ह्या ८ टिप्स वाचल्यावर आळशीपणा स्वतः तुम्हाला सोडून जाईल !

वरील शीर्षक वाचून तुम्ही समजलेच असाल कि आजच्या लेखात आपला कोणता विषय असणार आहे, ज्याप्रमाणे एखादा इंजिनियर एखाद्या यंत्राला काही तरी काम करण्यासाठी बनवतो त्याच प्रमाणे देवाने सुद्धा आपल्याला या पृथ्वीवर स्वतःला सिध्द करण्यासाठीच तयार केले आहे.

बरेचदा मनामध्ये विचारांचा गोंधळ उडतो आणि या गोंधळात आपण विचारांच्या जाळ्यात अडकल्यासारखे स्वतःला पाहतो.

  • जसे आपल्याला वाटते कि आपण निरुपयोगी आहोत का ?
  • आपण काहीही कामाचे नाही आहोत ?
  • एखादे काम करतेवेळी जीवावर येऊन काम करणे.

हे सगळे आळशीपणाचे लक्षण आहेत, परंतु ह्या अश्या परिस्थितीत स्वतःला कश्या प्रकारे सावरावे जेणेकरून कोणत्याही कामात आपले मन लागेल आणि आपण ते काम मनापासून करू शकू.

ह्या ८ टिप्स वाचल्यावर आळशीपणा स्वतः तुम्हाला सोडून जाईल ! – How to Stop being Lazy and Depressed

How to stop being lazy and depressed

खाली काही ८ टिप्स दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला आळसापासून दूर राहण्यासाठी मदत करतील.

१) व्यायाम आणि ध्यान.

आळसापासून दूर राहण्यासाठी सकाळी उठल्या नंतर दररोज व्यायाम करावा, त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस हा चांगल्या मूड मध्ये जाणार. तसेच व्यायामामुळे तुम्ही दिवसभर उत्साही दिसणार.

सोबतच तुम्ही काही वेळापुरते ध्यानस्थ बसू शकता कारण या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी थोडाही वेळ नाही परंतु आपण जेव्हा ध्यानस्त बसतो तेव्हा आपण आपल्या शरीरावर ध्यान केंद्रित करू शकतो ज्यामुळे आपले विचार आणि आपला स्वभाव बदलू शकतो.
यामुळे आपल्यात मानसिक रित्या आणि शारीरिकरीत्या खूप बदल होतात. माणसाच्या प्रगती साठी ह्या गोष्टी आवश्यकच आहे.

२) यशस्वी लोकांच्या गोष्टी वाचणे.

माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी किंवा यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी त्याला मोटीवेशन ची आवश्यकता असते, जेव्हा हि तुम्ही विचारांच्या विळख्यात अडकसाल तेव्हा तुम्ही एखाद्या यशस्वी व्यक्तींचे आत्मचरित्र वाचू शकता ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा भेटेल. (उदा..डॉ.A.P.J.अब्दुल कलाम यांची जीवनी )

३) आवश्यक झोप.

माणसाला सरासरी आठ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. त्यापेक्षा जास्त झोप पण तुमच्यात आळशीपणा निर्माण करू शकते आणि कमी झोप पण तुमच्या मध्ये तणाव निर्माण करू शकते म्हणून आपण आपल्याला आवश्यक असणारी झोप घेणे गरजेचे आहे.त्यासाठी दिवसातून कमीत कमी आठ तास झोप घ्यावीच.

४) भावनांकडे दुर्लक्ष करा.

भावना म्हणजे सगळ्याच भावना नाही तर ज्या भावना तुम्हाला आळसाकडे घेऊन जातात, आणि काम करण्यामध्ये अडथळा आणतात. अश्या भावनांकडे दुर्लक्ष करा. कारण या जगात भावनांना काहीही महत्व नाही. तुमच्या कामामुळेच तुम्हाला ओळख प्राप्त होईल हे लक्षात घ्या.

५) स्वतःची रोजनिशी बनवा.

दैनिंदिन जीवनात तुम्ही स्वतःचे वेळापत्रक बनवा जेणेकरून तुम्हाला कोणते वेळी काय काम करावे हे लक्षात राहील आणि तुम्ही स्वतःच्या कामात व्यस्थ राहाल. ज्यामुळे आळसाला तुमच्याकडे येण्यासाठी वेळच भेटणार नाही.

६) मोठ्या कामांना लहान लहान भागात विभागा.

एखाद्या व्यक्तीला जर आपण १० किलो चे पोते एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणावर नेण्यास सांगितले तर त्या व्यक्तीला ते काम अवघड वाटेल परंतु त्याच व्यक्तीला आपण २-२ किलो चे पोते नेण्यास सांगितले तर ते त्याला अवघड जाणार नाही,

त्याचप्रमाणे आपल्या दैनिंदिन जीवनात आपल्या कामांना छोट्या छोट्या कामांमध्ये विभागून घ्या आणि ते पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला आळस हि येणार नाही आणि काम हि पूर्ण होईल.

७) सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा.

उर्जेला एका माध्यमातून दुसर्या माध्यमात रुपांतर करता येते तिला कोणी नष्ट हि करू शकत नाही आणि उत्पनहि करू शकत नाही, तुम्हाला हि गोष्ट सांगण्याच्या मागचे कारण असे कि सकारात्मक आणि नकारात्मक ह्या पण उर्जाच आहेत

जर तुम्ही नकारात्मक वातावरणात राहिले तर नकारात्मक उर्जा तुमच्यात येणार, आणि सकारात्मक वातावरणात राहिले तर सकारात्मक उर्जा येणार म्हणून सकारात्मक लोकांच्या सहवासातच राहा.

८) सुरुवात तर करा.

शेवटची आणि महत्वाची टिप्स म्हणजे सुरुवात करणे. तुम्ही एक वेळ कामाची सुरुवात करण्याचे ठरवा. त्यानंतर तुमचे काम करण्याचे मूड आपोआप बनेल.

आपण फक्त काम सुरु करण्याच्या अगोदर हे काम कसे होईल, किती वेळ लागेल, मी करू शकेल कि नाही बऱ्याच विचारांनी आपण गोंधळून जातो. त्यामुळे सर्वात पहिले महत्वाची बाब म्हणजे आपण कामाची सुरुवात करण्याचे पाऊल उचलावे,

एक वेळ कामाला हाती घेतले कि ते काम करण्याची इच्छा आपोआप निर्माण होत असते, त्यामुळे सर्वात आधी कामाची सुरुवात करण्याचे ठरवा. आणि त्यानंतर आपण पहासाल कि आपले मन त्या कामात लागले असेल.

“You Cannot Change Your Future
But you Change Your Habit
And Surely Your Habit Can Change Your Future”

-Dr. A.P.J. Abdul Kalam

आशा करतो कि वरील महत्वाच्या टिप्स मुळे आपल्याला काही शिकायला मिळाले असेल. आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Thank You!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here