कोरोनावर चीन पेक्षाही भारत कार्यशील, एकाच दिवशी निर्माण केलीत ६००० पेक्षाही अधिक रूम – “Idea जाणून व्हाल थक्क.”

Convert Train Coaches into Isolation Wards

कोरोनच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात आज लॉकडाऊन ची स्थिती उद्भवली आहे. अश्या वेळेत नागरिकांना काही गोष्टींसाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे, परंतु सरकार त्यावर उपाय काढत नागरिकांचे समाधान करत आहे.

येत्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोना बधितांची संख्या वाढत चालली आहे. ज्याप्रमाणे चीन मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव पाहता तेथील सरकार ने कोरोना बधितांसाठी एका दिवसाला १०००  विलगिकरण कक्ष निर्माण केले होते. त्यांच्या तुलनेत भारत सरकार ने दिवसाला ६००० पेक्षा अधिक विलगिकरण कक्ष निर्माण केले आहेत.

चीनच्या तुलनेत भारताने बनविले अधिक विलगिकरण कक्ष – India has built more isolation wards than China

India has built isolation wards

संपूर्ण देशात लॉकडाऊन ची स्थिती पाहता भारतीय रेल्वेने पॅसेंजर गाड्यांची आवाजावी बंद केली आहे.

अश्या परिस्थिती मध्ये भारत सरकार ने एकाच ठिकाणी थांबलेल्या रेल्वे गाड्यांचा योग्य वापर करत संपूर्ण देशात रेल्वेच्या डब्यांचा कोरोना बाधितांसाठी विलगिकरण कक्ष म्हणून वापर करत देशात नवीन सुविधा उपलब्ध केली आहे.

कोरोना पासून संक्रमण झालेल्या व्यक्तींना वेगळं ठेवण्यासाठी या रेल्वे डब्यांचा वापर केला जाणार आहे. या डब्यांमध्ये हॉस्पिटल सारखे वातावरण निर्माण केले आहे.

रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी भारत सरकार ने घेतली आहे.

भारत सरकारच्या या निर्णयाचे संपूर्ण देशातून स्वागत करण्यात येत आहे सोबतच सोशल मीडियावर भारत सरकार च्या या कार्याची सराहना होत आहे.

अश्याच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणा साठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top