्रमाणात रहाण्यास…संतुलित रहाण्यास मदत मिळते, वजन नियंत्रणात रहातं.
- मित्रानो रोज भरपूर हसा…ज्या दिवशी आपण हसत नाही ना तो दिवस वाया गेला असं समजावं.
- आनंदी हसत-खेळत राहिल्याने आपण ताण-तणावापासून दूर राहतो…
- आवडीचा एखादा छंद जोपासा त्यामुळे आपण प्रसन्न राहू आणि इतरांना देखील आपल्याला पाहून आनंद होईल.
या सगळ्या गोष्टींसोबत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मार्गक्रमण करणे चांगले ठरते…
आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आपला जगण्याचा दृष्टीकोन महत्वाची भूमिका बजावतो.
या लेखात सांगितलेल्या गोष्टींचा रोजच्या जगण्यात नक्की उपयोग करा आणि आनंदाने जगा…